Blood Sugar Control: डायबिटीजच्या रुग्णांना रक्तातील साखर वाढण्याचा धोका सतत स्वतःसह घेऊन जगावं लागतं. डायबिटीज हा असा एक क्रोनिक आजार आहे जो तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम ग्लुकोजच्या माध्यमातून होते. हे ग्लुकोज आपल्याला आपण जे खातो त्यातून मिळते. पण जेव्हा ग्लुकोजचे प्रमाण वाढते व आपले स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती वेगाने करण्यास असमर्थ ठरते तेव्हा टाईप १ डायबिटीजचा धोका बळावतो. यामध्ये परिस्थिती गंभीर होताच पॅनक्रियाज पूर्णपणे इन्सुलिनची निर्मिती थांबवू शकतो.
आहारतज्ञांच्या माहितीनुसार डायबिटीजच्या रुग्णांसाठी बाहेरील औषधांइतकेच तुमच्या घरातील, किचनमधील साधे पदार्थ सुद्धा बरेच प्रभावी ठरू शकतात. थंडीच्या दिवसात वाळूमध्ये भाजलेले गरमागरम शेंगदाणे विकले जातात. किंवा घरातही तव्यावर भाजून आपण शेंगदाणे खाऊ शकता. हेच शेंगदाणे प्रोटीन, फॅट्स व फायबरचा साठा असतात. यामुळे शरीराला नियमित कामासाठी लागणारी ऊर्जा मिळू शकते. तर शेंगदाण्यातील पोटॅशियम, तांबं, कॅल्शियम, मँगनीज व लोह हे पाचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.
हे ही वाचा<< Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करतील मदत
शेंगदाणे खाऊन डायबिटिज कमी होतो का?
डायबिटीज स्पेशलिस्ट डॉक्टर अनुपम घोष यांचं मते शेंगदाण्याचे सेवन हे डायबिटीज रुग्णांसाठी अमृतासमान काम करू शकते. शेंगदाण्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स १४ आहे. आपण पोषणाची टक्केवारी पाहिल्यास शेंगदाण्यातील ग्लाइसेमिक इंडेक्स हा एका सफरचंदातील ग्लाइसेमिक इंडेक्सपेक्षाही कमी असतो. शिवाय शेंगादाण्यात प्रोटीन जास्त व कार्ब्स कमी असतात ज्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
हे ही वाचा<< मधुमेहाच्या रुग्णांची दृष्टी होऊ शकते कमकुवत; हे टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी
शेंगदाणे कसे खावे?
शेंगदाण्यात फॅट्सही अधिक असतात, १०० ग्रॅम शेंगदाण्याच्या जवळपास ५९० कॅलरीज असतात यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन मर्यादित करावे.
हे ही वाचा<< Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करतील मदत
ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रीशन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसातर जी मंडळी रोज मर्यादित प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. शेंगदाणे कच्चे खाल्ल्यावर ऍसिडिटीचा धोका असतो त्यामुळे शक्यतो प्रक्रिया करून म्हणजेच भाजून, उकळून, वाटून खाणे फायद्याचे ठरू शकते.