Can Salt Reduce Your Headache: मीठ कमी खावं हा सल्ला आपण अनेकदा ऐकला असेल. रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, वजन या सगळ्या त्रासांवर मिठाचा कमी वापर हा उपाय ठरू शकतो. पण मुळातच शरीराला मूलभूत चयापचय कार्यासाठी सोडियमची आवश्यकता असते. सेज वर्किंगर, 10X हेल्थचे सह-संस्थापक, यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये मीठ हे डोकेदुखीसाठी कसे आरामदायक ठरू शकते याविषयी माहिती दिली आहे. मीठ म्हणजे आपण नियमित वापरतो ते पांढरे मीठ नव्हे तर हिमालयीन समुद्री मीठातून मिळणारे सोडियम हे शरीराला फायदेशीर ठरू शकते असे लुईस यांनी म्हटले आहे. नेमकं यात तथ्य आहे का आणि समुद्री मिठाचा डोकेदुखीशी काय संबंध आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया..

हिमालयन समुद्री मीठ किंवा सैंधव (गुलाबी) मीठ जर तुम्ही पाण्यात मिसळलं तर हे पाणी जास्त खारट होत नाही. उलट हे मीठ तुमच्या उतींमध्ये पाणी पोहोचण्यास मदत करू शकते ज्यामुळे शरीर हायड्रेट होऊ शकते. अनेकदा डोकेदुखीचे मुख्य कारण हे तुम्ही कमी पाणी पिणे हेच असते. शरीराला आवश्यक तितके पाणी मिळाले नाही तर डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते, विशेषतः मायग्रेनचा त्रास होणाऱ्यांना तर हे खूपच घातक असते.

coriander juice beneficial for weight loss
Coriander Juice : खरंच कोथिंबिरीचा रस प्यायल्याने वजन कमी होते? जाणून घ्या, हा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
How many times in a week you should wash your bath towels Using dirty towels can cause skin diseases
बापरे! रोज टॉवेल न धुता वापरताय? यामुळे होऊ शकतात त्वचेचे गंभीर आजार, वाचा तज्ज्ञांचे मत
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
Migraine Relief Trick soaking feet in hot water
Migraine Relief Trick : १५ ते २० मिनिटे गरम पाण्यात बुडवून बसा पाय! मायग्रेनची समस्या होईल कमी? वाचा डॉक्टरांचे मत
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Vitamin B12 Deficiency
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे? ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
metal spoon in honey
धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकते? तज्ज्ञ काय सांगतात…

वर्किंगरच्या मते, हिमालयीन गुलाबी मिठाच्या सेवनाने हरवलेले सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्स भरून काढता येतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशींद्वारे पाण्याचे योग्य शोषण होण्यास मदत होते. त्यामुळे डोकेदुखी होत असल्यास आपण १ ते २ ग्लास पाण्यात मीठ मिसळून प्यावे.

डोकेदुखी आणि मायग्रेन कशामुळे होते?

शिवानी बाजवा, सीईओ आणि संस्थापक, योगसूत्र होलिस्टिक लिव्हिंग यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) हे डोकेदुखीचे एक महत्त्वाचे कारण असते. डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास भूक न लागणे सामान्य आहे तसेच खाल्ल्यावरही उलटी, मळमळ हा त्रास होऊ शकतो. यामुळे शरीरात द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स दोन्हीची कमतरता होते, रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी असल्याने डिहायड्रेशन होण्यास हातभार लागतो. सोडियम, एक आवश्यक इलेक्ट्रोलाइट असल्याने, आपल्या पेशींमध्ये पाणी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, क्लोराईड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स योग्य हायड्रेशनसाठी आवश्यक आहेत.

न्यूट्रिशनिस्ट मुग्धा प्रधान, सीईओ आणि संस्थापक, iThrive यांनी सांगितले की, जेव्हा डिहायड्रेशन होते तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स – सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असलेले पाणी डोकेदुखी कमी होण्यास मदत करू शकते. खरंतर केवळ सोडियममुळे डोकेदुखी काही वेळा लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, म्हणूनच मिठाचे पाणी मदत करते. परंतु सर्व इलेक्ट्रोलाइट्स मिळवणे अधिक प्रभावी आहे. तुम्ही चांगल्या इलेक्ट्रोलाइट पावडर किंवा ओआरएस सोल्यूशनचे सेवन करू शकता.

मीठ प्रभावी आहे का?

बाजवा यांनी नमूद केले की मिठामुळे अमुक फायदा होतो हे जरी खरे असले तरी त्याची परिणामकारकता व्यक्तिपरत्वे बदलू शकते. प्रत्येकाच्या बाबतीत हा उपाय काम करू शकतो असे नाही. तीव्र किंवा गंभीर डोकेदुखीच्या बाबतीत, योग्य निदान आणि योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

दुसरीकडे, प्रधान यांनी नमूद केले की हिमालयीन गुलाबी मीठ किंवा समुद्री मीठ हा सोडियमचा चांगला स्रोत आहे. तर मॅग्नेशियम ग्लायसिनेट सारखे सप्लिमेंट सुद्धा मॅग्नेशियम मिळवून देण्यासाठी उपयुक्त आहे, सहसा हे आवश्यक पोषकसत्व फक्त आहारमधून मुबलक प्रमाणात मिळत नाही त्यामुळे अशा अतिरिक्त सप्लिमेंट आपल्याला मदत करु शकतात पण त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. पोटॅशियमचे सेवन आवश्यक असेल तरी त्याचा अतिरेक प्राणघातक ठरू शकतो. गोळ्या किंवा औषधे घेण्याऐवजी आपण पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की अॅव्होकॅडो, नारळपाणी, केळी आणि पिस्ते आहारात जोडू शकता.

हे ही वाचा<< ‘ॲनिमल’साठी बॉबी देओलने चार महिने ‘हा’ मुख्य फंडा वापरून वजन केलं कमी; तज्ज्ञांनी सांगितलंय कॅलरीजचं गणित 

काय लक्षात ठेवावे?

सोडियम-पोटॅशियम असंतुलन केवळ समुद्री मीठाच्या सेवनाने कमी करून डोकेदुखी पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही. “आतड्यांसंबंधी समस्या, यकृताची जळजळ आणि ट्रेस खनिजांची कमतरता यासह इतर मूळ कारणांचे सुद्धा निरीक्षण करायला हवे. थकवा दूर करणे, सर्कॅडियन लय राखणे, झोपेची पद्धत सुधारणे आणि तणावाचे व्यवस्थापन हे डोकेदुखी कमी करण्यासाठी महत्त्वाचे असते, असेही बाजवा यांनी स्पष्ट केले.