सध्याच्या काळात तिशीच्या दरम्यानच हृदयविकाराचा झटका येणे, रक्तदाब कमी होणे, मधुमेह असे आजार होऊ लागतात. हृदयविकाराचा झटका येण्यास आजकाल वयोमर्यादाच राहिलेली नाही. सध्याची आधुनिक जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. व्यायाम करण्याचा कंटाळा, बैठे काम, रात्री उशिरापर्यंत जागणे, उशिरा खाणे, झोपेचे नियोजन नसणे, अपुरी झोप अशा अनेक कारणांनी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. व्यायामशाळेत जातानाही आपली व्यायामाची क्षमता जाणून घेणे आवश्यक आहे. ट्रेंड आहे म्हणून जिमला जायचे आणि अतिव्यायाम करायचा हे आरोग्यासाठी योग्य नाही. रक्तदाब , कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर हे तीन शरीर सुदृढ आहे की नाही, हे सांगणारे महत्त्वाचे घटक आहेत. हृदयरोगतज्ज्ञांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना तिशीत पदार्पण करणाऱ्या तरुणांनी हृदयाची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच हृदयासंबंधित महत्त्वाच्या तीन चाचण्या त्यांनी सांगितल्या आहेत, त्या जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

‘या’ चाचण्या सांगतील हृदयाची अवस्था…

वयाची तिशी सुरू झाली की, सर्वांनी विशेषतः पुरुषांनी तीन चाचण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील साखर(मधुमेह चाचणी) , रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे तपासणे महत्त्वाचे आहे. रक्तातील साखर, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी हृदयविकाराचा धोका किती आहे, हे ठरवत असते. जर उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही वाढते. सकाळी उपाशीपोटी रक्तातील साखर मोजणारी चाचणी (फास्टिंग), दुपारच्या जेवणानंतरची रक्तातील साखर मोजणारी चाचणी प्रीडायबेटिस(मधुमेहपूर्व अवस्था) किंवा मधुमेह दर्शवू शकते. साखरेचे प्रमाण हृदयविकाराचा धोका किती आहे, हे दर्शवत असते. ‘फास्टिंग’ चाचणीतील साखरेचे प्रमाण ९९ डॉक्टरांनी शिफारस केली आहे की प्रत्येक 30 वर्षांच्या, विशेषत: पुरुषांनी, किमान तीन मूलभूत मापदंड तपासण्यासाठी चाचण्या कराव्यात – रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कारण प्रत्येकाची वाढलेली पातळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवते. रात्रीच्या उपवासानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी मोजणारी फास्टिंग ग्लुकोज चाचणी, प्रीडायबेटिस आणि मधुमेह दर्शवू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. उपवास रक्तातील साखरेची पातळी 99 मिलिग्रॅम किंवा त्याहून कमी असणे हे सामान्य म्हणजे नॉर्मल आहे. १०० ते १२५ मिलिग्रॅम असणे हे प्रीडायबेटिस म्हणजे मधुमेहपूर्व अवस्था आहे. १२६ हून अधिक असणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. तसेच एचबीए१सी (HbA1c) ही चाचणी तीन महिन्यातील रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते.

4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे
Marathi Actress tejaswini pandit sister Poornima Pullan gave birth to a baby girl
“१४ वर्षांचा अपत्यप्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला”, अभिनेत्री तेजस्विनी पंडित झाली मावशी; म्हणाली, “लक्ष्मी आली”

रक्तदाब चाचणी ही हृदयासंबंधित महत्त्वाची चाचणी आहे. रक्तदाब अनियंत्रित असल्यास त्याचा हृदयावर आणि हृदयाशी संबंधित धमन्या आणि कार्यावर विपरीत परिणाम होतो. उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धोका वाढवत असतो. त्यामुळे रक्तदाब किमान दोन वेळा तपासणे आवश्यक आहे. तसेच तो वेगवेगळ्या वेळेला तपासावा. १२०-८० हा रक्तदाबाचा ‘नॉर्मल रिपोर्ट’ आहे.
कोलेस्टेरॉल चाचणी म्हणजे ‘लिपिड पॅनेल’ किंवा ‘लिपिड प्रोफाइल’चाचणी होय. रक्तातील फॅट, रक्तातील चरबीचे प्रमाण मोजते. रक्तामध्ये अतिरिक्त कोलेस्टेरॉल असेल तर ते हृदयाभोवती असणाऱ्या धमन्यांमध्ये गोळा होण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात शरीरात कोलेस्टेरॉल असणे आवश्यक आहे. अतिरिक्त कोलेस्टेरॉल हे धोकादायक आहे. अतिरिक्त कोलेस्टेरॉल किंवा लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कोणती चाचणी करणे आवश्यक आहे, हे कसे ओळखावे?

अनेक तरुणांना आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांचा अंदाजच नसतो. स्वतःला तरुण समजत असल्यामुळे शरीरातील बदलांकडे ते लक्ष देत नाहीत. यासंदर्भात एम्स हॉस्पिटल, दिल्लीचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. राकेश यादव म्हणाले की, शरीरातील हृदय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यासंदर्भात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह या तीन चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तरुणांनी तीन ते पाच वर्षांनी या सर्व चाचण्या करणे आवश्यक आहे. तसेच काही शरीरात बदल जाणवत असल्यास या चाचण्या कराव्यात. वयाच्या चाळीशीनंतर दोन-तीन वर्षांनी या चाचण्या कराव्यात. अनुवांशिक धोका असेल तर वर्षातून एकदा चाचण्या कराव्यात. परिस्थितीनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजी, इकोकार्डियोग्राम किंवा ट्रेडमिल चाचण्या कराव्यात.

या चाचण्या आवश्यक का आहेत ?

रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल यांचा थेट हृदयाशी संबंध असतो. या तीन चाचण्यांच्या आधारे शरीरातील बदलांचा अंदाज येतो. कोलेस्टेरॉलचे प्रमाण, रक्तदाब आणि मधुमेह-पूर्वमधुमेह अवस्था यांचा अंदाज येतो. त्यानुसार हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यता, स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजार यासंदर्भात अंदाज येतो. वेळेवर काही लक्षणे समजल्यास उपचार करणे शक्य होते. या चाचण्यांद्वारे निदान झाल्यावर मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासंदर्भात उपचार करता येऊ शकतात. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआरच्या अभ्यासात असे आढळून आले की, ज्या लोकांना मधुमेहाचे निदान झाले त्यातील ७.७ टक्के लोक मधुमेह नियंत्रित ठेवू शकले. या चाचण्या करण्या मागील उद्देश हा पुढे येणारे संकट आधी ओळखण्याचा प्रयत्न करणे हेच आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांचा थेट संबंध जीवनाशी असतो. या तीन घटकांमुळे जीव जाऊ शकतो. या चाचण्या काही रोगांचे निदान करण्यास, त्यावर उपचार करण्यास मदत करु शकतात. भारतामध्ये सध्या मधुमेह आणि हृदयविकाराचे वाढते प्रमाण बघता, या चाचण्या आवश्यक आहेत, असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्लीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी म्हणाले.