डॉ. किरण नाबर
Health allergy Special ॲलर्जी अचानक का व कशी सुरू होते ते आपण गेल्या लेखात पाहिले. या लेखात आपण कथिल म्हणजेच ज्याला इंग्रजीमध्ये निकेल म्हणतात या धातूच्या ॲलर्जी बद्दल माहिती करून घेणार आहोत. आपल्याला माहितीही नसते, पण आपल्या रोजच्या वापराच्या वस्तूंमधूनच या धातूचा संपर्क आपल्याला होत असतो. ज्याला आपण खोटे दागिने म्हणतो किंवा हल्ली कृत्रिम दागिने किंवा फॅशन ज्वेलरी म्हणून ओळखतो, त्यामध्येदेखील कथिल म्हणजेच निकेल (Nickel) हा धातू वापरलेला असतो.

ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मिटायटिस

धातूचे चष्मे, नाणी, मनगटी घड्याळ, कपड्याला असलेली धातूची बटणे किंवा हुक्स, चाव्या, धातूची अवजारे, भांडी, विविध उपकरणे, मोबाईल, नळ, यंत्रांचे सुटे भाग व जिथे जिथे धातूंशी संबंध येतो तिथे बहुतेक वेळा हा धातू असतोच असतो. त्यामुळे या धातूच्या स्पर्शामुळे होणारी ॲलर्जी (allergic contact dermatitis to nickel ) जास्त प्रमाणात दिसून येते. बहुतेक मुली व स्त्रियांना फॅशन ज्वेलरीचे बेसुमार आकर्षण असते. अशावेळी एखादीला या धातूची ॲलर्जी असेल तर दागिने घातल्यामुळे त्यांना त्रास होतो व न घातले तरीही त्यांची कुचंबना होत, हिरमोड होतो. 

Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती

हेही वाचा >>>Health Special: ड जीवनसत्वाची कमतरता केव्हा निर्माण होते? त्यावर उपाय काय?

कथिल (Nickel) ॲलर्जीची लक्षणे काय?

कृत्रिम दागिन्यांचा संपर्क त्वचेच्या ज्या भागावर होतो तिथे अशा व्यक्तींना लालसर पुरळ उठते. त्याला खाज येते. त्यानंतरदेखील असे दागिने वापरणे सुरू ठेवले तर तो भाग चिघळल्यासारखा होऊन तिथे लस येते, त्वचेचे पापुद्रे निघतात. त्वचा काळसर होते. कानाच्या पाळ्या (कर्णफुले व रिंग घातल्याने), मान (मंगळसूत्र व हार घातल्याने), हात (बांगड्यांमुळे), पाय (पैंजण घातल्यामुळे) व हातापायांची बोटे (अंगठी व जोडवी घातल्यामुळे) या ठिकाणी हे पुरळ येते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे धातूचे सूक्ष्म कण त्वचेवर जास्त प्रमाणात उतरतात. त्यामुळे या दिवसात ही अॅलर्जीजास्त प्रमाणात येते. 

ॲलर्जीचा त्रास कुठे होतो?

मोबाईलची ॲलर्जी असल्यास एक कान व खालील गालाचा भाग व त्याच बाजूच्या हाताचा अंगठा व बोटे या ठिकाणी असे पुरळ येते. नाण्यांची व भांड्यांची ॲलर्जी असल्यास बोटांना असे पुरळ येते. बोटे लाल होतात व कधी कधी तिथे बारीक चिरा पडतात, खाज येते व आग होते. चष्म्याची ॲलर्जी असल्यास चष्म्याच्या काड्या जिथे गालावर लागतात व मधील भाग जिथे नाकाला स्पर्श करतो तिथे अशा प्रकारचे पुरळ येते. मनगटी घड्याळ्याचा पट्टा धातूचा असल्यास त्याच्या खाली असे पुरळ येते. लॉकेटची ॲलर्जी  असल्यास लॉकेट छातीला जिकडे स्पर्श करते तिथे अशी ॲलर्जी येते. जीन्सच्या पॅन्टला धातूचे बटन असते. त्यामुळे पोटावर जिथे त्याचा स्पर्श होतो तिथे पुरळ येते. बायकांच्या ब्लाऊजचे व ब्रेसीयरचे हुक्स जिथे त्वचेला स्पर्श करतात तिथेही असे पुरळ येऊन खाज येते. घड्याळ, चष्मा वगैरेंची येणारी ॲलर्जी ही सुरवातीला नसते. जसजसे या वस्तूंवरील स्टीलचा थर शरीराच्या उष्णतेने व सततच्या वापराने कमी होत जातो तसतसे आतील कथिलाचास्पर्श त्वचेला होतो व ॲलर्जी सुरु होते.

हेही वाचा >>>खराब कोलेस्ट्रॉल नसांमधून चिकटू देत नाहीत ‘हे’ ७ पदार्थ; तज्ज्ञ सांगतात, आहारात कसा करावा समावेश?

किलॉईड म्हणजे काय?

कधी कधी काही मुलींना व स्त्रियांना नाक व कान नव्याने टोचले असता काही दिवसातच तिथे लाल पुळी येते व ती हळूहळू मोठी होते. तिच्यातून लस व पू यायला लागतो व ती ठणकते. नाकाच्या आतल्या व बाहेरच्या अशा दोन्ही बाजूने  अशी  पुळी येते. कधी कधी तर अस्सल सोन्याच्या तारेने जरी नाक व कान टोचले तरीही असे होते. एकतर   त्या धातूची त्यांना तीव्र प्रमाणात ॲलर्जी असते किंवा बाहेरची एखादी निर्जीव वस्तू त्यांचे शरीर अजिबात स्वीकारत नाही (Foreign body granuloma). कधी कधी तर नाक किंवा कान टोचलेल्या जागी काही दिवसांनी किंवा महिन्याने एक घट्ट गाठ येते व ती हळूहळू वाढतच जाते. याला किलॉईड (keloid) असे म्हणतात.

हल्ली स्त्रिया कर्णफुले घालण्यासाठी कानाला पाळी सोडल्यास वरच्या बाजूलादेखील दोन-तीन ठिकाणी टोचून घेतात. पण या ठिकाणी टोचताना कानाचा नाजूक भाग कमी असल्यामुळे चुकून कधी कधी थेट कुर्चा (cartilage) टोचली जाते व त्यावेळी मात्र तिथे हमखास लाल दुखणारी पुळी येऊन सुजते व लस येऊ लागते. (क्रमश:)