Benefits of Drinking Okra Water: हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. भेंडी खाणे बहुतेक सर्वांनाच आवडते. ही भाजी प्रत्येक हंगामात बाजारात सहज उपलब्ध असते. अनेकप्रकारचे पौष्टिक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळेच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. पण, फक्त भेंडीची भाजीच नाही तर त्याचे पाणीदेखील खूप फायदेशीर असते असे काही तज्ज्ञ सांगतात. बेंगळुरू येथील अथ्रेया हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ, अक्षिता रेड्डी यांनी भेंडीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, याविषयी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा