Health Benefits of Raisin Water: आरोग्याची काळजी असणाऱ्या भल्या माणसाने गोड खाण्यापासून जरा दोन हात लांबच राहावं असं अनेकदा म्हंटल जातं. पण आपल्या भारतीय किचनमधील काही असे पदार्थ आहेत जे गोड असूनही आरोग्याला फायदेशीर ठरतात. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे मनुके. मनुक्यांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी तसेच फायबर व लोह यामुळे हृदय, लिव्हर, कोलेस्ट्रॉल अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. AIIMS चे माजी सल्लागार व साओल हार्ट केअर सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. विमल झांझर (एमबीबीएस, एमडी) यांनी सुक्या मेव्याचे सेवन व मनुक्याचे पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनुक्याचे पाणी हे शरीरातील लोहाची कमी भरून काढण्यास फायदेशीर ठरू शकते. मनुक्यांमधील व्हिटॅमिन सी हा शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतो. याचप्रमाणे शरीरात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवण्यासाठी मनुके गुणकारी आहेत. तुमच्या शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसह त्वचेवर ग्लो आणण्यासाठी सुद्धा मनुका कामी येऊ शकतो. याशिवाय असे काही आजार आहेत ज्यामध्ये मनुक्याचे सेवन हे एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे काम करू शकते.

वजन वाढवण्यासाठी ( Raisin Water For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी जास्त खाण्याची नव्हे तर योग्य पदार्थ खाण्याची जास्त गरज असते. मनुके भिजवून ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास वजन वाढीत मदत होऊ शकते. मनुक्यांचे कॅलरीज शरीराला केवळ वजन वाढवण्यासतच नव्हे तर स्नायूंना मजबूत करण्यातही मदत करू शकतात.

हिमोग्लोबिन कमी असल्यास.. (Anemia)

जर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर मनुक्याच्या पाण्याचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. मनुक्यांमध्ये असणाऱ्या लोहामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढू लागते. रक्तपेशींमध्ये वाढ झाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या रुग्णानानी तर मनुक्याच्या पाण्याचे सेवन आवर्जून करावे.

शौचाच्या समस्या (Raisin water For Constipation)

ज्या मंडळींना पोट साफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी मनुक्याचे पाणी आवर्जून प्यावे. मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर उपलब्ध असते ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठचा त्रास असल्यास मनुक्याचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते व मल मूत्र शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मनुके चावून खावेत व मनुके भिजवून ठेवलेले पाणी सुद्धा प्यावे.

हे ही वाचा<< पिवळ्या दातांवर करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, पांढरेशुभ्र दात दाखवून आता खुलून हसा

लिव्हर डिटॉक्स (Raisin water Detoxifies Liver)

रात्री एका ग्लासात १० ते १२ मनुके भिजवून ठेवावे व सकाळी हेच पाणी व मनुके दोन्हीचे सेवन करावे. सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे प्रणयी पयायल्याने नैसर्गी पद्धतीने लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरच्या समस्येवर हे रामबाण उत्तर ठरू शकते.

केव्हा व कसे प्यावे मनुक्याचे पाणी?

मनुक्याचे पाणी शक्यतो सकाळी रिकाम्या पोटीच प्यावे. या पाण्याचे सेवन करताच किमान अर्धा तास अन्य काहीही खाऊ नये. मनुक्याचे पाणी प्यायला सुरुवात केल्यावर एका आठवड्यानंतर तुम्हाला त्याचे लाभ दिसून येऊ शकतात.

मनुक्याचे सेवन कोणी टाळावे?

१०० ग्रॅम मनुक्यांमध्ये ३०० कॅलरीज असतात त्यामुळे जी मंडळी वजन कमी करण्याच्या मोहिमेवर आहेत त्यांनी मनुक्याचे सेवन टाळावे. तसेच जर तुम्हाला रक्तदाबाचा किंवा ब्लड शुगरचा त्रास असेल तर मनुके खाणे टाळावे.