Sinus Symptoms And Home Remedies: कधी कधी सलग शिंका सुरु होतात, सुरुवातीला आपणही नाकात काहीतरी गेलं असेल, धुळीचा त्रास झाला असेल असं समजून याकडे दुर्लक्ष करतो. आता थंडीच्या दिवसात तर वरच्या वर आपल्याला सर्दी, खोकला जाणवू शकतो. पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर मात्र थोडं सावध होण्याची गरज आहे. एक दोन आठ्वड्यापेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही साइनोसाइटसचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर वेळीच लक्षणे तपासून घ्या. थंडीत हा त्रास बळावू शकतो आणि जर सायनसवर योग्य उपचार केला नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते.
हिंडाल्को, सोनभद्र येथील एमडी, डॉक्टर राजकुमार यांनी सांगितले की, आपल्या नाकपुड्यांच्या दोन्ही बाजूला हाडांच्या आत पोकळ जागा असते ज्याला सायनस असे म्हणतात, जर ही जागा ब्लॉक झाली किंवा तिथे सूज येणे, संसर्ग होणे याला साइनोसाइटिस असे म्हंटले जाते. हा एक गंभीर आजार ठरू शकतो.
साइनोसाइटिस (Sinusitis) चे मुख्य कारण आहे बॅक्टरीया व संसर्ग. यापाठोपाठ अपघातामुळे नाकाचे हाड वाकडे होणे, नाक सुजणे अशा कारणांनी सुद्धा साइनोसाइटिस त्रास उद्भवू शकतो. साइनोसाइटिसचा त्रास असताना धूळ व मातीच्या संपर्कात आल्यास त्रास बळावण्याची शक्यता असते. तुम्हला कोणत्याही ऍलर्जीचा त्रास असेल तरीही साइनोसाइटिस बळावू शकतो. आता मुख्य प्रश्न म्हणजे हा साइनोसाइटिस आजार ओळखायचा कसा?
सायनसचे मुख्य लक्षण (Sinusitis Symptoms)
- सायनसचा त्रास असल्यास तुम्हाला चेहऱ्यावर सूज जाणवू शकते. अनेकांना चेहरा ताणल्यासारखा सुद्धा वाटू शकतो
- भुवयांच्या जवळ डोकेदुखीचा त्रासही जाणवू शकतो.
- डोळ्यांच्या वर व वरील दातांमध्ये वेदना जाणवू शकतात.
- हा त्रास दुपारच्या वेळी कमी होतो व सकाळी/संध्याकाळी बळावतो
- वाहती सर्दी जाणवू शकते.
- तोंडाला दुर्गंधी येऊ शकते
- वास ओळखता येणे बंद होऊ शकते.
- ताप
हे ही वाचा << उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!
सायनस वर घरगुती उपचार (Home Remedies for Sinusitis)
- दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पाण्याने वाफ घ्या. शक्य असल्यास या पाण्यात यूकोलिप्टस किंवा पेपरमिंटचे काही थेंब टाकू शकता.
- सायनस टाळण्यासाठी किंचित मीठ घातलेलं पाण्याचे काही थेंब नकार घालावे त. यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घातल्यास फायदा होऊ शकतो.
- जीवनशैलीतील सुधार तुम्हाला केवळ सायनसच नव्हे अन्य आजारांपासूनही मोकळे करू शकतो.
(टीप: वरील उपचार हे सामान्य माहितीवर आधारित आहेत, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते)