निरोगी आयुष्यासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरीत्या कार्य करण्यासाठी तुम्ही तुमचे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. चुकीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यासह इतर अवयवांचेदेखील नुकसान होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे गंभीर समस्या उद्भवतात. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटांतल्या लोकांना होताना दिसून येतो. आपली जीवनशैली, आहारविहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकीच बद्धकोष्ठता हा एक आजार आहे. बद्धकोष्ठता म्हणायला एक छोटीशी समस्या आहे; पण त्याचे दुष्परिणाम खूप धोकादायक असू शकतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी व बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणते फळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, याविषयी फरिदाबादच्या एशियन हॉस्पिटलच्या प्रमुख आहारतज्ज्ञ कोमल मलिक यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

(हे ही वाचा: रक्तातील खराब युरिक अ‍ॅसिड झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ पाच पदार्थ; डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत )

खराब कोलेस्ट्रॉल कमी करते

आहारतज्ज्ञ सांगतात, “सध्या थंडीचा हंगाम आहे. पेरूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. पेरू हिवाळ्यातच नाही, तर प्रत्येक ऋतूत आवडीनं खाल्ला जातो. पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पेरूचे सेवन केले पाहिजे. हे फळ कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी करू शकते. सर्वोत्तम भाग म्हणजे ते शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या विकासास प्रोत्साहन देते. हे दिसायला एक सामान्य फळ आहे; पण त्याचे आरोग्य आणि निरोगीपणासाठी खूप फायदे आहेत. हे आहारातील फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, नियासिन, थायामिन, रिबोफ्लेविन, कॅरोटीन व लायकोपिन यांसारखे अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे.”

पेरूमध्ये सॉल्युबल फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते; जे तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच तुमच्या शरीरातील अतिरिक्त जमा झालेली चरबीदेखील नष्ट करण्यास मदत करते. पेरू खाल्ल्यामुळे तुमच्या हृदयाचे कार्यही सामान्य राहते. पेरू खाल्ल्यामुळे आपले चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.

(हे ही वाचा: शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..)

मधुमेहावर नियंत्रण

तज्ज्ञांच्या मते, पेरू खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. मधुमेह एक अशी समस्या आहे; ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. ही समस्या शरीरात निर्माण होणाऱ्या इन्सुलिनला अडथळा निर्माण होण्याने उदभवते. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच जीआय असतो; ज्यामुळे साखर नियंत्रित राहते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पेरू हे मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे. पेरूमध्ये भरपूर फायबर असते. ते रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते. पेरू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम फळ मानले जाते.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर

पेरूमध्ये भरपूर फायबर असते; ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन, पचन चांगले होते. त्यासोबतच पचनक्रियाही निरोगी राहते. पेरू थंड असतो. पोटाचे अनेक आजार दूर करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते; जे अनेक रोगांना दूर ठेवण्यास फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of eating guavas guava is a powerhouse fruit to lower cholesterol control diabetes and ease constipation pdb
Show comments