‘अगं, कित्ती गोड हसते गं ही!’ किंवा ‘भराभर पावले उचायला लागला की हा!’ असे लहान बाळांच्या बाबतीत कौतुकोद्गार अनेक वेळा आपण ऐकतो. आपल्या घरात किंवा आजूबाजूला एखादे लहान बाळ असले की बाळाची प्रगती कशी होते आहे, वेळेवर होते आहे की नाही, अशी सगळ्यांना उत्सुकता असते आणि थोडीशी काळजीही वाटते.

बाळ आईचे दूध व्यवस्थित पिऊ शकते आहे की नाही इथपासून ते त्याला नीट ऐकू येते आहे की नाही, बाळ पालथे कधी पडू लागले, बसू कधी लागले, चालू कधी लागले, बोलू कधी लागले या सगळ्याकडे घरातल्यांचे बारीक लक्ष असते.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

बाळ हळूहळू मोठे होत असते. त्याच्या शरीरातील स्नायू, त्याच्या हालचाली, त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया विकसित होतात. चोखणे, गिळणे, श्वासोच्छवास करणे, हृदयाची क्रिया या जन्मतःच क्रियान्वित होतात. इंद्रियांचा विकास होऊ लागतो. अगदी एक दिवसाच्या बाळाला आईच्या दुधाचा वास समजतो आणि तीन दिवसातच आईचा आवाज ओळखू येतो! भाषा, बौद्धिक क्षमता, भावना, सामाजिक क्षमता यांचा विकास होताना जवळच्या व्यक्तीचा स्पर्श, जवळ घेणे, बाळाशी बोलणे, गप्पा मारणे अशा सर्व वातावरणातील गोष्टींचा भरपूर परिणाम होतो.

हेही वाचा…Health Special : आहारशास्त्राचा अभ्यास कसा असतो?

चौथ्या महिन्यापर्यंत बाळ सगळ्यांकडे पाहून, एखाया गोष्टीला प्रतिसाद म्हणून हसू लागते. वातावरण अपरिचित असेल तर त्याची त्याला जाणीव होते. दहा महिन्याच्या बाळाला आई आपल्याला सोडून कुठेतरी गेली आहे याची जाणीव होते, आईपासून दूर होताना भीती निर्माण होते.(separation anxiety). याच सुमाराला बाळासोबत लपालपीचा ‘कू कू,’ म्हणत चेहरा लपवण्यासारखा, तालात टाळ्या वाजवण्याचा असे काही खेळ खेळता येतात. बाळ वर्षाचे होताना त्याच्या मनातली उत्सुकता, नाविन्याची ओढ वाढीला लागते. ते नवीन नवीन गोष्टी करून पाहायला लागते.

दीड वर्षाचे बाळ हात धरून जिना चढते, न पडता स्वतंत्रपणे चालायला लागते. ठोकळ्यांचा मनोरा बनवायला शिकते आणि कागदावर स्वतःच रेघोट्या ओढू लागते. दोन वर्षाचे बाळ एकटे धावते, मोठ्ठा बॉल लाथेने उडवते, एकटेच जिना चढते आणि उतरते. हातापायांच्या बोटांच्या हालचालीत सफाई येते. त्यामुळेच उभ्या आडव्या रेषा काढू शकते.

दीड वर्षापासूनच बाळ सांडत सांडत का होईना स्वतःचे स्वतः खायला शिकते. आपण दाखवू तशी नक्कल करते. ‘सोनू गाते कशी?’ असे म्हटल्यावर गाण्याची क्शन करून दाखवते. दोन वर्षाचे ‘सोनू’ स्वतःचे नाव सांगू शकते, ती आईला ‘नाही’ म्हणायला लागते! इतर मुलांशेजारी बसून आपलेआपले खेळते (पण अजून इतर मुलांबरोबर खेळत नाही) आणि आईपासून दूर होण्याची भीती हळूहळू नाहीशी होते.

हेही वाचा…झोपेत घोरणे मधुमेहासाठी कसे धोकादायक ठरू शकते? घोरणाऱ्या व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका असतो का?

भाषेमध्येही वेगाने प्रगती होते. अगदी लहानपणी भूक लागली की, काही दुखले की, झोप आली की प्रत्येक वेळचे रडणे वेगवेगळे असते. सात आठ महिन्याचे मूळ विविध आवाज करत संवाद साधू लागते. हाक मारली की आवाजाने प्रतिसाद देते. आपली आपली निरर्थक बडबड करायला लागते आणि घरात सगळ्यांना अतिशय आनंद होतो! बाळाने पहिला शब्द काय उच्चारला हे ठरवण्याची जणू स्पर्धाच लागते.

त्याचे बोबडे बोल ऐकून हसू फुटते आणि कौतुक वाटत राहते. बाळाशी जितक्या गप्पा माराव्या, नवीन नवीन गोष्टी सांगाव्यात, गाणी म्हणावीत तितकी त्याची भाषा उत्तम प्रकारे विकसित होते. पहिला शब्द साधारणतः ११ महिन्याचे झाले की बाळ उच्चारते आणि दीड वर्षापर्यंत वीस शब्द तरी बाळाला बोलता येतात. आपल्या बाहुलीशी, खेळण्यांशी निरर्थक पण भरपूर गप्पा मारणारे बाळ साधारण दीड वर्षांचे असते. दोन वर्षांपर्यंत मुलाला दोन शब्दांचे वाक्य तयार करता येते. आपल्या गरजा दोन शब्दांत व्यक्त करता येतात. स्वतःचे नाव उच्चारता येते आणि सर्वनामांशी ओळख होते.

बौद्धिक, भाषा यांच्या विकासाबरोबरच मुलाचा भावनिक विकासही होतो. पहिल्या दोन महिन्यातच सगळ्या भावनांची जाणीव बाळाला होते. झालेला आनंद बाळ हसून व्यक्त करते, तीन चार महिन्यांचे बाळ रागही व्यक्त करू लागते. हळूहळू आपल्या भावनांवर बाळाचे नियंत्रण निर्माण होते. मेंदूमध्ये देखील भावनांसंबंधी ‘मार्ग’ तयार होत राहतात. दोन वर्षाचे मूल मत्सर, लाज, शरम, अभिमान अशा अनेक भावना अनुभवू शकते. इतरांवर राग काढणेही त्याला जमते. ‘आई तू कित्ती छान आहेस!’ किंवा ‘सॉरी, चुकले माझे’ अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करतानाच इतरांच्या भावनांचीही कदर आपल्या मुलाला आहे असे आपल्या लक्षात येते.

हेही वाचा…व्यायामासाठी वेळ नाही? नो टेन्शन, ना घराबाहेर जायची गरज; फक्त फिटनेस स्नॅकिंगचा ट्रेंड करा फॉलो

बाळाचे हसणे, रडणे, रागावणे, घरातले त्याचे वागणे या सगळ्यांनी आपल्याला आनंद मिळतो. आपले बाळ मोठे होताना या सगळ्या टप्प्यांचा अनुभव आपण मनात साठवतो. आता तर काय प्रत्येक नव्या गोष्टीचा उदा. पहिला शब्द, पहिले पाऊल, कागदावर मारलेली पहिली रेघोटी व्हिडीओ केला जातो आणि केवळ आठवणीत नाही तर कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक क्षण टिपला जातो!

Story img Loader