संथ हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर धीम्या गतीने चालणारी चौचाकी, दुचाकी, आगगाडी, अथवा चौकार पार करू पाहणाऱ्या चेंडूच्या मागे सावकाश धावणारा खेळाडू, किंवा सोप्या प्रश्नाचे खूप विचार करून आणि सावधपणे उत्तरे देणारा विद्यार्थी अशी अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येतात. संथ विषाणू (Slow Virus) हे शीर्षक पाहिल्यावर विषाणू कसा संथ म्हणजेच धीमा गणला जाऊ शकतो, असा प्रश्न आपल्या मनात नक्की आला असेल. मग एक उलट प्रश्न मनात येतो कि मग जलद विषाणू कोणते असावेत.

सामान्यपणे विषाणू किंवा विषाणूसारखा जीव जो यजमान पेशीमध्ये हळूहळू पुनरुत्पादित होतो आणि त्यांचा दीर्घ उष्मायन कालावधी असतो त्याला संथ विषाणू म्हणतात. संथ विषाणूजन्य रोग हा एक असा आजार आहे जो संथ विषाणूचा शरीरात संक्रमण झाल्यानंतर दीर्घ कालावधीच्या विलंबानंतर, मंद, प्रगतीशील मार्गाचा अवलंब करीत होतो. हा विलंब अनेक महिने ते अनेक वर्षांचा असतो. बहुतेक वेळा मध्यवर्ती मज्जासंस्था या रोगाचे प्रमुख केंद्र असते आणि बहुतेक प्रकरणांमध्ये मृत्यू होतो. या विषाणूचे मूळ उगमस्थान म्हणजे संक्रमित प्राण्याचे शरीर प्रभाग – स्नायू, मेंदू, लहान मेंदू, परिघीय चेता संस्थेचे प्रभाग.

Are you trying to lose weight then avoid eating tea and toast for breakfast find out why from experts
वजन कमी करताय? मग सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि टोस्ट खाणे टाळा; का ते घ्या जाणून तज्ज्ञांकडून….
Find out what happens to the body when you take 20-minute naps every 4 hours for a week
आठवड्यातून दर चार तासांनी २० मिनिटांची डुलकी घेतल्यास…
Chewing ice habit is a deficiency and it can harm your health says experts
तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? मग ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक, तज्ज्ञ सांगतात…
Three Finger Rule For Making sandwich
Perfect Sandwich Tip : सँडविच बनवताय? मग हा ‘थ्री फिंगर रूल’ नक्की ट्राय करून पाहा, आहारतज्ज्ञ म्हणतात की…
Heres how many calories astronauts need in space to stay energetic
अंतराळवीरांना अंतराळात उत्साही अन् तंदुरुस्त राहण्यासाठी किती कॅलरीज आवश्यक आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
healthy food in winter
Immunity Boosting Food : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
women prefer hot water baths
अनेक महिला गरम पाण्याने अंघोळ करण्यास का पसंती देतात? तज्ज्ञांनी सांगितले वैज्ञानिक कारण
aloo paratha poha bread omelette high blood sugar
Breakfast That Spikes Blood Sugar: बटाट्याचे पराठे, एक वाटी पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? वाचा तज्ज्ञांचे मत आणि उपाय

अशा या वेगळ्या प्रकारच्या, म्हणजेच संथ विषाणूबद्दल आणि त्यांचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे या संबधी थोडं जाणून घेऊया.

हेही वाचा…Health Special : ‘सिटिंग इज न्यू स्मोकिंग’ असं का म्हटलं जातंय?

इतिहास

ऐतिहासिकदृष्ट्या, “संथ विषाणू संसर्ग” हा शब्द विषाणूजन्य रोगांच्या व तत्सम रोगांसाठी वापरण्यात आला होता जो नंतर अनेक पारंपारिक विषाणूंमुळे, तसेच काही “अपारंपरिक” संसर्गजन्य घटकांमुळे हा रोग होतो असे आढळले. संथ विषाणूची संकल्पना सर्वप्रथम आइसलँड मधील फिजिशियन ब्योर्न सिगर्डसन यांनी १९५४ मध्ये मांडली होती. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मेडि-व्हिस्ना आणि स्क्रॅपीसह मेंढ्यांमधील संथ रोगांवर प्रथमच मूलभूत अभ्यास केला होता. मेडि-व्हिस्ना हा लेंटिव्हायरस या संथ विषाणूमुळे होत हे निश्चित झाले.

