नवी दिल्ली : ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असलेले गाजर डोळय़ांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र सिंगापूरच्या संशोधकांनुसार डोळय़ांचे आरोग्य सुधारण्यासाठी द्राक्षेही तितकीच उपयुक्त आहेत. द्राक्षांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वासह बीटा-कॅरोटीनचे मोठे प्रमाण असल्याने दृष्टी वाढविण्यासाठी ते उपयुक्त असल्याचे या संशोधकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> रात्रपाळीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कसा टाळू शकतात?

सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधकांनी द्राक्ष आणि डोळय़ांचे आरोग्य यांवर संशोधन केले. या संशोधकांच्या अभ्यासाचा मुख्य भाग ‘अँटिऑक्सिडंट्स’ने समृद्ध असलेल्या पदार्थाच्या सेवनाने डोळय़ांच्या संपूर्ण आरोग्यावर थेट परिणाम होतो का हे तपासण्याचा होता. त्यांनी ‘ऑक्सिडेटिव्ह’ तणावाच्या निर्देशकांचे निरीक्षण करून या प्रभावाचे मूल्यांकन केले. निरोगी डोळय़ांसाठी आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. कारण द्राक्षांमध्ये वाढीव ‘अँटिऑक्सिडंट’ क्षमता असून ते डोळय़ांसाठी उपयुक्त आहे. प्रखर प्रकाशाच्या हानीकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे, असे संशोधकांनी सांगितले.

हा संशोधन अहवाल ‘फूड अँड फंक्शन’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ज्या प्रौढांनी सलग १६ आठवडे दीड कप द्राक्षे खाल्ली त्यांच्यावर संशोधन करण्यात आले. ज्या व्यक्तींनी द्राक्षांचे सेवन केले, त्यांच्या ‘अँटिऑक्सिडंट’ क्षमता आणि रेटिनामध्ये मॅक्युलर पिगमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news eating grapes may benefit eye health zws
Show comments