लंडन : दोन जेवणांमध्ये १० तासांचे अंतर असावे. म्हणजे सकाळी ९ वाजता जर दिवसाचे पहिले जेवण केले तर १० तास काहीही न खाता थेट ७ वाजता जेवले, तर ते आरोग्यासाठी चांगले असते, असे ब्रिटनमधील संशोधकांनी नव्या संशोधनाअंती सांगितले. त्यामुळे मूड, ऊर्जा आणि भूक सुधारते, असे या संशोधकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> क्रिती सेननलादेखील आवडतो ‘बटर मेथी पराठा’; काय आहेत याचे सहा आरोग्यदायी फायदे पाहा…

लंडनच्या किंग्ज महाविद्यालयाच्या संशोधकांनी युरोपियन पोषण परिषदेत या संशोधनाविषयी सांगितले. दोन जेवणांमधील १० तासांचा उपवास वजन कमी करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. ज्यांनी खाण्याचे वेळापत्रक १० तासांपर्यंत मर्यादित ठेवले, त्यांच्या आरोग्यात खाण्याच्या सवयी बदललेल्या लोकांपेक्षा जास्त सुधारणा झाली, असे या संशोधकांनी सांगितले. अन्नाचा आरोग्यावर परिणाम हा केवळ तुम्ही काय खाता यावरच नव्हे तर तुम्ही जेवणाची कोणत्या वेळ निवडता यावर अवलंबून आहे. अधूनमधून खाणे शरीरासाठी चांगले नाही. १० तासांचे अंतर पाळले तर मूड, ऊर्जा, भूक यांमध्ये सुधारणा होते, असे लंडनच्या किंग्ज महाविद्यालयाच्या डॉ. सारा बेरी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news 10 hours gap between two meals is good for health zws
Show comments