सुमारे १९८० मध्ये एड्सची एकूण लक्षणे आणि विकृतिजनन प्रक्रिया पाहून त्याच्या रोगकारक विषाणू हा देखील एक लेंटिव्हायरस, एच.आय.व्ही (HIV) म्हणजेच एक संथ विषाणू आहे हे निश्चित झाले. कालांतराने काही प्राण्यांमधील एका मेंदूच्या रोगांमध्ये एक “अपारंपरिक” रोगकारक जो हळूहळू संक्रमणास कारणीभूत ठरतो तो आता अविषाणूजन्य (Non-viral) “प्रथिनेसदृश्य, संसर्गजन्य” कारक किंवा प्रिओन (PRION) म्हणून ओळखला जातो. प्रिओन मेंदूचे रोग निर्माण करणारे संथ रोगकारक सजीव आहेत व त्यातील एक महत्वाचा आहे “ट्रान्समिसिबल स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी” (टी.एस.इ, TSE). जनावरांमधील प्रिऑनच्या रोगांमध्ये मेंढ्यांमधील “स्क्रॅपी” आणि गायींमध्ये “बोवाइन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी” (बी.एस.इ, BSE) यांचा समावेश होतो. मानावामध्ये कुरु, क्रेउत्झफेल्ड-जेकोब रोग (सी.जे.डी), गेर्स्टमन-स्ट्रॉस्लर-शेंकर (जी.एस.एस) सिंड्रोम आणि फॅटल फॅमिलीअल इन्सोमिआ (एफ.एफ.आय) असे प्रिओनमुळे होणारे आणखी काही रोग आहेत. १९८० च्या दशकात युनायटेड किंगडम (यूके)मध्ये स्क्रॅपीची प्रथम नोंद झाली. नोव्हेंबर १९८६ मध्ये युकेमधील गुरांमध्ये बी.एस.इची लक्षणे दिसून सर्वप्रथम आढळली. टी.एस.इच्या जोखमीचा पहिला अहवाल डब्लू.एच.ओने १९९७ मध्ये नोंदविला.

हेही वाचा…Health Special : केटोजेनिक आहाराचे नेमके परिणाम काय आहेत? (भाग १)

संथ विषाणूची शरीर रचना

प्रिओन मध्ये डी.एन.ए. अथवा आर.एन.ए. नसून केवळ विशिष्ट ठिकाणी घडी केलेल्या प्रथिनांचा पट्टा असतो. निव्वळ प्रथिने असून देखील प्रिओन मध्ये स्वतःची प्रतिकृती तयार करण्याची एक क्लिष्ट क्षमता असते. प्रिओन हे जीवाणूंपेक्षा लहान आणि विषाणूंपेक्षाही लहान असतात. सामान्य जीवाणूंचा आकार सुमारे १ ते ५ मायक्रोमीटर असतो तर विषाणूचा सरासरी आकार २०-२०० नॅनोमीटर (व्यास) असतो. तर, सामान्य प्रिओनचा आकार १५ नॅनोमीटर (व्यास) पेक्षा कमी असतो. बी.एस.इ आणि टी.एस.इच्या सखोल संशोधनावरून असे आढळते की प्राणी पेशींमधील काही प्रथिनांमध्ये उत्परिवर्तनांमुळे चुकीची प्रथिने तयार होतात. या अनियमित प्रथिनांमुळे मज्जासंस्थेमध्ये मंदपणे काही बदल सुरु होतात आणि काही वर्षांनी तीव्र लक्षणे आढळतात. असा विपरीत प्रथिने संक्रमित प्राणी या प्रिओनचा वाहक ठरू शकतो. त्याचे पर्यावसान मृत्यू मध्ये होते.

औषधे आणि प्रिओन (टी.एस.इ/ बी.एस.इ)

प्राणघातक अशा टी.एस.इ/ बी.एस.इचे औषध क्षेत्रात महत्व अनन्यसाधारण आहे. प्रिओन-दूषित ऊतीचे, पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे पूर्ण निर्जंतुकीकरण अशक्य असते. फॉर्मेलिन व अल्कोहोल, उष्णता, अतिनील किरण, मायक्रोवेव्ह किरण, आयनीकरण विकिरण आणि सर्वसामान्य बहुतेक जंतुनाशकांचा प्रिओनवर फारसा प्रभाव होत नाही. आल्डिहाईड आणि कीटोन सारखी रासायनिक बंधके प्रिओनची मात्रा फारशी कमी करू शकत नाही. तसेच प्रिओनचे कण हे स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिक पृष्ठभागांना कित्येक दिवस चिकटून सक्रिय राहू शकतात व त्यांची संसर्गजन्यता कमी होत नाही. तसेच असे पृष्ठभागाना चिकटलेले प्रिओन निर्जंतुकीकरणास अत्यंत प्रतिरोधक असल्याचे दिसते. १३४°से वाफेच्या तापमानास आणि ३० पौंड्स प्रति चौरस इंच वाफेच्या दाबास १८ मिनिटात प्रिओन चे निष्क्रियीकरण होते. औषध निर्मिती कारखान्यात कोणत्याही पदार्थाच्या निर्जंतुकीकरणासाठी १२१°से वाफेच्या तापमान आणि १५ पौंड्स प्रति चौरस इंच वाफेचा दाब १५ मिनिटासाठी वापरला जातो. म्हणजेच या तापमानास प्रिओन सक्रिय राहू शकतात. शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे की काही प्रिओन ३६०°से तापमानाच्या कोरड्या उष्णतेत १ तासासाठी तग धरू शकतात. एका शास्त्रज्ञ गटाने असे आढळले आहे कि ६००°से पर्यंत तापमान वाढवून काही प्रिओनना जाळण्याचा जरी प्रयत्न केला तरीही ते टिकून राहतात. जणू ते धातूचे तुकडे आहेत. या वरून सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेल कि कोणत्याही औषधातून अथवा त्यांच्या निर्मितीस लागणाऱ्या कच्या मालातून टी.एस.इ/ बी.एस.इ नाहीसे करणे किंवा कमी करणे किती अशक्य आहे. म्हणून मानवी सुरक्षिततेसाठी यावर काही ठोस प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचारांची गरज आहे हे सर्वांच्या लक्षात आले.

