नवी दिल्ली : प्रेम म्हणजे आजार असे वर्षांनुवर्षे समजण्यात येत आहे. प्रेमात पडणाऱ्या व्यक्तीवर उपचार करण्याचेही अनेक जण समर्थन करतात. परंतु एका नव्या संशोधनानुसार प्रेयसी- प्रियकराच्या सहवासामुळे काही गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी मदत होते.
हेही वाचा >>> Mental Health Special : दिवाळीत बिंज वॉच करणार आहात? मग हे वाचाच!
प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आरोग्य चांगले राहते. ‘ब्रेन, बिहेव्हिअर अॅन्ड इम्युनिटी’मध्ये यासंबंधी संशोधन प्रकाशित झाले आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे शरीर आणि मानसिक स्थितीचे नुकसान करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते. तर, सदृढ आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या संप्रेरकांमध्ये वाढ होते, असे ‘नॉर्थ कॅरोलाइना’ विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे.
या संशोधनासाठी प्रेमात पडलेल्या ५० व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यांनी प्रिय व्यक्तीच्या सहवासात तीन महिने व्यतीत केल्यानंतर त्यांच्या आरोग्यासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यांच्या विविध शारीरिक चाचण्याही करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रियकर, प्रेयसीच्या सहवासामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी झाल्याचे आढळले.