त्वचारोगांच्या कारणांमधले एक महत्त्वाचे कारण म्हणजे शीत-उष्ण व्यत्यास. याचा अर्थ काही काळ शीत (थंड) तर काही काळ उष्ण (गरम) अशी व्यत्यास (विरोधी) परिस्थिती. शरीर कधी थंड, तर कधी गरम अशा वातावरणामध्ये राहते, तेव्हा सर्वाधिक ताण पडतो त्वचेवर. बाहेरच्या तापमानानुसार शरीराच्या तापमानामध्ये बदल करण्याच्या कामामध्ये महत्त्वाची भूमिका असते त्वचेची.

आणखी वाचा: Health Special: व्हिनेगरचा वापर- काय कराल, काय टाळाल?

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा

बाहेरचे हवामान गरम असताना शरीराला आतून थंड करायला हवे, अशी सूचना मेंदूकडे पाठवण्याचे कार्य करते त्वचा.आता जर या त्वचेला काही मिनिटे थंड तर, काही मिनिटे गरम अशा तापमानाचा अनुभव येत असेल तर काय होणार?आजच्या आधुनिक जगामध्ये अशी अनेक कार्यालये आहेत, जिथे संपूर्ण कार्यालय वातानुकुलीत नसते, मात्र कार्यलयातला विशिष्ट भागच वातानुकूलित असतो. अनेक ठिकाणी तर त्या कार्यालयातल्या मुख्य मंडळींच्या केबिन्स तेवढ्या एसी असतात (कार्यालयप्रमुखांचे मेंदू थंड राहावेत, म्हणून असेल कदाचित!). आता अशा कार्यालयात काम करणार्‍यांना कामाच्या निमित्ताने या गरम विभागातून त्या थंड विभागात जावे लागते, प्रमुखांच्या गारेगार केबिनमध्येसुद्धा वारंवार जावे लागते, दिवसभरातून अनेकदा! अशा वेळी शरीराला शीत-उष्ण व्यत्यासाला तोंड द्यावे लागते. हा शीत-उष्ण व्यत्यास त्वचाविकाराला आमंत्रण देतो.

आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?

त्वचेवर स्वेदग्रंथी घाम स्त्रवतात, तर स्नेहग्रंथी स्नेह(चिकट स्त्राव) स्त्रवतात. घाम बाहेर टाकण्यामागे शरीरामधील त्याज्य घटक बाहेर फेकणे व शरीराचे तापमान सांभाळणे हा हेतू , तर स्नेहग्रंथींचा स्त्राव त्वचेला कोरडी पडू न देणे हा हेतू. शीत- उष्ण व्यत्यासाचा अनुभव जेव्हा शरीराला सातत्याने येतो, तेव्हा स्वेदग्रंथींचे आणि स्नेहग्रंथींचेसुद्धा कार्य बिघडते. मग कालांतराने ना त्वचेवर व्यवस्थित घाम तयार होत, ना नीट स्नेह पाझरत; ज्याच्या परिणामी त्वचेचे आरोग्य बिघडते. ही सर्व पार्श्वभूमी कोणत्याही त्वचाविकाराला पोषक असते आणि एक दिवस प्रत्यक्षात त्वचारोग होतो. त्यानंतर आपण मात्र त्वचाविकाराची कारणे शोधत राहतो.

आणखी वाचा: Health Special: कॅल्शियम, लोह व अन्य पोषकसत्वांचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात जोडावे? सेवनाचे नियम काय?

स्वेदयंत्रणा बिघडते!

शरीरामध्ये विविध जैवरासायनिक कार्ये करणार्‍या प्रणाली आहेत, ज्यांना यंत्रणा असेही म्हणता येईल. या प्रणाली शरीरास आवश्यक असे धातूघटक तयार करतात. आयुर्वेदाने शरीरामधील या जैवरासायनिक यंत्रणांना १३ प्रकारामध्ये विभागले आहे आणि या यंत्रणांना ‘स्रोतस’ असा शब्द वापरलेला आहे. उदा. रसवह स्रोतस, रक्तवह स्रोतस,मांसवह स्रोतस आदी. अर्थात शरीरामध्ये ही स्थूल अशी १३ स्रोतसे आहेत. त्याशिवाय अगणित सूक्ष्म स्रोतसेसुद्धा आहेत आणि म्हणूनच आयुर्वेदाने मानवी शरीर स्त्रोतसांनी तयार झालेले आहे, असे म्हटले आहे.

या १३ स्थूल स्रोतसांमध्ये कार्यकारी मूळ अवयव कोणते, त्यांचे कार्य काय, त्यांना दूषित करणारी कारणे कोणती आणि दूषित झाल्यावर दिसणारी लक्षणे व रोग कोणते याचा व्यापकतेने विचार आयुर्वेदाने केला आहे. त्यातलीच घाम तयार करणारी यंत्रणा म्हणजे स्वेदवह स्रोतस. स्वेद अर्थात घाम तयार करणार्‍या या यंत्रणेचे मूळ आहे मेद म्हणजे चरबी आणि रोमकूप (त्वचेवरील सूक्ष्म छिद्रे).

