इंटरनेटवर अनेकदा अनपेक्षित प्रश्न विचारले जातात, जे वाचून अनेकांना धक्का बसतो. अशाच एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे. प्रश्न असा होता की, “कोमामध्ये असलेल्या महिलेला मासिक पाळी येते का? प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेतले.

चला तर मग जाणून घेऊया : “कोमामध्ये असलेल्या महिलांना मासिक पाळी येते का किंवा ते जागे होईपर्यंत थांबते का?”

कोमा म्हणजे काय? (What is a coma?)

कोमामध्ये जाणे म्हणजे अर्ध-चेतनाची स्थिती, ज्यामध्ये व्यक्ती प्रतिसाद देत नाही आणि जागे होऊ शकत नाही.

“व्यक्ती कोणतीही हालचाल न करता बेडवर झोपून राहते. त्यांना आजूबाजूला काय चालले आहे ते समजत नाही आणि ते कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद देत नाहीत. कोमाची कारणे एन्सेफलायटिस (Encephalitis) आणि मेनिंजायटिस (Meningitis) आहेत, ज्यामुळे ब्रेन इनफ्लमेशन (Brain Inflammation) होते आणि मेंदुला सूज येते,”असे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. राजश्री तायशेटे भासले (Tayshete Bhasale) यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

हृदयविकार, मधुमेह, यकृत किंवा मूत्रपिंड निकामी होणे, हायपोथर्मिया (Hypothermia- अशी स्थिती, ज्यामध्ये शरीराचे तापमान सामन्यापेक्षा जास्त असते), ड्रग्स आणि अल्कोहोलचा अतिवापर आणि इलेक्ट्रोक्युशन आणि विषारी पदार्थांचे सेवन, स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, ट्रॅमॅटिक ब्रेन इंज्युरी (TBI) या कारणांमुळे एखादी व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते, कारण मेंदू प्रतिसाद देत नाही,” असे डॉ. भासले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –World Heart Day 2024 : रोज एक कप गरम कोको पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

कोमात असलेल्या महिलांना मासिक पाळी येते का? (So, do women in coma get their period?)

डॉ. भासले यांनी सांगितले की, प्रजनन प्रणाली कोणत्याही दुखापतीशिवाय कार्यरत असेल तर मासिक पाळी येते. अशा परिस्थितीत, शरीर त्याचे नियमित कार्य चालू ठेवेल. कोमात जाण्यापूर्वी जशी दर महिन्याला मासिक पाळी येत होती तशीच नंतरही येते.

पण, काही महिलांसाठी अयोग्य पोषण किंवा PCOS सारख्या इतर आजारांमुळे रक्त प्रवाह कमी असू शकतो. “पीरियड्स ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि इतर आरोग्य समस्या नसल्यास एखाद्या महिलेला कोमामध्येही मासिक पाळी येऊ शकते”, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हैदराबाद, अपोलो हॉस्पिटल्स, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी स्पष्ट केले की, “पुनरुत्पादक वयोगटातील महिलांना कोमामध्ये असताना मासिक पाळी येऊ शकते. कोमात असलेल्या व्यक्तीच्या प्रजनन अवयवांवर नव्हे तर मेंदूवर परिणाम होतो, त्यामुळे महिलांना (मासिक पाळी सुरू झाल्यानंतर आणि रजोनिवृत्तीपूर्वी) मासिक पाळी येऊ शकते, अगदी बेशुद्ध असतानाही. कोमामध्ये असताना इतर शारीरिक कार्ये जसे की, लघवी आणि शौचासदेखील होते”

हेही वाचा –तुम्ही रोज ‘च्युईंगम’ चघळता का? आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा…

पण थांबा…सर्व संकेत आणि सर्व शारीरिक कार्ये नियंत्रित करण्यासाठी मेंदू जबाबदार नाही का? (But wait…isn’t the brain responsible for all the cues and controlling all bodily functions?)

शरीराच्या ऐच्छिक हालचाली, संवेदना, बोलणे, दृष्टी, श्रवण इ. यांसारख्या कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदू जबाबदार असतो. त्यामुळे कोमात असलेली व्यक्ती हात आणि पाय हलवू शकत नाही, संवेदना जाणवू शकत नाही किंवा पाहू किंवा ऐकू शकत नाही.

पण, डॉ. कुमार यांनी नमूद केले की, “मासिक पाळीसारखी काही कार्ये मेंदूद्वारे नियंत्रित होत नाहीत. जागरूक व्यक्ती ठराविक काळासाठी लघवी आणि शौचास नियंत्रित करू शकते. पण, बेशुद्ध व्यक्तीमध्ये एकदा मूत्राशय भरले की, मूत्र बाहेर सोडले जाते (काही प्रकरणांमध्ये मूत्राशयात मूत्र ठेवता येते, ज्यासाठी मूत्र कॅथेटर वापरले जाते). कोमॅटोज व्यक्तीमध्ये लघवी आणि विष्ठा तयार होत राहते,” असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.