पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासामध्ये आपल्या कारमधील हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वॉशिंग्टनमधील सायन्स जर्नलच्या संशोधकांना वैयक्तिक वाहनांच्या केबिन एअरमध्ये कर्करोगास कारणीभूत रसायने (कार्सिनोजेन)ची धोकादायक पातळी आढळली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑर्गनोफॉस्फेट एस्टर्स (OPEs) नावाच्या रसायनांच्या गटावर या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात आले; जे सामान्यपणे गाडीतील सीट कुशन आणि पॅडिंगमध्ये वापरले जातात. या रसायनांमध्ये TCIPP नावाचा समावेश आहे. हे रसायन चाचणी केलेल्या तब्बल ९९ टक्के वाहनांमध्ये आढळले. चिंतेची बाब म्हणजे सध्या यूएस नॅशनल टॉक्सिकोलॉजी प्रोग्रामद्वारे TCIPP मधील कर्करोगास कारणीभूत असण्याची क्षमता तपासण्यात येत आहे.

डॉ. पाखी अग्रवाल, वरिष्ठ सल्लागार, स्त्रीरोग ऑन्कोलॉजी व रोबोटिक सर्जन, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले की, या प्रदूषकांच्या दीर्घकालीन संपर्कात राहिल्यास विशेषत: गॅरेजसारख्या बंदिस्त जागेत, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसानाचे आजार तसेच इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वाढू शकते.

डॉ. अग्रवाल यांनी पुढे सांगितले, “अधूनमधून एक्सपोजरमुळे कर्करोगाचा धोका तुलनेने कमी असला तरी योग्य व्हेंटिलेशन राखणे, वाहनांच्या उत्सर्जनाचा संपर्क कमी करणे आणि ऑटोमोटिव्ह घटकांसह काम करताना सुरक्षेच्या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.”

कार्सिनोजेन्सच्या संपर्कात आल्यास कोणत्या समस्या उदभवतात?

“वाहनांचे उत्सर्जन आणि अॅस्बेस्टोस, बेंन्झिन आणि फॉर्मल्डिहाइड यांसारख्या घातक पदार्थांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे वेगवेगळ्या कर्करोगांचा, विशेषतः फुप्फुसाचा कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग आणि मेसोथेलियोमचा धोका वाढू शकतो. हे प्रदूषक श्वसनासंबंधित आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोगदेखील वाढवू शकतात. तसेच हे लहान मुले आणि वृद्धांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात,” असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले

डॉ. अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिले, तर वाहनांचे उत्सर्जन वायुप्रदूषणात वाढ होण्यासाठी कारणीभूत आहे. हे निसर्गासह वन्यप्राण्यांनाही हानी पोहोचवते. त्यामुळे हवामानात बदल घडतात. अशा घातक ऑटोमोटिव्ह सामग्रीची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्याने माती आणि पाण्याचे स्रोत दूषित होऊ शकतात; ज्यामुळे मानव आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो.

हेही वाचा: अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे वाढतो अकाली मृत्यूचा धोका? भारतीयांमध्ये वाढतेय प्रमाण; पाहा तज्ज्ञ काय सांगतात…

या पद्धतीने समस्या करा कमी

डॉ. अग्रवाल यांच्या मते, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी नक्कीच करू शकता. त्यामध्ये हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांसारखी प्रदूषणविरहित अधिक कार्यक्षम वाहने वापरण्यास सुरुवात करावी. त्यामुळे हा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

वारंवार वाहनांची योग्य ती तपासणी करावी आणि काळजी घ्यावी. त्याअंतर्गत नियमित ट्युन-अप आणि उत्सर्जन चाचण्या करून घ्याव्यात. त्यामुळे गाडीचे इंजिन व्यवस्थित चालेल आणि प्रदूषण कमी होईल.

सार्वजनिक वाहनांचा वापर, चालणे किंवा सायकल चालवणे अशा गोष्टी वापरण्यास सुरुवात करावी. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी झाल्याने उत्सर्जन कमी होऊ शकते.

ऑटोमोटिव्ह द्रवपदार्थ, ब्रेक पॅड आणि इतर धोकादायक घटकांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health car cabin air in the increase the risk of cancer read what the experts say sap