‘एवढीशी १२ वर्षांची मुलगी आणि मला पर्यावरणातील बदलांवर लेक्चर देतेय बघा!’ वसंतकाकांच्या स्वरात एक कौतुक होते.

“अहो, काय सांगू? काल आपल्या मनूने रस्त्यावर लंगडत चाललेलं मांजरीचं पिल्लू घरी आणलंय! काय करू आता मी त्याचं? स्कॉलरशिपच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की पिल्लाच्या मागे धावायचं? काय म्हणावं आता हिला?”

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

“काय रे? कुणाशी भांडण झालं का? मारामारी झाली का?” आईने विचारले. अवी म्हणाला. “अग रवीशी, माझ्या बेस्ट फ्रेंडशी शेजारच्या वर्गातली मुले भांडायला आली, मग मारामारी नाही का होणार? सोड तू, तुला नाही कळणार!” १३ वर्षांचा अवी आईला सांगत होता.

हेही वाचा…Health Special : सायबर बुलिंग कसं खच्चीकरण करतं? ते झाल्यास काय करायचं?

काय सांगतात हे प्रसंग? साधारण ६ ते १४-१५ वर्षांच्या शालेय वयात मुलांचा मनोबौद्धिक विकास वेगाने होतो. मोठ्यांना अचंबितच करणारा असतो! त्यांचे भाषेवरचे प्रभुत्त्व वाढते. ही मुले क्लिष्ट संकल्पना मांडू लागतात, विचार स्पष्ट करू लागतात. वाक्प्रचार, म्हणी यांचा बोलताना, लिहिताना अर्थ समजून उमजून उपयोग करतात. “ आई, माणसाने सद्सद् विवेकबुद्धी वापरून वागावे’ अशासारखे वाक्य मुलाने उच्चारले की आई तोंडात बोट घालते!

या वयात विचार क्षमता प्रचंड वाढते. वस्तू कायम राहणे (conservation) म्हणजे काय ते समजते, त्यामुळे चिकणमातीचा बनवलेला चेंडू मोडून जर चकती बनवली तर तेवढीच चिकणमाती वापरली आहे हे समजते. मुले तपशीलांमध्ये जाऊ लागतात. विविध गोष्टींची, त्यांच्या प्रकारांची तुलना करायला शिकतात. १२ वर्षांनंतर तर विचार अधिक तर्कसुसंगत(logical) बनतात. सुपरमॅन सारखा सुपर हिरो त्यांना आवडतो, पण त्याच्या अतिमानवी कारवायांना १२-१३ वर्षांची मुले शास्त्रीय कारणे शोधू लागतात. कल्पनेच्या भराऱ्या मारतानाही हेरगिरी, युद्धातील डावपेच या गोष्टी आवडायला लागतात. नियम, योग्य अयोग्य समजू लागते, तात्विक संकल्पना कळू लागतात. लोकशाहीची प्रक्रिया समजते, त्यामुळे त्यांना आपल्या मताचे महत्त्व लक्षात येते. म्हणून हिरीरीने वाद घालायला लागतात.

९ व्या, १० व्या वर्षापासून लक्ष केंद्रित होऊ लागते. मेंदूतील प्रक्रियासुद्धा परिपक्व व्हायला लागतात. स्नायूंची ताकद वाढते आणि स्नायूंमधील समन्वय(coordination) वाढतो. त्यामुळे सलगपणे लिहिता येते, मुले मोठी मोठी उत्तरे आणि निबंध लिहो लागतात आणि कलात्मकतेने चित्र काढू शकतात. शालेय वयात मित्र मैत्रिणीचे वर्तुळ वाढते आणि अधिकाधिक महत्त्वाचे बनते. ‘बेस्ट फ्रेंड’ तयार होतो किंवा होते. प्रेम, माया मनात असतेच, पण आता दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला लागतात. आपले कुटुंब, परिवार, मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी अशा सगळ्यांशी दीर्घकालीन संबंध तयार होतात आणि ते आयुष्यात आधार देणारे ठरतात.

हेही वाचा…Health Special : संथ विषाणूची गोष्ट

याच वयात मुलगी अधिकाधिक आईसारखी होते, तर मुलगा वडिलांसारखा. ज्या मुली आपल्या आईला आदर्श मानून तिच्यासारख्या होऊ शकत नाहीत, त्यांना पुरुषांची, स्त्रियांची किंवा सगळ्यांचीच भीती मनात निर्माण होते. मुलांच्या बाबतीतही असे घडू शकते. वडील लक्ष न देणारे असले, तर मुलांच्या मनात पुरुषांची भीती तयार होऊ शकते, स्वतःच्या पुरुषत्वाबद्दल(masculinity) मनात शंका निर्माण होते, ही मुले आईला सोडत नाहीत, शालेय शिक्षणात मागे पडू शकतात. आई-वडील यांच्याशी निरोगी नाते असणे मुलांच्या योग्य वाढीसाठी म्हणून आवश्यक असते.

याच काळात लिंगभेद उमजू लागतात, मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांविषयी मनात भावना निर्माण होऊ लागते. विशेषतः मुलांमध्ये आपल्या लिंगाशी खेळणे, लिंगवाचक शिव्या किंवा शब्द शिकणे असे प्रयोग मनात लैंगिक भावना निर्माण होताना केले जातात. मुलांना आणि मुलींना समाजात विशिष्ट पद्धतीने वाढवले जाते. अगदी मुलींना गुलाबी रंगाचे कपडे आणि मुलांना निळ्या रंगाचे कपडे इथपासूनच मुला मुलींमध्ये फरक केला जातो. मुलांमध्ये अधिक आक्रमकता निर्माण होईल अशा मैदानी खेळांना प्रोत्साहन दिले जाते. मुलाने लवकर स्वतंत्र व्हावे, कोणावर अवलंबून राहू नये अशी शिकवण दिली जाते. उदा. बसने एकट्याने जाणे, सायकलने शाळेत जाणे याची मुलांना लवकर परवानगी मिळते. मुलींना मात्र अधिक काळ दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवले जाते.

मुली शब्दांने आणि स्पर्शांनी व्यक्त करायला शिकतात. नट्टापट्टा करायला शिकतात. शब्दांवर भर असल्यामुळे चांगले भांडू शकतात. स्त्री आणि पुरुष यांची भूमिका वठवायला मुली आणि मुलगे शिकू लागतात. आता अर्थात अनेक मुलींना मैदानी खेळ, आक्रमक खेळ, यातून, शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमधून समाजात ‘पुरुषी’ समजल्या गेलेल्या अनेक भूमिका वठवायला मिळतात. तसेच मुलांना संवाद साधण्याच्या क्षेत्रामध्ये जायला प्रोत्साहित केले जाते. मुलींची अनेक कामे मुलगे ही करू शकतात. समाजाच्याही अपेक्षा दिवसेंदिवस बदलत चालल्या आहेत. या सगळ्यामुळे मुलगे आणि मुली यांच्या लिंगनिहाय भूमिकांमधील फरक धूसर होत चालले आहेत.

हेही वाचा…Health Special : ‘सिटिंग इज न्यू स्मोकिंग’ असं का म्हटलं जातंय?

अशा प्रकारे शालेय वय हे अतिशय गतिमान बदलांचे, अपेक्षांचे आणि त्यामुळे संघर्षाचे ठरते. अनेक मनोविकार बालपणात पाहायला मिळतात. मुलांच्या मेंदूविकसनामधील (neurodevelopmental) विविध समस्यांचा पुढील लेखापासून आपण विचार करू.

Story img Loader