हेही वाचा…Health Special: केटोजेनिक आहाराचे नेमके दुष्परिणाम असतात का? कोणते? (भाग दुसरा)

टी.एस.इ/ बी.एस.इ नेमके मानवात कसे प्रवेश करतात? आणि लक्षणे

याची पहिली पायरी म्हणजे संवेदनशील शेळी / मेंढी मध्ये उत्परिवर्तनाने उत्स्फूर्तपणे पेशींमधील / ऊतींमधील काही प्रथिनांमध्ये अनियमित घड्या पडतात. यांच्या मांसाची पूड गायींना आणि इतर दुभत्या जनावरांना त्यांच्या दुधाचे प्रमाण वाढावे म्हणून खाद्य म्हणून दिले जाते. किंवा अशा संसर्गित प्राणी व्युत्पन्न उत्पादने (प्रथिने, विकरे, एमिनो आम्ले, रक्तद्रव, रक्त उत्पादने, कॅप्सूल साठी वापरले जाणारे प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले जिलेटिन, आणि सूक्ष्मजीवांच्या लागवडीसाठी वापरली जाणारी पोषक द्रव्ये व किण्वन प्रक्रियांसाठी वापरली जाणारी प्राणिजन्य द्रव्ये) औषध निर्मितीसाठी वापरली जातात. उच्च तापमानात आणि विविध जंतुनाशिके यांना न जुमानणाऱ्या टी.एस.इ/ बी.एस.इची रवानगी या औषधांमार्फत मानवात होते आणि काही वर्षानंतर प्रिओनजन्य रोगांची लक्षणे दिसू लागतात. मंदपणे चेतासंस्थेत बिघाड होऊन पर्यावसान मृत्यू मध्ये होते. लक्षणांमध्ये बर्‍याचदा वर्तनातील बदल, शरीर थरथरणे, शरीराचा व एकूण हालचालींमध्ये असुंतुलितपणा, उत्तेजितपणा आणि अतिक्रियाशीलता यांसारखी मज्जासंस्थेशी संबंधित बदल आढळतात. एकदा लक्षणे दिसू लागली की काही आठवड्यात प्राणी मृत्यूमुखी जातो.

प्रतिबंधात्मक उपाय

प्राणीजन्य उत्पादित कोणत्याही उत्पादनासाठी वापरले नसल्यास, टी.एस.इ/ बी.एस.इचा धोका नाही. तथापि, टी.एस.इ/ बी.एस.इ जोखीम पूर्ण टाळायची असल्यास संबंधित सर्व कच्चा माल/ पॅकिंग सामग्रीसाठी प्राणिजन्य मुक्त असण्याची सर्टिफिकेट गरजेचे आहे. कोणत्याही पदार्थातील टी.एस.इ/ बी.एस.इ परीक्षणाच्या प्रयोगशाळा भारतात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. प्राण्यांच्या उत्पत्तीच्या सामग्रीची अनिवार्य आवश्यकता असल्यास, कमी संसर्गजन्य सामग्रीला प्राधान्य दिले पाहिजे. रक्तद्रव, लसी आणि रक्त यांसारख्या जैवतंत्रज्ञान उत्पादनांसाठी टी.एस.इ/ बी.एस.इ नसल्याच्या परीक्षणाच्या सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे. मेंढ्या/शेळ्यांमध्ये स्क्रॅपी विकसित होण्याचा धोका त्याच्या अनुवांशिक प्रजातीवर अवलंबून असतो आणि अनुवांशिकदृष्ट्या स्क्रॅपी म्हणजेच टी.एस.इ/ बी.एस.इ प्रतिरोधक प्राणी निवडणे ही प्रतिबंधात्मक प्रयत्नांना मदत करू शकते. टी.एस.इ/ बी.एस.इ कणांच्या एकूणच विषयांवर व त्यांच्या खास लक्षणांवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे.