कडुलिंब, तुळशी प्रमाणे शमीच्या वनस्पतीमध्येही औषधीय गुणधर्म आहेत. ही वनस्पती आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शमीतील औषधीय गुणधर्मांमुळे ती सर्दी, खोकला, जुलाब, मुळव्याध, श्वसन आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरू शकते. या वनस्पतीमुळे आरोग्याला कोणते लाभ होतात, याबाबत जाणून घेऊया.
१) वाईट कोलेस्टेरॉल कमी करते
शमीच्या पानांमध्ये अँटिहायपरलिपिडेमिक असते जे अँटिऑक्सिडेंट सारखे काम करते. ते रक्तातील लिपिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवते आणि वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यात मदत करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
(‘या’ जीवनसत्वाच्या अभावानेही होऊ शकते कंबरदुखी, आराम मिळण्यासाठी करा ‘हे’ उपाय)
२) त्वचेसंबंधी समस्यांमध्ये फायदेशीर
त्वचेसंबंधी समस्यांवर शमीचे लाकूड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवरील फोडांपासून सुटका मिळवण्यासाठी शमीचे लाकूड घासून त्यास प्रभावित जागेवर लावा, याने लवकर आराम मिळेल.
३) पोट निरोगी ठेवते
जर तुम्हाला जुलाबाचा त्रास असेल तर शमीची पाने धुतल्यानंतर त्यास काळी मिरी आणि मधासोबत खाल्ल्यास आराम मिळू शकते.
(त्वचेवर स्ट्रेच मार्क्स आहेत? करा हे ४ उपाय, फरक दिसेल)
४) शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते
शरीराचे तापमान वाढल्यास शमीच्या पानांचे रस काढून त्यास पाण्यात जिरे आणि साखरेसह मिसळा आणि प्या. याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)