Harmful Fruits in Summer for Diabetic Patients: भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढणारा आजार आहे. दुर्दैवाने यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली, तर तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं. मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: उच्च किंवा कमी रक्तातील साखरेचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, अयोग्य वेळा आणि शारीरिक कष्टाचा अभाव यांमुळे मधुमेहासारखे आजार मागे लागतात. मात्र, डायबिटिजवर नियंत्रण ठेवल्यास चांगले जीवन जगता येते. मधुमेहाच्या रुग्णांना आजारात आहारावर लक्ष ठेवावे लागत असते. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाऊ नयेत हे जाणून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नयेत ‘ही’ फळे
१. द्राक्षे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्षे अत्यंत हानिकारक मानली जातात. द्राक्षे खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. त्यामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे द्राक्षांपासून मधुमेहाच्या रुग्णांनी लांब राहिलेलेच चांगले ठरेल.
२. चेरी
चेरी हे फळ अनेकांना आवडते. पण, एक कप चेरीमध्ये साधारण २० ग्रॅम साखर असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी चेरी खाणे टाळावे.
३. अननस
क जीवनसत्त्व असलेले अननस फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तात लवकर विरघळते आणि ग्लुकोज वाढवते. अननसामध्ये सहा ग्रॅम साखर असते. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असेल तितक्या प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे मधुमेहींना अननस मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. आंबे
फळांचा राजा सर्वांचा आवडता आहे; पण आंब्यामध्ये साखरेचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. जर मधुमेही रुग्णांनी मोठ्या प्रमाणात आंबे खाल्ले, तर त्यांना हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना साधारणपणे आंबा न खाण्याचा किंवा मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
५. केळी
केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे; परंतु केळी खाल्ल्याने साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण वाढू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी केळे हे फळ मर्यादित प्रमाणातच खावे. जास्त केळी खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.
वरील कोणतेही फळ खाण्यापूर्वी मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.