नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, “सामान्य प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत प्रतिलिटर १०५ सूक्ष्म-नॅनो प्लास्टिकचे कण असतात. ही संख्या मायक्रोप्लास्टिक्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पूर्वी नोंदविलेल्या परिणामांपेक्षा दुप्पट-तिप्पट जास्त आहे.” याचा अर्थ असा की, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवलेल्या प्रत्येक लिटर पाण्यात संशोधकांना १,००,००० पेक्षा जास्त नॅनो प्लास्टिक रेणू सापडले आहेत, असे ‘मेडस्केप’ने एका लेखात नमूद केले आहे. त्यात असे म्हटले आहे, “त्यांच्या लहान आकारामुळे हे कण रक्तप्रवाह, पेशी आणि मेंदूमध्ये प्रवेश करू शकतात, त्यामुळे आरोग्यासाठी संभाव्य धोके निर्माण करू शकतात.” प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासात वर्णन केलेल्या चिंताजनक निकालांमुळे वैद्यकीय क्षेत्रात यासंबंधीची चर्चा सुरू आहे.
सामान्य प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत कोणते धोकादायक घटक असतात आणि ते कसे टाळायचे याची खात्री करण्यासाठी नोएडाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि हॉस्पिटलच्या जनरल मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. ए. रेहमान यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांतील पाणी पिण्यासंबंधित संभाव्य आरोग्य धोके कोणते?
डॉ. रेहमान स्पष्ट करतात, “जेव्हा प्लास्टिकची पाण्याची बाटली उष्णता किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असते तेव्हा पाण्यात बिस्फेनॉल-ए (बीपीए) व फॅथलेट्स यांसारख्या रसायनांची निर्मिती होते त्यामुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
हेही वाचा – वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
ते पुढे म्हणतात, “बीपीए आणि फॅथलेट्ससह अंतःस्रावी व्यत्यय (endocrine disruption) हे वैज्ञानिकदृष्ट्या विकास, पुनरुत्पादन व संप्रेरक असंतुलनाच्या (hormone imbalances) आव्हानांशी संबंधित आहेत. मायक्रोप्लास्टिक्सयुक्त दूषित पाण्यामुळे पेशींना दाह किंवा सूज निर्माण येऊन हानी होऊ शकते.”
संशोधनाचा संदर्भ देत, त्यांनी सांगितले की, नॅनो कणांच्या दीर्घकाळापर्यंतच्या संपर्कामुळे कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारांसारखे दीर्घकाळ बरे न होणारे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. त्यांनी याकडे लक्ष वेधले की, दीर्घकालीन परिणामांचा अद्याप अभ्यास केला जात आहे. “प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण मर्यादित करणे आणि नळाचे फिल्टर केलेले पाणी वापरल्याने या धोकादायक कणांचा तुमच्याशी संपर्क कमी होण्यास मदत होऊ शकते.”
डॉ. रेहमान यांच्या मते, प्लास्टिकच्या पाण्याची बाटली सूर्यप्रकाशाच्या थेट आणि दीर्घ संपर्कामुळे, हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार, जसे की कर्करोग आणि इतर हानिकारक आरोग्य परिणाम होण्याची शक्यता वाढू शकते. त्याऐवजी पुन्हा वापरता येण्याजोग्या काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या कंटेनरचा वापर करणे अनुकूल आहे. कारण- त्यामुळे हे धोके कमी होऊ शकतात आणि सामान्य आरोग्य सुधारण्यास प्रोत्साहन मिळू शकते.”
हेही वाचा – तुम्ही फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाता का? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो माहित्येय का?
“तुम्ही घरी उच्च गुणवत्तेची पाणी गाळण्याची यंत्रणा बसवून एकदाच वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांचा वापर टाळू शकता; जे स्वच्छ, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या प्रवेशाची हमी देते,” अशी शिफारसही डॉ. रेहमान करतात. या पर्यायांमुळे केवळ वैयक्तिक आरोग्यच सुधारत नाही, तर प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानीही कमी होते.
डॉ. रेहमान सांगतात, “जागरूकता पसरवल्याने अधिक लोकांना प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी सुरक्षित पर्यायांकडे जाण्यास मदत होईल. दिवसातून नियमितपणे आठ ग्लास किंवा त्याहून अधिक पाणी प्या. लोक प्लास्टिकचा वापर कमी करू शकतात आणि त्याऐवजी पर्यायी वस्तू वापरून पर्यावरण आणि चांगल्या हायड्रेशनच्या पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन देऊ शकतात.”