योगर्ट! आजकाल सर्वत्र अतिशय वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारं दह्याचं आणखी एक रूप. वेगेवेगळ्या ब्रॅण्ड्स नि योगर्ट लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा स्वरूपात बाजारात आणून ठेवलंय. पण हे योगर्ट नक्की कसं काय उदयास आलं ? दही आणि योगर्ट यात वेगेळेपण ते काय ते आजच्या लेखात जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मी योगर्ट खाते आणि हा दही खातो’, नित्या आणि निषादच्या सेशनमध्ये दोघं एकमेकांचं शिस्तबद्ध खाणं कसं सुरु आहे ते सांगत होते.

‘योगर्ट आणि दही सेमच आहे’, निषाद म्हणाला.

‘नाही, दही घरगुती असतं. योगर्ट तयार करावं लागतं’, नित्या ठामपणे म्हणाली आणि सेशन सुरु असताना दोघांनी माझ्याकडे प्रतिक्रियेसाठी पाहिलं. बरोबर ना ?’ मी होकारार्थी मान डोलावली .

‘हो एवढ्या स्ट्रॉबेरी ,२ काजूचे तुकडे , थोडं जेली हे सगळं दह्यात थोडं थोडं टाकायचं म्हणजे बनवावंच लागणार’, निषाद हसून म्हणाला.

हेही वाचा…Health Special: खरूज का होते? काय काळजी घ्याल?

‘गोड फ्लेवर्ड योगर्टपेक्षा घरचं दही जास्त पौष्टिक आहे’, मी म्हटलं

‘आणि ग्रीक योगर्ट खाल्लं तर?’, इति नित्या

‘अगदीच चालेल, मी म्हटलं.

‘ग्रीक योगर्ट मध्ये घरची फळं एकत्र करून खाल्लं तर चालतं ना? नित्या फळं आणि योगर्ट आहारात सामावून घ्यायला उत्सुक वाटली.

‘हो. तुला ऑफिसच्या गडबडीत योगर्ट न्यायला सोपं पडत असेल नाही’ ? मी असं विचारताच नित्या सुखावून म्हणाली

‘थँक्स . मी याला तेच सांगत होते. एकतर ते सहज सोपं आहे. सांडत नाही आणि बरोबरीने फळं पण खाल्ली जातात’.

हेही वाचा…Health Special: काय खाण्याने अंतर्गत शारीरिक दाह कमी होतो?

योगर्ट हा खरंतर एक टर्की शब्द आहे. टर्की शब्द योग याचा अर्थ होतो घट्ट होणे किंवा पदार्थ एकसंध होणे. तुर्कस्तान मधून ग्रीस, इजिप्त अशा देशांमध्ये प्रवास करत करत हळूहळू योगर्टने आपल्या आयुष्यात हलकेच प्रवेश केलेला आहे.

संशोधकांच्या नजरेतून पाहायचं झालं तर दुधापासून दही तयार होताना त्यात तयार होणाऱ्या जीवाणूंच्या सक्रियतेमुळे आंबण्याची प्रक्रिया होते. लॅकटोबॅसिलस ह्या दह्यातील जीवाणूंबद्दल आपण ऐकलं असेलच. दह्याचा आंबटपणा आणि एकसंधता यासाठी लॅक्टोबॅसिलस कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे योगर्टमध्ये असणारे विविध जीवाणू ( जास्तीच्या जीवाणूंचे प्रमाण ) त्याच्या एकसंधपणाचं कारण असतात. त्यामुळे योगर्ट घरगुती दह्यापेक्षा अंमळ घट्ट आणि मलईदार असतं .

हेही वाचा…Health Special : कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी ‘हे’ नक्की खा

शिवाय योगर्ट मध्ये उत्तम प्रमाणात पोषणमूल्ये आहेत. प्रोबायोटिक्स , तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व आणि खनिजे यांचं उत्तम संतुलन योगर्टमध्ये आढळून येतं.

ज्यावेळी एम थर्मोफिले आणि एल बल्गारिकस या जीवाणूंचे ठराविक तापमानात (अत्यंत कमी तापमानात ) तीन ते आठ तास जतन करून ठेवण्यात येतं तेव्हा त्त्यांच्या सक्रिय प्रक्रियेतून दुधातील कर्बोदके, प्रथिने, फॅट्स यांच्या रचनेतदेखील बदल होतात. यातूनच योगर्टमध्ये असणाऱ्या आम्लांशाची वेगळी चव तयार होते. योगर्ट तयार होत असताना त्यातील फॉस्फरस आणि कॅल्शिअमचे प्रमाण देखील वाढते.

योगर्ट नियमित सेवन केल्याने आतड्याचे आरोग्य सुधारते. हाडांच्या मजबुतीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी योगर्ट नियमित आहाराचा भाग असणे आवश्यक आहे.

विशेषतः स्त्रियांसाठी कॅल्शिअम , आवश्यक स्निग्धांश आणि प्रथिनांचं उत्तम मिश्रण असणारं योगर्ट सर्वोत्तम आणि पोषक मानलं जातं. जीवनसत्त्व ड चे उत्तम प्रमाण असणारे योगर्ट सांधेदुखी, हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

हेही वाचा…Health Special : जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून! 

मासिक पाळी पूर्वी अनेक स्त्रियांना काहीतरी मलईदार खावंसं वाटतं. योगर्ट हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

ज्यांना घाईघाईत सकाळचा नाश्ता करायचा आहे त्यांनी धान्ये किंवा फळांसोबत योगर्ट खाण्यास हरकत नाही. ज्यांना कोरडी त्वचा , केसांचा कोरडेपणा, केसात कोंडा होणे अशा तक्रारी आहेत त्यांनी किमान १०० ग्राम योगर्ट रोजच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे . ग्रीक योगर्ट मध्ये साठवणीच्या पदार्थांचं ( ऍडिटिव्स ) च प्रमाण अत्यल्प असतं . शिवाय फ्लेवर्ड योगर्टपेक्षा यात दुप्पट प्रमाणात प्रथिने असतात.

शिवाय सोडिअम प्रमाणदेखील कमी असतं . लहान मुलांसाठी देखील योगर्ट अत्यंत पोषक खाद्य आहे . मधुमेहींसाठी देखील ग्रीक योगर्ट पोषक आहे .

हेही वाचा…Health Special: पालकत्वाची शिकवणी

मात्र ज्या महिलांना हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे संप्रेरकांचे असंतुलन आणि दुधाची ऍलर्जी आहे त्यांनी मात्र योगर्ट किंवा ग्रीक योगर्ट कटाक्षाने टाळावे .

अलीकडे बाजारात उपलब्ध असणाऱ्या योगर्ट मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध फ्लेवर्स (चवदार मिश्रणामुळे ) योगर्ट जास्त दिवस व्यवस्थित साठवून ठेवलं जाऊ शकतं .कधी फळाचे रस तर कधी साखरेचा वापर करून गोडवा आणलेलं योगर्ट आपल्याला सहज मिळतं. शुगर फ्री योगर्ट म्हणून स्टीव्हिया किंवा तत्सम गोडवा आणणारे पदार्थ एकत्र करून तयार केलेलं योगर्ट न खाणं उत्तम.