Tooth Picking is Bad for Your Dental Health : जेवल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर अन्नाचे बारीक कण दातांमध्ये अडकून बसतात. त्यात दात किंवा दाढा किडल्या असतील, तर हे अडकलेले अन्नाचे कण फार त्रासदायक वाटू लागतात. अशा वेळी बहुतेक जण दातांमधील ते अन्नकण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करतात. विशेषत: घरातील काही वडीलधारी मंडळींच्या हातात दिवसभर ती टूथपिकची काडी दिसून येते. परंतु, त्याचा सततचा वापर चुकीचा आणि तितकाच दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याच विषयावर दंतचिकित्सक डॉ. सारा अलहममादी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात त्यांनी टूथपिकचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. यातही विशेषत: लाकडी टूथपिकचा वापर करू नका, असेही म्हटले आहे.

पण, दातांमध्ये टूथपिकचा वापर केल्याने नेमके काय होते यावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पीतमपुरामधील क्राउन हब डेंटल क्लिनिकच्या बीडीएस, एमडीएस (प्रोस्टोडोन्टिस्ट) डॉ. नियती अरोरा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Never Eat These Food Items With Tea
चहाच्या घोटासह चुकूनही खाऊ नका हे ६ पदार्थ; अचानक पोटात पित्त का वाढतं हे आहार तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Incense Sticks Causing Cancer
घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?

डॉ. नियती अरोरा म्हणाल्या, “जेव्हा आपण कुठे बाहेर जेवायला जातो तेव्हा दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी तिथे भरपूर टूथपिक ठेवलेल्या असतात. हल्ली अनेकांच्या घरीपण टूथपिकची डबीही पाहायला मिळते. पण, दातांत अडकलेले अन्नकण काढण्यासाठी टूथपिक वापरणे फायद्यापेक्षा जास्त नुकसानकारक ठरू शकते. टूथपिक कडक आणि अतिशय तीक्ष्ण असतात. त्यामुळे त्यांच्या सततच्या वापराने हिरड्यांना, तसेच दातांना दुखापत होऊ शकते.“

“जर तुम्ही दातांमध्ये वारंवार टूथपिक वापरत असाल, तर हिरड्यांचे दुखणे वाढणे, हिरड्यांना सूज येणे किंवा दातांमध्ये मोठी पोकळी तयार होणे, काही वेळा हिरड्यांना चीर पडून जखम होणे आदी त्रास होऊ शकतात. अशा वेळी हिरड्यांना जखमा झाल्यास त्यामुळे जीवाणूंचे संक्रमण वाढते. अशाने हिरड्या विविध संक्रमणांना बळी पडतात. काही वेळा टूथपिक दातांमध्ये जोर लावून वापरल्यास तिचा पुढचा तुकडा तुटतो आणि तो हिरड्या किंवा दातांमध्ये जाऊन अडकतो. अशाने रक्तस्राव होऊ शकतो, असेही डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले.

टूथपिकऐवजी सुरक्षित पर्याय

दातांमधील अन्नकण काढण्यासाठी टूथपिकऐवजी सुरक्षित पर्याय डॉ. अरोरा यांनी सुचविले आहेत. टूथपिकऐवजी तुम्ही फ्लॉस आणि इंटरडेंटल ब्रशेसचा वापर करू शकता. कारण- ते हिरड्यांच्या मऊ अस्तरांसाठी सुरक्षित मानले जातात.

फ्लॉसचे दोन प्रकार

एक सामान्यतः वापरला जाणारा थ्रेडेड फ्लॉस आहे आणि दुसरा एक वॉटर फ्लॉसर आहे; ज्यामध्ये पाण्याचा प्रवाह दातात अडकलेले अन्नकण बाहेर काढण्यास मदत करू शकतो. त्यामुळे हिरड्यांचेही नुकसान होत नाही. इंटरडेंटल ब्रश हे बॉटल ब्रशचे लहान व्हर्जन आहे. त्यांच्यामध्ये क्रिस्क्रॉस ब्रिसल्स असतात आणि ते अरुंद, मध्यम व मोठ्या अशा तीन सामान्य आकारांत येतात; जे दोन दातांमधील जागेशी संबंधित असतात, असे डॉ. अरोरा म्हणाल्या.

‘या’ परिस्थितीत टूथपिक वापरणे ठरू शकते हानिकारक

डॉ. अरोरा पुढे म्हणाल्या की, टूथपिकचा सततचा वापर हिरड्याच्या उतींना हानी पोहोचवू शकतो; ज्यामुळे रक्तस्राव, अस्वस्थता आणि कधी कधी संसर्ग होऊ शकतो.

एकच टूथपिक पुन्हा पुन्हा वापरल्यास तोंडाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जीवाणू हस्तांतरित करून संसर्गाचा धोका संभवतो.

टूथपिक्स काळजीपूर्वक वापरल्या तरीही टाळू, जीभ व गाल यांसारख्या तोंडातील नाजूक उतींना त्रास देऊ शकतात.

टूथपिक्स कधीही वापरू नये. विशेषत: हिरड्यांना सूज आली असेल किंवा पीरियडॉन्टायटिससारख्या स्थितीत टूथपिक वापरणे पूर्णपणे टाळा, असेही डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.

दातांची स्वच्छता राखण्यासाठी टूथपिक वापरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्याऐवजी नियमितपणे फ्लोराइड टूथपेस्ट वापरून सामान्य स्वरूपात ब्रश केल्याने हिरड्या आणि दातांमधून अन्नाचे कण काढता येऊ शकतात, असे डॉ. अरोरा म्हणाल्या.

सामान्य डेंटल फ्लॉस किंवा फ्लॉसिंगचा वापर करून दात आणि हिरड्यांमधील मोकळ्या जागेत अडकलेले अन्नाचे कण आणि प्लेक तुम्ही काढू शकता. टूथपिकऐवजी अँटीमायक्रोबियल माउथवॉश वापरा; ज्यामुळे जीवाणू काढून टाकण्यास आणि आपला श्वास ताजा करण्यास मदत मिळू शकते. वॉटर फ्लॉसर हा पारंपरिक फ्लॉसिंग किंवा टूथपिकला चांगला पर्याय आहे. वॉटर फ्लॉसर मशीनमध्ये दात आणि हिरड्यांच्या बाजूने स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा स्प्रे बसविलेला असतो; ज्याच्या मदतीने दात स्वच्छ करता येतात, अशीही अधिक माहिती डॉ. अरोरा यांनी दिली.