पल्लवी सावंत पटवर्धन
‘मला दालचिनीचं पाणी देऊ नको गं . मी पाहिलंय ते पिऊन माझं पोट बिघडतं आणि इतकी जळजळ झाली पिताना की कसंबसं सहन करत प्यायले मी’, मीनाक्षी सांगत होती.
जळजळ ? किती दालचिनी वापरलीस?, मी विचारलं.
‘अर्धा चमचा फक्त आपण जिरेपूड वापरतो तशीच’
माझा अंदाज खरा ठरला होता. लिहिलेलं सगळं वरंवर वाचून मीनाक्षीने भरमसाठ दालचिनी वापरली होती.
‘अगं एक चिमूट असं लिहिलंय मी’, मी तिच्यासमोर पुन्हा डाएट प्लॅन वर लिहिलेलं प्रमाण अधोरेखित केलं.
ओह तरीच !! मीनाक्षी अविश्वासाने पुन्हा डाएट प्लॅन चेक करत म्हणाली. मी ते नेहमी जिरं घेतो तसं घेतलं गं.
मीनाक्षीला सगळा तक्ता मी पुन्हा समजावून सांगितला आणि दालचिनीबद्दल तिला माहिती देऊन सजग केलं.
दालचिनी हा घराघरात वर्षानुवर्षे वापरला जाणारा औषधी आयुर्वेदिक पदार्थ. इतिहासात थोडं डोकावून पहिले तर अगदी ग्रीक, रोमन आणि इजिप्तच्या संस्कृतीमध्ये दालचिनीला खूप महत्व आहे. केवळ आयुर्वेदिक उपचारच नव्हे तर राजस जीवनशैलीचा भाग म्हणून दालचिनीचं विशेष महत्त्व आहे.
मानवी शरीरात संतुलन राखण्यासाठी दालचिनी विशेष गुणकारी आहे. दालचिनीचे विविध प्रकार असतात.
हेही वाचा >>> Back Walk: चालण्याच्या पद्धतीत केलेला ‘हा’ छोटा बदल, स्नायूंची शक्ती व मेंदूची तीक्ष्णता वाढवायला करतो मोठी मदत
सिलोन/ मेक्सिकन दालचिनी – चवीला गोडसर आणि तिखट, रंगाने फिकट तांबूस आणि कौमारिनचे माफक प्रमाण
इंडोनेशियन दालचिनी – मसालेदार , गडद लाल रंग , तीव्र गंध ,कौमारिनचे उत्तम प्रमाण
व्हिएतनामी दालचिनी – मसालेदार आणि गोड , गडद लाल रंग, तीव्र गंध , कोमरीनचे उत्तम प्रमाण
चिनी दालचिनी – मसालेदार आणि कडू तीव्र चव ,तांबूस रंग , कौमारिनचे सगळ्यात जास्त प्रमाण
दालचिनीच्या खोडापासून ते पानापर्यंत विविध प्रकारची तेल मिळवले जाते. उदाहरणार्थ दालचिनीच्या खोडामधून सिनॅमल्डिहाइड , पानापासून युजिनॉल , तर मुळापासून कापूर तयार होतो.
टाईप २ मधुमेह असणाऱ्यांसाठी दालचिनी अतिशय गुणकारी आहे. अन्नामधून शरीरात तयार होणाऱ्या ग्लायसेमिक इंडेक्सवर अंकुश ठेवणे. वाढत्या इन्शुलिन वर अंकुश ठेवणे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे. यासारखे उत्तम फायदे मधुमेह असणाऱ्यांना मिळू शकतात. विशेषतः चिनी दालचिनी मधुमेह असणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त आहे. ०.१ मिलिग्रॅम इतकी दालचिनी जरी नियमित आहारात समाविष्ट केली तरीदेखील रक्तातील शर्करेवर आवश्यक परिणाम दिसून येतो.
हेही वाचा >>> ६ तासांच्या इंटरमिटेंट फास्टिंगनंतर सर्वात आधी फायबर का खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
दालचिनीचे पाणी डिमेन्शिया असणाऱ्या लोकांसाठी देखील गुणकारी आहे. दालचिनीमुळे मेंदूची क्षमता वाढून त्याला उत्तम चालना मिळू शकते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून मेंदूला उत्तम चालना देण्याचं कामी दालचिनी करू शकते. दालचिनीचे नियमित सेवन अल्झायमरसारख्या विकारांपासून दूर ठेवण्याचे काम करते. श्वसनाचे विकार असणाऱ्यांसाठी दालचिनी औषधी आहे. अनेक श्वसन विकार असणाऱ्यांना सीतोपलादी चूर्ण घ्यायला सांगितले जाते- यातील मुख्य घटकद्रव्य दालचिनी आहे.
पाण्यात भिजवून दालचिनीचे पाणी पिणे
दालचिनी पावडर पाण्यात मिसळून घेणे
दुधाचे पदार्थ तयार करताना त्यात दालचिनी वापरणे.
तुपात दालचिनी शिजवून घेणे.
दालचिनी आणि खडीसाखर एकत्र करून खाणे.
अशाप्रकारे दालचिनी आहारात औषध म्हणून वापरली जाऊ शकते.
आतड्याचे विकार, त्वचेचा मलूलपणा आणि कोरडेपणा , पोटाचे विकार . श्वसनाचे विकार, रक्तदाब कमी करणे यासाठी दालचिनी अत्यंत गुणकारक आहे .
दालचिनीमध्ये असणाऱ्या विशेष स्निग्धांशामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करण्याचे काळ दालचिनी करते. उत्तम उर्जेसोबत वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा आहार शास्त्रात महत्व आहे. तसेच हृदयविकारपासून दूर राहण्यासाठी , आतडयाच्या कर्करोगापासून रक्षण करण्यासाठी देखील दालचिनी उपयुक्त आहे . शरीरातील अनावश्यक सूक्ष्मजीवांसाठी मारक आणि आवश्यक सूक्ष्मजीवांसाठी पोषक अशी दालचिनी आहारशास्त्रज्ञांचं लाडकं सुपरफूड आहे. दालचिनीचे अतिरिक्त प्रमाण मात्र तितकंच हानीकारक ठरू शकतं. अनेकदा चमचाभर दालचिनी पाण्यातून घेतल्याने पोट बिघडणे , जीभ जडावणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आहारात दालचिनी किंवा दालचिनीचे पाणी समाविष्ट करताना ते माफक प्रमाणातच असेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः थंडीच्या दिवसात सातत्याने दालचिनी टाकून चहा किंवा पाणी पिणे आवर्जून टाळावे.