Weight Control Diet: अतिवजनाने आज जगभरात कोट्यवधी लोक त्रस्त आहेत. वाढत्या वयासह अनेकांचे वजन वाढत जाते तर काही लहान मुलं सुद्धा वयापेक्षा अधिक लठ्ठ असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली. आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे तसेच अनुचित आहारामुळे जगभरात अतिवजनाची समस्या वाढत आहे. १९८० च्या नंतर ७० हुन अधिक देशांमध्ये अतिवजन असणारी लोकसंख्या दुप्पट झाली आहे ज्यात भारताचा सुद्धा समावेश आहे.थंडीच्या दिवसात अनेकदा स्निग्ध पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो जर या पदार्थांना पचवण्यासाठी आपण योग्य व्यायाम करत नसाल तर यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. अशावेळी शरीराला आवश्यक स्निग्धता मिळवून देणारा व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करणारा पदार्थ म्हणजेच शेंगदाणा.
आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचं भांडार असते. शेंगदाण्यात इतर पदार्थाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. शेंगदाण्यांमुळे आपली भूक नियंत्रणात राहते व बॉडी सुद्धा गरम होते. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शेंगदाणा तुम्हाला वजन कमी करण्यास नक्की काय मदत करू शकतो चला तर जाणून घेऊयात..
वजन कमी करण्यासाठी कसे खावेत शेंगदाणे ? (How to Eat Peanuts To Control Weight)
शेंगदाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट व फॅट्स हे शरीराला थंडीच्या दिवसात आवश्यक ऊर्जा देतात. यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत होऊन रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते. शेंगदाण्यातील पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मँगनीज व लोह् हे शरीरात पाचक रस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याचे काम करतात. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये अॅंटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅग्निज, कॅल्शियम, बीटा केरोटिन ही पोषक तत्वे असतात.
हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा
टेक्सास टेक यूनिवर्सिटी (Texas Tech University) च्या अभ्यासात सांगितल्यानुसार, दिवसातून दोन वेळा म्हणजेच लंच व डिनरच्या आधी ३५ ग्रॅम भाजलेले शेंगदाणे किंवा उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्यास जेवताना पोर्शन कंट्रोल करणे सहज शक्य होईल. तसेच यामुळे रक्तदाब, ग्लुकोज शुगर नियंत्रणात राहण्यास सुद्धा मदत होते. तुम्ही शक्य झाल्यास शेंगदाणे भाजून त्यात थोडे सैंधव मीठ घालून खारे शेंगदाणे बनवून ठेवू शकता व जेवणाआधी किंवा दिवसभरात छोट्या भुकेला कधीही हे शेंगदाणे खाऊ शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)