सध्याच्या काळात तिशीच्या दरम्यानच हृदयविकाराचा झटका येणे, रक्तदाब कमी होणे, मधुमेह असे आजार होऊ लागतात. हृदयविकाराचा झटका येण्यास आजकाल वयोमर्यादाच राहिलेली नाही. सध्याची आधुनिक जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. व्यायाम करण्याचा कंटाळा, बैठे काम, रात्री उशिरापर्यंत जागणे, उशिरा खाणे, झोपेचे नियोजन नसणे, अपुरी झोप अशा अनेक कारणांनी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. व्यायामशाळेत जातानाही आपली व्यायामाची क्षमता जाणून घेणे आवश्यक आहे. ट्रेंड आहे म्हणून जिमला जायचे आणि अतिव्यायाम करायचा हे आरोग्यासाठी योग्य नाही. रक्तदाब , कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखर हे तीन शरीर सुदृढ आहे की नाही, हे सांगणारे महत्त्वाचे घटक आहेत. हृदयरोगतज्ज्ञांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना तिशीत पदार्पण करणाऱ्या तरुणांनी हृदयाची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच हृदयासंबंधित महत्त्वाच्या तीन चाचण्या त्यांनी सांगितल्या आहेत, त्या जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा