नवी दिल्ली : आरोग्यदायी जीवनासाठी सकस आहाराबरोबर सहा ते आठ तास झोपण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. चांगली झोप झाली नाही, तर अशा व्यक्तीला उच्च रक्तदाबासह अनेक आजार जडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे झोप आणि आरोग्य या संदर्भात मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. यामधील एक संशोधन ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’च्या ‘जर्नल ऑफ प्रोटीन रिसर्च’मध्ये प्रकाशित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संशोधनात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी सांगितले की, प्रोटीन प्लियोट्रोफिन किंवा ‘पीटीएन’ शोधण्यात आले आहे. मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच हाडांचा विकास, उतींचे आरोग्य आदींसाठी हे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे याचा स्तर कमी होतो. संशोधनानुसार ‘पीटीएन’चा स्तर कमी झाल्यानंतर मेंदूतील स्मृती आणि नवीन शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हिप्पोकॅम्पल पेशी मृत होतात. स्मृतिभ्रंश आणि मेंदूसंबंधी आजारही या ‘पीटीएन’च्या मदतीने बरे होण्याची शक्यता असते. ‘जर्नल ऑफ द अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटी’मध्ये या आधी प्रकाशित संशोधनानुसारही अपुऱ्या झोपेमुळे मेंदू लवकर वृद्ध होतो, असे स्पष्ट करण्यात आले होते.