न्यूयॉर्क : अमेरिकेतील संशोधक प्रा. निकोलस टॉन्क्स यांच्या प्रयोगशाळेने एका नव्या प्रतिपिंडाची निर्मिती केली असून स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी ते उपयुक्त ठरू शकते, असा दावा या संशोधकांनी केला आहे. स्तनाच्या टयूमरच्या प्रसारास मदत करणाऱ्या एन्झाइमला रोखण्याचे काम हे प्रतिपिंड करू शकेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. स्तनाच्या कर्करोगामध्ये पीटीपीआरडी हे एन्झाइम तयार होते आणि कर्करोग प्रसारात ते मोठी भूमिका बजावते. पीटीपीआरडी हे प्रोटीन टायरोसिन फॉस्फेट (पीटीपी) रेणूंच्या कुटुंबातील सदस्य आहे. जे पेशींच्या नियमन कार्याला मदत करतात. पीटीपीआरडी हे एन्झाइम वाढल्यास कर्करोग शरीरात अधिक पसरतो. शास्त्रज्ञांनी तयार केलेले प्रतिपिंड या एन्झाइमवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकेल, असे दावा करण्यात आला आहे.

Story img Loader