नवी दिल्ली : हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’मुळे  (मेंदूघात) जगभरात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी दीड कोटी पेक्षा अधिक लोकांना मेंदूघात होतो. त्यापैकी ५० लाख जणांचा मृत्यू होतो. मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानंतर मेंदूघात होऊन मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान होणे, अपंगत्व येणे किंवा गंभीर स्थितीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शारीरिक निष्क्रियता हे या आजारामागील प्रमुख कारण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तुमच्या मुलांमध्ये नेतृत्व कौशल्य कसे निर्माण करावे? पालक म्हणून लहानपणीपासूनच करा ‘हे’ संस्कार

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहामुळे या आजाराचा धोका अधिक असतो. ‘जामा नेटवर्क’च्या संशोधनानुसार १३ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ बसून काम करणाऱ्यांना मेंदूघाताचा धोका ४४ टक्के अधिक असतो. या आजारापासून दूर राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते. पर्यायाने मेंदूघाताचा धोकाही कमी होतो. आठवडाभरात किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम आवश्यक आहे.  आहारात फळे, भाज्यांचा समावेश करावा, ऑलिव्ह ऑइल आणि ‘ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिड’युक्त पदार्थाचाही आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.  ‘जामा नेटवर्क’च्या संशोधनानुसार तणावामुळेही मेंदूघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news possible to reduce the risk of stroke zws
Show comments