डॉ. जाह्नवी केदारे

‘जाणता राजा’ पाहून आम्ही सगळे घरी चाललो होतो. गप्पा रंगल्या होत्या. माझे मन मात्र शाळेतल्या बाकावर इतिहासाच्या तासाला बसले होते आणि आमच्या बाई करत असलेले रसभरीत वर्णन ऐकण्यात मग्न झाले होते. बाहू फुरफुरताहेत असेच वाटू लागले. वर्तमानाचे भान येताना वाटले, कुठे जाणता राजा आणि कुठे शाळा! केवढा हा प्रवास माझे मन करून आले गेल्या काही मिनिटांमध्ये! वाटले कसे घडते हे सगळे? कुठे घडते हे सगळे? आपले मन काम तरी कसे करते? म्हणजे मेंदूत की हृदयात? नक्की कुठे? हृदयातली धडधड, भीतीने भरणारे कापरे, दुःखाने घळघळा वाहणारे अश्रू, डोक्यातला विचारांचा भुंगा, हे सगळे स्पष्ट करून सांगता येईल का?

Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक

प्राचीन काळापासून पडलेले हे प्रश्न आहेत. भारतामध्ये पतंजली मुनींनी पहिल्यांदा ‘भारतीय मानस शास्त्राची’ काल्पना मांडली ती आपल्या ‘योगदर्शन’ या ग्रंथातून. संपूर्ण जगालाच जगण्याचे एक तत्त्वज्ञान त्यातून मिळाले. यात अंतःकरणाची संकल्पना मांडलेली आहे, ज्याचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार भाग आहेत. मनामध्ये अनेक संकल्प- विकल्प असतात, निश्चय, अर्थ जिथे साठवला जातो ती बुद्धी, दैनंदिन व्यवहारात अशा अनेक निश्चित अर्थांपैकी योग्य अशी वृत्ती बाळगणे म्हणजे चित्त. सुश्रुताच्या चरक संहितेमध्ये जगात पहिल्यांदा मानसिक विकारांचे वर्णन आले आहे. त्या काळात मनोरुग्णासाठी रुग्णालये सुद्धा भारतात होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.

हेही वाचा >>> मध आणि खजूर करू शकतात का रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित? कृत्रिम साखरेसाठी पर्याय ठरू शकतात का?

ग्रीकांमध्ये हिपोक्रेटीस (Hippocrates), गेलन (Galen) यांनी मनोविकारांचा तपशील मांडायला सुरुवात केली. मध्ययुगीन काळात आणि नंतर वैज्ञानिक प्रगतीबरोबरच मानस शास्त्र आणि मनोविकार शास्त्र दोन्हीची प्रगती झाली.  Wilhelm Wundt, विलियम जेम्स (William James) अशांनी मनाची रचना कशी असेल, आजूबाजूच्या  परिस्थितीशी जुळवून घेताना मन कसे काम करते या विषयांवर निरीक्षणे नोंदवायला सुरुवात केली. जेस्टालट (Gestalt) मानस शास्त्र मांडणाऱ्या Wertheimer ने संवेदना, स्मरणशक्ती, विचारशक्ती या सगळ्याचा वापर करून माणूस तुकड्यांचा विचार न करता “पूर्ण आकृती’चा, पूर्ण परिस्थितीचा विचार करतो असे मांडले. या सगळ्या मानस शास्त्रज्ञांमध्ये सिग्मंड फ्रॉइडचे (Sigmund Freud) नाव ‘आधुनिक मागिनस शास्त्राचा जनक’ असे घेतले जाते. जाणीवेच्या पातळीवरील मनोव्यापार आणि नेणिवेच्या पातळीवरील मानसिक घडामोडी (Conscious and unconscious mind), विसरून गेलेली विस्मरणे आणि मानवाची मनोलैंगिक वाढ (Psychosexual development) या विषयी त्याने जोरकस मांडणी केली. मनोविश्लेषणात्मक मानसोपचार पद्धतीचा(Psychoanalytic psychotherapy‘)विकास घडवला.

