सिडनी : दूरचित्र वाहिनीवरील कार्यक्रम दीर्घकाळ पाहणे, संगणकावर काम करणे, वाहतूक कोंडीत अडकणे अशा अनेक कारणांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विकसित देशातील नागरिक विविध कामांच्या निमित्ताने दिवसातील नऊ तासांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून असतात. या स्थितीमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, कर्करोग यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्यतज्ज्ञ चिंता व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर ‘सिडनी युनिव्हर्सिटी’ने केलेले संशोधन अत्यंत दिलासादायक आहे. या संशोधनानुसार दिवसभरातील केवळ २२ मिनिटांच्या व्यायामामुळे निष्क्रीय जीवनशैलीमुळे होणारे अकाली मृत्यू रोखता येऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास रोज एक कप दही खाणे ठरतेय फायदेशीर; संशोधनातून झाले उघड

विद्यापीठाच्या पथकाने नॉर्वे, स्वीडन आणि अमेरिकेतील संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण केले. या संशोधानत ५० वर्षांवरील सुमारे १२ हजार स्वयंसेवकांच्या आरोग्यविषयी माहितीचा आधार घेण्यात आला. या वेळी १२ तासांपेक्षा अधिक वेळ सक्रिय नसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा धोका अधिक होता, असे आढळले.

या संशोधनानुसार दिवसभरात २२ मिनिटांपर्यंतच्या कालावधीसाठीही सक्रिय राहिल्याने संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असे आढळले आहे. यासाठी जेवणाच्या वेळेत वेगाने चालणे, जिने चढणे किंवा घरात काही मिनिटांसाठी व्यायाम करणे या क्रियांचीही मदत होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news 22 minutes of daily exercise reduce health risks zws
Show comments