आपल्यापैकी अनेकांना खूप खायला आवडते. असे फूडी लोक पोट भरले तरीही एखादा आवडता पदार्थ खात राहतात. आपण पार्ट्या, रेस्टॉरंटमध्येही जास्त अन्न खातो; ज्यामुळे अनेकदा आपल्याला गॅससारख्या पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तुम्हाला काही खबरदारी घेण गरजेचे आहे. पोषणतज्ज्ञ निधी शर्मा म्हणतात, “पोट भरल्यावर आपणाला ढेकर येतात आणि अस्वस्थता निर्माण होते. ही अवस्था आपल्याला खाणं बंद करण्याचे संकेत देत असते. मात्र, असे काही लोक असतात; जे या संकेतांकडे दुर्लक्ष करतात आणि पोट भरलं तरी खात राहतात. कोणताही पक्षी किंवा प्राणी तुम्ही कधी पोट भरल्यानंतरही खाताना पाहिला आहे का? नक्कीच नाही; कारण- आपल्या शरीराचं ऐकणं आणि योग्य वेळी खाणं व ते कधी थांबवायचं हे पक्षी-प्राण्यांना चांगलं समजतं. पण, माणसं ते नक्कीच विसरली आहेत.
जास्त खाणे टाळण्यासाठीच्या काही टिप्स
जेवण टाळू नका : तु्म्ही एखाद्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी जेवण करणे टाळू नका. तुम्ही कार्यक्रमाला जाण्याआधी फक्त १५-२० टक्क्यांनी कमी प्रमाणात खा; ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहील आणि पार्टी सुरू होईपर्यंत तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. मात्र, तुम्ही उपाशीपोटी तिथे गेलात, तर तुम्हाला खूप भूक लागेल आणि तुमचे मन सारखे जेवणाकडे ओढ घेईल. शिवाय भुकेमुळे तुमच्याकडून अनियंत्रित जेवण केले जाऊ शकते.
तुमच्या आवडत्या पदार्थांपासून सुरुवात करा : तुम्हाला जे पदार्थ खायला आवडतात, ते सुरुवातीला खा आणि सहसा मुख्य कोर्सवर जास्त वेळ घालवत बसू नका.
कमी उष्मांक असलेले पदार्थ : जर तुम्ही आहार घेत असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर तळलेल्या भाज्या, ग्रिल्ड पदार्थ, तंदुरी चिकन असे पदार्थ टाळा आणि क्रीमशिवाय सूप घ्या. चिकट करी आणि मिठाईपासून लांब राहा.
हेही वाचा- महिनाभर कॉफी सोडल्यास त्याचे शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
हळूहळू खा : जेवताना छोटा चमचा वापरा आणि आपल्या डिशमधील प्रत्येक घासाचा आनंद घ्या. त्यामुळे तुम्हाला अगदी कमी प्रमाणात खाऊनही समाधानी राहणे शक्य होईल. तसेच खाण्यापेक्षा बोलण्यात जास्त वेळ घालवा.
लिंबू पाण्यासारखे घरगुती उपचार पचनसंस्थेची ‘पीएच’ पातळी बदलून आणि तात्पुरता आराम देऊन केवळ वरवरचे काम करतात. पण, पचत नसलेल्या अन्नाची मदत नक्कीच घेऊ नका, कारण- ते तुमच्या शरीरात चरबीच्या रूपात साठतात, असंही शर्मा म्हणाल्या.
सुषमा पी. एस., मुख्य आहारतज्ज्ञ, जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूट, बंगळुरू यांनी काही उपायांची यादी केली आहे; जी तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.
जेवणापूर्वी एका ग्लास कोमट पाण्याने किंवा एका जातीची बडीशेप, जिरे किंवा ओवा यांसारख्या औषधी वनस्पतींनी आपल्या दिवसाची सुरुवात करा. नाश्ता दिवसातील सर्वांत महत्त्वाचे जेवण आहे. कारण- ते संपूर्ण दिवस ऊर्जा प्रदान करते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरते. परिणामत: जास्त खाणे टाळण्यास मदत होते. प्रक्रिया केलेले किंवा उच्च कॅलरीयुक्त स्नॅक्सऐवजी फळे, नट किंवा दह्यासारखे पौष्टिक स्नॅक्स खा.
जेवण लक्ष केंद्रित करुन काळजीपूर्वक खाणे ही एक मौल्यवान रणनीती असू शकते. तुम्ही अधिक जागरूक होऊन आणि तुमच्या शरीराच्या भूक व परिपूर्णतेच्या संकेतांनुरूप खाण्याच्या पद्धतींचा अवलंब करून तुमच्या खाण्याच्या पद्धती सुधारू शकता. लक्षपूर्वक जेवल्यामुळे खाण्याच्या अनुभवामध्ये सुधारणा होऊ शकते; तसेच कमी आरोग्यदायी पदार्थांचा वापर कमी होऊ शकतो. तुमच्या प्लेटमध्ये भाज्या, एक-चतुर्थांश प्रथिने व एक-चतुर्थांश कार्बोहायड्रेटचा समावेश असावा, असे सुषमा पी. एस. म्हणाल्या.