How To Give Minerals Benefits To Body: आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात कार्यरत असणारा आणि अत्यल्प प्रमाणात आहारातून मिळणारा महत्वाचा घटक म्हणजे खनिजद्रव्ये आणि मूलद्रव्ये!आपली हाडे आणि शारीरिक रचनेसाठी कॅल्शिअम , पोटॅशिअम आणि फॉस्फरस यांचा महत्वाचा वाटा आहे . लोह आपल्या रक्तातील महत्वाचा घटक आहे. झिंक, जस्त , मॅग्नेशिअम, मॅंगेनिज यांचा मुख्यत्वे शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी पोषकतत्त्वे म्हणून वापर होतो. सोडिअम , पोटॅशिअम मुळे पाणी आणि आम्ल यांच्यातील संतुलन आणि संयोजन राखले जाते आणि आयोडीन शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत राखण्यासाठी मदत करते .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅल्शिअम :

हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम महत्वाचे आहेच . रक्तातील कॅल्शिअमची पातळी पेशींचे आयोग्य राखण्यास मदत करते . स्नायूंच्या सुरळीत हालचालींकरता कॅल्शिअम महत्वाचा घटक आहे. गरोदरपणात आणि नवमातांसाठी कॅल्शिअमचे प्रमाण योग्य प्रमाणात राखले जाणे महत्वाचे असते. आईच्या शरीरातील कॅल्शिअम चा थेट परिणाम बाळाच्या वाढीवर होत असतो .

कॅल्शिअम वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य अशा दोन्ही पदार्थांमध्ये आढळून येते . दूध , दुग्धजन्य पदार्थ ( ताक , दही, पनीर ). अनेक पालेभाज्या आणि तेलबिया यामध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते .

फॉस्फरस:

कॅल्शिअम खालोखाल महत्वाच मूलद्रव्य म्हणजे फॉस्फरस . कॅल्शिअमचे शरीरातील विघटन फॉस्फरस वर अवलंबून असते. आहारातील धान्ये , कडधान्ये , तेलबिया ,सुकामेवा अशा सगळ्याच पदार्थामधून फॉस्फरस आहारात समाविष्ट होत असते . सहसा फॉस्फरस ची कमतरता किंवा तत्सम कुपोषण आढळून येत नाही .

लोह :

लोह हा मानवी आहारातील आणि शरीरातील महत्वाचा घटक आहे. आहारातून योग्य प्रमाणात लोहाचे आवश्यक विघटन आणि पेशींमध्ये शोषले जाणे हे पूर्णपणे आहाराच्या पद्धतीवर आणि पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे . आहारात गडद लाल , हिरव्या रंगाच्या पालेभाज्या आणि फळे यामधून तसेच तृणधान्ये आणि धान्यांमधून देखील आपल्याला लोह मिळू शकते

सोडिअम आणि पोटॅशिअम:

शरीरातील द्रवघटक आणि त्याचा प्रवाह सुरळीत राखण्यासाठी सोडिअम आणि पोटॅशिअम महत्वाचे कार्य बजावतात. या दोन्ही मूलद्रव्यांची जोडगोळी फळ आणि भाज्यांमधून आहारात समाविष्ट केली जाऊ शकते . शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये पोटॅशिअम चे प्रमाण जास्त असते . उन्हाळ्याच्या दिवसात या दोन्ही मूलद्रव्यांचे प्रमाण काहीसे कमी होते आणि ते पूर्ववत करण्यासाठी योग्य कर्बोदकांसोबत आणि पाण्यासोबत योग्य पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे .

मॅग्नेशिअम, जस्त , झिंक आयोडीन , क्रोमियम , मँगॅनीज , फ्लोराईड यासारख्या मूलद्रव्यांची शरीराला अत्यल्प स्वरूपात मार्ग अनेक शारीरिक अभिक्रियांसाठी उपयोग होतो . योग्य प्रमाणात फळे , पालेभाज्या, कडधान्ये यांचा योग्य स्वरूपात आहारात समावेश केल्यास या मूलद्रव्यांची कमतरता

खनिजे आणि मूलद्रव्यांचे शरीरात सुरळीत विघटन व्हावे यासाठी खालील काही नियम पाळणे आवश्यक आहे .

१. काहीही खाताना चावून चावून खावे .
२. जेवणा नंतर शक्यतो कोणतेही द्रवपदार्थ पिऊ नयेत
३. कॉफी चहा कोणत्याही खाद्यपदार्थसोबत पिऊ नयेत त्यातील काही घटकांमुळे शरीरात मूलद्रव्ये शोषली जात नाहीत.
४. कोणत्याही पालेभाज्या शक्यतो आधी धुवून मग चिराव्यात.
५. स्वयंपाकासाठी लोह , तांबे ,पितळ यापासून तयार झालेली भांडी वापरावीत
६. पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात साठवून प्यावे. शक्यतो त्यात लिंबू किंवा की जीवनसत्व असणारे पदार्थ मिसळू नयेत.
७. कोणतेही लोह जास्त असणारे पदार्थ खाताना त्यात लिंबू पिळावे. ( पोहे, पालकाची भाजी इ. )
८. उन्हाळ्यातून शक्यतो मूलद्रव्यांचा योग्य पुरवठा व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची क जीवनसत्त्व असणारी द्रव्ये प्यायली जातात, त्यात गोडव्यासाठी पांढऱ्या साखरेऐवजी गुळाचा वापर करावा .
९. कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त गोळ्या घेताना रक्त तपासणी करून नक्की कमतरता आहे का आणि कमतरता असल्यास “किती” कमतरता आहे याची खात्री करून घ्यावी .
१० . कोणत्याही सरसकट सप्लिमेंट्स किंवा गोळ्या खाण्या आधी आहारातील फळे आणि भाज्यांच्या प्रमाणावर लक्ष देणे आवश्यक आहे .
११. अति पाण्याचे सेवन देखील अनेक पोषणतत्त्वाचा निचरा करू शकते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news iron calcium sodium will give more benefits through these vegetables and recipes eating rules to follow svs