हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेकशन्स होण्याचा धोका वाढतो. अशा आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, घशातील खवखव, सतत ताप येणे अशा समस्यांनी अनेकजण त्रस्त असतात. या आजारांपासून वाचण्यासाठी मनुके फायदेशीर असल्याचे मानले जाते. मनुके खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.
मनुके खाण्याचे फायदे
हाडांना मजबूत करते
मनुक्यांमध्ये कॅल्शियम आढळते, जे हाडांना आणि दातांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. मनुक्यांमध्ये बोरान हे पोषकतत्त्व आढळते, जे कॅल्शियम शोषून घेते. त्यामुळे मनुके खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हिवाळ्यात होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मनुके खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
आणखी वाचा : Heart Attack येण्यापुर्वी महिलांमध्ये दिसतात ही १२ लक्षणं; वेळीच व्हा सावध
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास त्यासाठी ठरते फायदेशीर
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज ८ ते १० मनुके खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास रक्ताची पातळी वाढवण्यास फायदेशीर ठरते. यामध्ये आढळणारे आयरन एनीमियाला दुर ठेवण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
मनुके शरीरातील फॅट सेल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मनुके फायदेशीर ठरतात.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)