प्रेम व्यक्त करताना साथ देणारं गुलाब तुमच्या तब्येतीसाठी तितकंच उपयुक्त आहे असं सांगितलं तर. गुलाबाचे आरोग्यासाठीचे फायदे आहारतज्ज्ञांनी टिपले आहेत. विविध प्रकारात गुलाबाचं सेवन प्रकृतीसाठी गुणकारी ठरु शकतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मला माझं रोजचं रोझ इन्फ्युजन आवडतंय. खरं सांगायचं तर गेले काही दिवस झोप पण खूप छान पूर्ण होतेय’, निमाली सांगत होती. निमालीच्या स्वरात आश्चर्य आणि समाधान दोन्ही जाणवत होतं.
‘आय एम सुपर हॅप्पी फॉर यू’, मी उत्तरले. आहारात गुलाबाच्या पाकळ्यांचा समावेश करताना निमालीने आढेवेढे घेत हे पण करून पाहते असं म्हटलं होतं.
त्यामुळे तिला जाणवलेल्या परिणामामुळे गुलाब आहारात असण्यावरचा माझाही विश्वास वाढला.

गुलाब – अनेक पिढ्यानी विश्वासाने प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरं केलेलं फूल. कधी सिनेमांमधून तर कधी कथाकल्पनांतून वेगेवेगळ्या रूपात प्रतीक म्हणून बिंबवलं गेलेलं फूल. रक्ताचा रंग लाल म्हणून हृदयीचे गूज सांगणारं लाल फूल म्हणजे गुलाब -असं आपल्या मनावर कोरलं गेलेलं फूल.

आहारशास्त्रामध्ये मात्र गुलाब , त्याच्या विविध गुणांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्या वाळवलेल्या रूपात जास्त महत्वाच्या आहेत.

हेही वाचा : Mental Health Special : कसं तयार होतं व्यसनाचं मॉडेल?

वाळवलेल्या पाकळ्यांमध्ये पोषणघटकांचे उत्तम प्रमाण आढळून येते. साधारण १०० ग्राम पाकळ्यांमध्ये ७०ग्राम कर्बोदके (कार्ब्स ), १.२ ग्राम तंतूमय पदार्थ (फायबर ), ३ मिग्रॅ लोह , १२० मिग्रॅ इतकं कॅल्शिअम आढळते. शिवाय गुलाबाच्या पाकळ्यात आढळणारे फ्लॅव्होनॉइड्स आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचे अनेक उपयोग आहेत. त्यातील काही उपयोग खालीलप्रमाणे :.

-मानसिक ताण कमी करणे.

-आतड्याचे स्वास्थ्य जपणे

-अजीर्ण कमी करणे .

-कोरड्या त्वचेची आर्द्रता राखणे

-त्वचा तजेलदार होणे

-पेशींचे आरोग्य जपणे

-मासिक पाळीदरम्यान पोटदुखी कमी करणे

-उत्तम झोप लागणे

-स्नायूंचा थकवा कमी होणे .

-सर्दी खोकला कमी करणे

-शरीराचे तापमान कमी करणे

-खाद्य पदार्थाला नैसर्गिक रंग देणे

हेही वाचा : तुम्हाला चाट खायला आवडते? कोणते चाट आरोग्यासाठी चांगले ते जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून….

-खाद्य पदार्थांमध्ये गोडसर चव आणणे

-हृदय रोगापासून रक्षण करणे

गुलाबाचा आहारात नियमितपणे वापर करण्यासाठी

१. गुलकंद : गुलाबाच्या पाकळ्या आणि गूळ किंवा साखर एकत्र करून तयार केलेला गुलकंद विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत फायदेशीर असतो. पोटाचे आणि मनाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी तसेच शरीरात थंड पदार्थ खाण्यापेक्षा १ छानसा गुलकंद नियमित खाणे उन्हाळ्यातील गोड पदार्थांच्या क्रेविंग्स पासून रक्षण करू शकते.

२. गुलाबाचे पाणी – ज्यांना पित्त विकार आहेत त्यांच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर भिजत घालून सकाळी पाणी प्यायल्यास उत्तम आराम पडतो. ज्यांना रुक्ष त्वचा किंवा तारुण्यपिटिका आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या भिजवून पाणी प्यायल्यास साधारण ३ ते ६ आठवड्यात उत्तम परिणाम दिसून येतात.

हेही वाचा : Health Special : चॉकलेटचा कुठला प्रकार तुम्हाला ठेऊ शकतो फिट?

३. वाळवलेल्या पाकळ्या : गुलाबाच्या वाळवलेल्या पाकळ्या चहामध्ये एकत्र करून प्यायल्यास ऍसिडिटी कमी होते. कॉफीच्या पाण्यात किंवा गरम दुधात गुलाबाच्या पाकळ्या एकत्र केल्यास त्याला उत्तम रंग येतो तसेच कॉफी आणि दुधाला हलका गोडसर स्वाद देखील येतो. अनेक कॉफीच्या दुकानांमध्ये देखील गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर कॉफी तयार करताना वापरली जाते. घरच्या घरी लाडू तयार करताना देखील सुक्यामेव्यासोबत गुलाबाच्या पाकळ्या त्यात एकत्र करू शकतो.

मग , तुम्ही तुमच्या आहारात गुलाब कधीपासून वापरायला सुरुवात करताय?

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of rose which is a symbol of love hldc css