‘ऋतुसंधी’ हा एक असा विषय आहे, ज्याची आधुनिक विज्ञानाला फार उशिरा माहिती झाली. आयुर्वेदाने मात्र हा विषय काही शतके आधी मांडला आहे, ज्याचे मानवाच्याच नव्हे तर संपूर्ण निसर्गाच्या आरोग्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ऋतुसंधी म्हणजे दोन ऋतूंचा संधी किंवा जोड आणि दोन ऋतूंचा संधी होण्याच्या या काळाला ऋतुसंधीकाळ असे म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : Health Special: प्राण्यांविना मांस कसे तयार होते?

‘ऋतुसंधिकाळ’ म्हणजे काय?
आयुर्वेदशास्त्राने मांडलेल्या,आपल्या हिंदू संस्कृतीने हजारो वर्षांपासून स्वीकारलेल्या, मात्र जगाला कालपर्यंत ज्ञात नसलेल्या अशा अनेक विषयांमधलाच एक महत्त्वाचा विषय म्हणजे “ऋतुसंधिकाळ”. एक ऋतू संपून पुढचा ऋतू सुरु होण्याच्या काळाला अर्थात दोन ऋतूंच्या मधल्या काळाला ऋतुसंधिकाळ म्हणतात. नेमके सांगायचे तर आधीच्या ऋतूचे शेवटचे आठ दिवस आणि पुढे येणाऱ्या ऋतूचे पुढचे आठ दिवस मिळून साधारण पंधरवड्याच्या काळाला ऋतूसंधिकाळ म्हणतात.

आणखी वाचा : Health Special: नेहमीच बाहेरचे खाणे – किती चांगले ?

हा ऋतुसंधिकाळ महत्त्वाचा असतो,कारण या दिवसांमध्ये एक ऋतू संपून नवीन ऋतू सुरू होणार असतो. या १५ दिवसांचे महत्त्व याचसाठी की या दिवसांमध्ये अखिल सृष्टीमध्ये व सभोवतालच्या वातावरणामध्ये बदल होतो. ग्रीष्म्यातल्या उन्हाळ्याच्या रखरखीत-उष्ण दिवसांनंतर येणारा प्रावृट ऋतूमधला थंड-आर्द्र पावसाळा, शरद ऋतूमधल्या ऑक्टोबर हिटनंतर सुरू होणारा हेमंत ऋतूमधला हिवाळा आणि हेमंतातल्या कडक थंडीनंतर सुरु होणारा मार्चमधला तिरप्या सूर्यकिरणांचा वसंत ऋतू या प्रत्येक ऋतुसंधिकाळामध्ये हवामान बदलते आणि निसर्गातही अनेक बदल होतात, जे आरोग्याला बाधक होऊ शकतात, म्हणूनच ऋतुसंधिकाळाचे मानवी आरोग्याच्या आरोग्याच्या दृष्टीने नितांत महत्त्व आहे. केवळ मानवाच्याच नव्हे तर अखिल प्राणिमात्रांच्या आरोग्याला ऋतुसंधिकाळामध्ये बाधा होऊ शकते.

आणखी वाचा : Health Special: ऋतूबदल झाला की, रोगजंतूंना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ टाळा!

ऋतुसंधिकाळाचे महत्व
केवळ ऋतू बदलला तरी सर्दी होते, ताप येतो, पोट खराब होते, अशक्तपणा जाणवतो, बरं वाटत नाही ; एकंदर काय तर सीझन बदलला की आरोग्य बिघडते असे सांगणारे अनेक लोक असतात. बायोमटिरिऑलोऑजिस्टच्या मते वातावरणामध्ये अचानक होणारा बदल मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी करतो, ज्यामुळे सर्दीतापासारख्या विषाणूजन्य आजारांचे विषाणूशरीरामध्ये अनेकपटींनी वाढतात. प्रतिकार करणार्‍या पांढर्‍या पेशींची विषाणूंशी लढण्याची क्षमता घटलेली असल्याने लढाईमध्ये विषाणू जिंकतात व सर्दी-तापाचा त्रास सुरू होतो.

आधुनिक तज्ज्ञांचे हे मत योग्य असले तरी परिपूर्ण नाही. कारण पांढर्‍या पेशींची लढण्याची क्षमता याच दिवसांत का घटते, याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. दुसरं म्हणजे सगळेच आजार काही जीवाणू-विषाणूंमुळे होतात असं नाही. ऋतु बदलताना होणार्‍या इतर आजारांमागची कारणे काय?त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा संबंध ,वास्तवात आरोग्य बिघडण्याचा संबंध ज्या आहाराशी, विहाराशी, निद्रेशी, ब्रह्मचर्याशी, व्यायामाशी व मानवी जीवनाशी निगडीत अनेक मुद्यांशी आहे, त्या मुद्यांकडे आज आधुनिक विज्ञानाचे दुर्लक्ष झालेले दिसते. त्या मुद्यांना आयुर्वेदाने मात्र नितांत महत्त्व दिले आहे. खरं तर केवळ माणसाची रोगप्रतिकारशक्तीच नव्हे तर आरोग्यावर नव्हे संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या या सर्व घटकांचा परामर्श आयुर्वेदाने ऋतुचर्येमध्ये घेतलेला आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health gets what happens to our body when season changed hldc vp
Show comments