नवी दिल्ली : चालण्याचा व्यायाम आणि हृदयरोग, मृत्यू यांच्यातील संबंधाबाबतचे निष्कर्ष संशोधकांनी नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये एक लाख ११ हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी दररोज  ८ हजार ८०० पावले चालणे योग्य आहे. तर, सदृढ हृदयासाठी ७ हजार २०० पावले चालणे फायदेशीर ठरते, असे यामध्ये दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Health Special : …तर टॉमेटो ठरु शकतो पित्तप्रकोपाचं कारण!

‘ग्रेनाडा युनिव्हर्सिटी’च्या संशोधकांनी सांगितले की, अनेक जण चांगल्या आरोग्यासाठी दररोज १० हजार पावले चालण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला देतात; परंतु आम्ही केलेल्या संशोधनातील निष्कर्षांनुसार सावकाश चालण्याऐवजी जलद चालणे हे अधिक लाभदायी आहे. तसेच दररोज ८ हजार ८०० पावले चालण्याचा व्यायाम हा उपयुक्त आहे. या व्यायामाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदा होतो.

लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी ८ हजार ८०० पावले चालणे आवश्यक आहे. या व्यायामामुळे शरीरातून घाम येऊन जिवाणू बाहेर पडतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो, असे संशोधकांनी सांगितले.  उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांपासून दूर राहण्यासाठी चालण्याचा व्यायाम आवर्जून करावा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news walking 8800 steps a day is beneficial for health zws
Show comments