नवी दिल्ली : भारतीय स्वयंपाकघरातील अनेक जिन्नस आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये दालचिनी अग्रस्थानी आहे. या जिन्नसाचा करोनाकाळात तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अधिक प्रमाणात उपयोग करण्यात आला; परंतु पुरुषामध्ये अधिक प्रमाणात आढळणाऱ्या प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी हे जिन्नस उपयुक्त ठरू शकते, असा दावा एका नव्या संशोधनानंतर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नेत्रसंसर्ग : लक्षणे, कारणे आणि उपचार

हैदराबाद येथील ‘आयसीएमआर- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन’ने  (एनआयएन) केलेल्या संशोधनानुसार दालचिनी ही प्रोस्टेट कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तज्ज्ञांच्या गटाने उंदरांवर प्रयोग केला. त्या वेळी ज्या उंदरांना दालचिनी देण्यात आली होती, त्यांच्यामध्ये या जिन्नसातील अ‍ॅक्टिव्ह कंपाऊंडस- सिनामाल्डीहाईड आणि प्रोसायनिडिन बी-२ या घटकांमुळे प्राथमिक टप्प्यातील प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी झाला.  बदललेल्या जीवनशैलीमुळे  प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. फुप्फुसाच्या कर्करोगानंतर या आजाराचे रुग्ण आढळतात, तर ४१ पैकी सुमारे एका व्यक्तीचा मृत्यू या कर्करोगामुळे होतो. या परिस्थितीत दालचिनीच्या लाभाबाबतचे संशोधन आशादायी आहे.