मनोरुग्णांना समाजापासून दूर ठेवण्याऐवजी मानसिक आजारांचा उपचार करता येतो याचा प्रसार फ्रॉईड आणि त्याच्या शिष्यांमार्फत झाला. केवळ मानसिकच नाही तर जैविक  आणि सामाजिक परिस्थितीसुद्धा मनावर परिणाम करत असते आणि मानसिक विकाराला कारणीभूत होते असे सांगणारे अडोल्फ मेयेर (Adolf Meyer)

आणि मेनिन्गेर (Menninger) हे मानस शास्त्रज्ञ होऊन गेले. फ्रॉइडने अगदी बाल्यावस्थेत असताना लैंगिक भावना आणि गरजा यांच्यावर आपल्या मांडणीत भर दिला. मनोविश्लेषणात्मक मानसोपचाराचा यशस्वीपणे उपयोग केला. परंतु मनाची प्रत्येक क्रिया लैंगिकतेवर आधारित असू शकत नाही आणि अगदी बाल्यावाथेत लैंगिकतेला अवाजवी महत्त्वही देता यात नाही, अशी भूमिका मांडणारे अनेक आधुनिक मानस शास्त्रज्ञ होते ज्यांनी मनाचा शोध आपापल्या पद्धतीने सुरू ठेवला. मानसिक प्रक्रियांमध्ये विचार आणि भावना यांचे नाते आरन बेक (Aaron Beck) या मानस शास्त्रज्ञाने मांडले. एखादे चित्र पाहून आपल्या मनात आनंदाची भावना निर्माण होते. हा आनंद निर्माण होण्या आधी मनात विचार तयार होतो, ‘काय सुंदर आहे हे चित्र’! आणि मग आनंद झाला की चेहऱ्यावर हसू उमटते, आपण उत्स्फूर्तपणे म्हणतो, ‘व्वा’! ही विचार- भावना- वर्तणूक अशी साखळी हे आपल्या मानसिक प्रक्रियांचे मूळ आहे असे सांगणारा हा विचारनिष्ठ सिद्धांत.

हेही वाचा >>> Health special: तृणधान्ये का खावीत?

याची पुढची पायरी म्हणजे अल्बर्ट एलीस (Albert Ellis) ने मांडलेला विवेकनिष्ठ सिद्धांत. यामध्ये बरोबर की चूक, योग्य की अयोग्य, नैतिक की अनैतिक अशा वर्गीकरणात न पडता विचार तर्कशुद्ध (rational) आहेत की नाही हे महत्त्वाचे ठरते. वर्तणूकवाद (behaviourism) विचार, भावना या सगळ्यापेक्षा वर्तणुकीला आपल्या सिद्धांतात प्राधान्य देतो. मला कबुतराची भीती वाटते, कारण मी तसे शिकले आहे. प्रत्येकच गोष्ट माणूस शिकतो. (learnt behaviour) आपोआप काहीही घडत नाही असे मानणारा हा गट. अशा विविध पैलूंचा विचार मनाचा शोध घेताना मांडला गेला. संशोधनाच्या नवीन पद्धती, प्राण्यांवरील प्रयोग, उदयाला आलेले नवीन तंत्रज्ञान या सगळ्यामधून मेंदूची स्थूल आणि सूक्ष्म रचना, मेंदूतील विविध रसायनांची कार्ये समजू लागली. आपल्या भावना, संवेदना, विचार क्षमता आणि वागणूक या सगळ्यातील भूमिका, मेंदूच्या विविध भागांची कार्ये अशा अनेक गोष्टींचा विस्मयकारक उलगडा होत गेला. Netflix वर एखादी मालिका सुरू केली की रात्रभर जागून ती संपवावीशी वाटते कारण मेंदूतील डोपामिन हे रसायन आहे हे उमगले आणि कुठल्याही गोष्टीचे व्यसन कसे लागू शकते ते लक्षात आले.

अनुवांशिकतेचा अभ्यास ‘ही अगदी आईसारखी दिसते नाही! तिच्या सगळ्या लकबी आईसारख्या आहेत’ किंवा ‘यांच्या घराण्यातच हे व्यंग्य चालत आले आहे’ अशी विधाने स्पष्ट करू लागला. डाव्या बाजूच्या मेंदूला रक्त पुरवठा नाही झाला तर वाचेवर परिणाम होतो असे सी टी स्कॅन, एम आर आय स्कॅन करून शोधून काढता येऊ लागले. असे हे आपले मन! अजूनही अनेक गोष्टींचा थांगपत्ता न लागलेले!