हे स्वेदवह स्रोतस ज्या कारणांमुळे दूषित होते, ती कारणे आयुर्वेदाने अचूक सांगितली आहेत – अतिव्यायाम, अतिसंताप, अतिप्रमाणात उन्हामध्ये राहणे, क्रोध, शोक,भय आणि महत्त्वाचे म्हणजे अयोग्य प्रकारे शीत-उष्ण सेवन. यातले शेवटचे कारण हे आपल्या विषयाशी संबंधित आहे.

शीत-उष्ण सेवन म्हणजे शीत व उष्ण या दोन विरुद्ध धर्मी घटकांच्या अयोग्य सेवनाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तापत्या गरम वातावरणामधून अचानक एसीच्या थंडगार वातावरणामध्ये जाणे. काही काळ थंड वातावरणात, तर काही काळ उष्ण वातावरणात अशाप्रकारे वावरणे हा झाला शीत-उष्ण व्यत्यास.

आता ही झाली स्वेदवह स्रोतसाला विकृत करणारी कारणे. घाम निर्माण करणारी यंत्रणा बिघडली तर नेमकी काय लक्षणे दिसतात आणि कोणत्या विकृती संभवतात,ते सुद्धा आयुर्वेदाने सांगितले आहे.

· खूप घाम येणे

· अजिबात घाम न येणे

· त्वचेमध्ये दाह होणे

· त्वचेवरील रोम उभे राहणे

· शरीर कठिण होणे

· शरीरामध्ये अति प्रमाणात स्निग्धता वाढणे

वरील लक्षणांपैकी (ज्यांना खरं तर विकृतीच म्हटलं पाहिजे) घाम न येणे वा अतिप्रमाणात घाम येणे याचे अनेक रुग्ण समाजात पाहायला मिळतात. विविध तपासण्या करुनही त्यांच्या विकृतीमागचे मूळ कारण सापडत नाही, जे लपलेले असते शीत-उष्ण व्यत्यासामध्ये. यातल्या अति घाम येणे या लक्षणामधूनच त्वचेवर स्निग्धता वाढून त्वचा चिकट होणे हे लक्षण सुद्धा दिसते. मात्र हा चिकटपणा त्वचेपर्यंतच मर्यादित राहात नाही तर शरीराच्या आभ्यन्तर सुद्धा वाढतो. घाम येणे थांबवल्यावर घामामधून जी चरबी शरीराबाहेर फेकली जात असते ती शरीरामध्येच राहिल्यामुळे मेदाची स्निग्धता (चरबीचा चिकटपणा) शरीरात वाढणे स्वाभाविक आहे.

अंगाची आग होणे या कारणामागे जीवनसत्त्वाची कमी हे कारण काही जणांमध्ये असते, त्यातही बी१२ या जीवनसत्त्वाची कमतरता असताना हे लक्षण दिसते आणि ते जीवनसत्त्व दिल्यावर ते लक्षण कमी होते. त्वचेची,त्यातही तळपायांची आग होणे हे लक्षण मधुमेहामध्ये सुद्धा दिसते, जिथे जीवनसत्त्वांबरोबरच मधुमेहाचा योग्य उपचार अपेक्षित असतो. मात्र ही कारणे नसतानासुद्धा अंगाचा दाह (आग) हे लक्षण असल्यास ते मानसिक कारणांमुळे आहे असे अनेकांना सर्रास सांगितले जाते. वास्तवात मूळ कारण असते शीत-उष्ण व्यत्यास!

शीत-उष्ण व्यत्यासामुळे जाणवणारी अजुन विकृती म्हणजे शरीर कठीण होणे आणि शरीर कठीण झाल्यामुळे अनुभवला जाणारा एक सर्वसाधारण त्रास म्हणजे स्नायुंची कठिणता, जी आधुनिक वैद्यकामध्ये मसल स्पासम (Muscle Spasm) म्हणून ओळखली जाते. मसल स्पासम मुळे होणारी मानदुखी,पाठदुखी, कंबरदुखी तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवली असेलच. तुमच्या रोजच्या अयोग्य हालचाली, चुकीच्या पद्धतीने बसणे, स्नायुंचा अशक्तपणा, व्यायामाचा अभाव ही कारणे तर त्यामागे आहेतच, परंतु शीत-उष्ण व्यत्यास हे सुद्धा यामागचे एक कारण असू शकते. या सर्व विकृतींचा उपचार करताना ज्वर-चिकित्सा (तापाचा उपचार) द्यावी असे मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे हे विशेष. अर्थात हे तज्ज्ञ वैद्यांचे काम आहे, हे वाचकांनी विसरु नये.