Health Special : पावसाळी भाज्या विशेषतः रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे यांचं विश्वच वेगळं आहे. पावसाळ्यात नेहमीपेक्षा अंमळ कमी प्रमाणात असणाऱ्या पालेभाज्यांमुळे पावसाळ्यात हिरव्या भाज्या आहारात कशा समाविष्ट करायच्या याबद्दल प्रत्येकासमोर प्रश्नचिन्ह असतं. आजच्या लेखात याच भाज्यांविषयी जाणून घेऊया.

प्रत्येक भाजी बाजारात एक ओळखीच्या हसतमुख मावशी असतात. भाजी खरेदी करणाऱ्या अनेक लोकांशी त्यांचं जणू पिढ्यानपिढ्या कौटुंबिक सख्य असतं. भाजी घेणं आणि त्याबाबत चोखंदळ असण्याबद्दल त्यांना विशेष कौतुक असतं. आमच्या बाजारात अशाच एक मावशी आहेत. ज्यांच्याकडे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या भाज्या मिळतात, त्या आवर्जून प्रत्येक भाजीबद्दल सांगत असतात. “फोडशी खाऊन बघा ताई. केळफूल मी देते तुम्हाला साफ करून. काय चवदार भाजी होते!”, असं भाजी देता देता पालुपद नेहमी सुरु असतं. यावेळी मात्र त्यांच्या समोरच्या एका वेगळ्या भागात ठेवलेल्या भाज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं .

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी

हेही वाचा…काखेजवळील फॅट्स, दंडाखालील चरबी कमी करण्याचे सोपे व्यायाम वाचा; डॉ. मेहतांचा सल्ला वापरून स्लिव्हलेस घाला बिनधास्त

रानभाज्यांचा मोसम

“कर्टुलं आहे ते, आपल्या कारल्याची बहीण म्हणा. तक्रारीला जागा नाही. कांडा तेलावर भाजी मस्त होते.” मला तसंही कारलं आवडतं. त्यामुळे मी हिमतीनं कर्टुलं घेतलं, सोबत टाकळा, फोडशी या भाज्यासुद्धा घेतल्या. नेहमी पावसाळ्यातून पालेभाज्या नकोत म्हणून हिरव्या भाज्या कमी खाणाऱ्या लोकांना उत्तर म्हणून या भाज्यांची रेलचेल घराघरांत व्हायला हवी हे प्रकर्षाने जाणवलं. पावसाळ्यात मुंबईसह अनेक भागात विविध रानभाज्या मिळतात त्याचबद्दल आज माहिती करून घेऊ.

टाकळा

टाकळ्याची पाने दिसायला मेथीच्या भाजीसारखी दिसतात मात्र खूप पातळ आणि हलकी असतात. खरंतर गुणधर्माने उष्ण पण, पचायला सोपी अशी ही भाजी अत्यंत चविष्ट असते. विविध हरितकांनी परिपूर्ण असणारी ही भाजी त्वचाविकारांसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

हेही वाचा…चहामध्ये तूप टाकून प्यावे का? आतड्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….

कर्टुलं

दिसायला तोंडली किंवा लहान कारल्यारखी दिसणारी कर्टुल्याची भाजी मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी आहे. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवणे करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी कर्टुल्याची भाजी औषध म्हणून खाल्ली जाते. अनेक जण कर्टुल्याचा सलाडमध्ये किसून वापर करतात. लिंबू- तिखट-बेसन एकत्र करून केलेलं कर्टुल्याचे सलाड चविष्ट असते.

फोडशी

गवतासारखी दिसणारी ही पालेभाजी कळलं, कुल्लू, कुळी या नावांनीदेखील ओळखली जाते. पावसाळ्यातील भाज्यांमध्ये आहारतज्ज्ञांची काहीशी लाडकी असणारी ही पालेभाजी आहे. अनेक आरोग्यदायी औषधामध्ये फोडशीचा पाला वापरला जातो. शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ तयार करताना फोडशीची भाजी वापरली जाते. तंतुमय पदार्थानी भरपूर आणि लोह, खनिजांची भरपूर असणारी ही भाजी वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त आहे.

हेही वाचा…बाळाचा रंग उजळण्यासाठी केशर फायदेशीर ठरते का? जाणून घ्या गर्भवती महिलांनी केशराचे सेवन का करावे?

कपाळफोडी

गमतीशीर नाव असणारी ही वेल -भाजी आहे. आतून पोकळ आणि आणि चवीला उत्तम असणारी ही भाजी विशेषत: स्त्रियांसाठी आरोग्यदायी आहे. ज्यांना मासिक पाळी नियमित येत नाही, त्ंयाच्या साठी कपालफोडीची भाजी गुणकारी आहे. ज्यांना मलावरोध , पोटाचे विकार किंवा पित्त प्रकृती आहे त्यांच्यासाठी ही भाजी अत्यंत पोषक आहे.

सागरमेथी

मेथीचं कोवळं आणि लहानखूर रूप म्हणजे सागर मेथी! पालेभाज्यांची मुळं आपण भाजी करताना वेगळी करून टाकून देतो मात्र सागर मेथी त्याच्या पाल्यासह आणि मुळांसह खाल्ली जाते. या पालेभाजीत असणारी हरितके आणि खनिजे आहाराचं संतुलन उत्तमरित्या सांभाळतात .

भारंगी

काटेरी पानं असणारी भारंगाची भाजी जून ते ऑगस्ट दरम्यान बाजारात उपलब्ध असते. शरीरातील आम्लांचे प्रमाण संतुलित करून पचनक्रिया सुधारण्यासाठी भारंगीची भाजी उपयुक्त आहे. प्रोबियॉटिक आणि प्रिबायोटिकच्या काळात ही भाजी आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.

हेही वाचा…Health Special: यश म्हणजे नेमकं काय? ते कशात असतं?

शेवळं

शेवळं म्हणजे सुरणाच्या रोपट्याचा देठ. ही भाजी आणून साठवून ठेवणं अवघड असतं. ऊर्जेचं मुबलक प्रमाण आणि तंतुमय पदार्थांनीयुक्त अशी ही भाजी प्रथिनयुक्त आहे. विगन आणि शाकाहारी वर्गासाठी ही भाजी प्रथिनांच्या प्रमाणामुळे अत्यावश्यक आहे.

मायाळू

मायाळूची भाजी पित्तशामक आणि औषधी आहे. हाडांच्या मजबुतीसाठी उत्तम आणि सांधेदुखी कमी करणारी ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून आहारात समाविष्ट करावी.

हेही वाचा…दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी करा ही योगासने, एकदा Video पाहाच

मुंबईत वसई, पनवेल, वाशी भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या या भाज्या अलीकडे बाजारात सहज मिळतात . या भाज्या करताना त्या केवळ धुवून लोखंडी भांड्यात हलक्या आचेवर कमीत कमी मसाले वापरून परतून आहारात समाविष्ट कराव्यात. प्रत्येत ऋतुमानानुसार मानवी आहार संतुलित राहण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची निसर्गदत्त देणगी आपल्या देशाला मिळालेली आहे. कोणत्याही हरितकांची केवळ औषधे आणि गोळ्या खाण्याऐवजी वरील पदार्थांचा आहारातील वापर नक्कीच आरोग्यदायी ठरू शकतो .