पल्लवी सावंत पटवर्धन

रोगप्रतिकारशक्ती वाढवणं असं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काढे, मसाल्याचे पदार्थ याबाबत आपण वाचलेच आहे. खरं तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या पानांपासून किंवा वेगवेग​ळ्या मसाल्याच्या पदार्थांपासून किंवा तेलबियांपासून तयार केले जाणारे काढे किंवा त्यापासून तयार केले जाणारे अर्क यांचा प्रभावी परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
bank mitra warn of agitation over low remuneration lack of protection of service
‘बँक मित्रां’चा आंदोलनाचा इशारा; तुटपुंजे मानधन, सेवाशर्तींचे संरक्षण नसल्याने त्रस्त
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
patients of gastro Sangli, gastro, Drainage water ,
सांगलीत गॅस्ट्रो साथीचे ५० रुग्ण आढळले, पाणी पिण्याच्या जलवाहिनीत ड्रेनेजचे पाणी शिरले
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
hair loss reasons loksatta news
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात

आजच्या लेखात रोजच्या अन्न पदार्थांमध्ये आपण विविध अर्क विविध प्रकारे वापरू शकतो त्याबद्दल थोडेसे.

१. अडुळसा- अडुळसाच्या पानांचा काढा हा अत्यंत उपयुक्त असतो त्यात असणारी हरितके आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्धांश तुमच्या शरीराला उत्तम परिणाम येतात. कफ प्रकृती कमी कमी करणे, फुफ्फुसाचे आजार कमी करणे. रक्त शुद्धीकरण करणे यासाठी अडुळशाची पाने अत्यंत उपयुक्त आहेत.

२. दुसरा म्हणजे आल्याचा काढा. केवळ आल्याचा अर्क काढून त्यासोबत मध एकत्र केल्यास हा काढा लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

३. बदाम दूध- बदाम भिजवून सकाळी त्यातील पाणी काढून त्याचा अर्क काढणे आपल्याला माहिती असेलच. याच बदामाच्या दुधाचा वापर करून ज्यांना गायीच्या किंवा म्हशीच्या दुधाची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी चाटण तयार केले जाऊ शकते. किंबहुना १ कप बदाम दुधात ०.५ ग्राम हळद आणि ०.५ ग्राम सुंठ आणि ०.५ ग्राम वेलचीपूड असे मिश्रण रात्री झोपताना नियमितपणे प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. खोकला आणि पडसे सातत्याने बळावत असल्यास हे दूध अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः लहान मुलांसाठी हे प्रभावी औषध आहे .
( ज्यांना गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध सहन होत नाही किंवा ते दूध पचण्यासाठी अत्यंत जड होते त्यांच्यासाठी बदामाचे दूध पचायला हलके आणि गुणकारी आहे )

४. सातूचे सत्त्व
१०० ग्रॅम सेतूच्या पिठात १ चमचा मध आणि दुप्पट प्रमाणात पाणी असे एकत्र करून त्याची कांजी ताप, पडसे यावर प्रभावी परिणाम देते. ज्याला अशक्तपणा किंवा अंगदुखी यासारखे विकार आहे त्यांच्यासाठी सातूचे सत्त्व अत्यंत उपयुक्त आहे.

५. हरितकांचा अर्क
दुधी गाजर आणि हिरव्या भाज्या दुधी गाजर आलं आणि लिंबू यांचा रस एकत्र घेतल्याने देखील पोटाचे विकार दूर होण्यास मदत होऊ शकते. मात्र हा अर्क ताजाच पिणे योग्य आहे. समाजमाध्यमांवर हा अर्क ४ डिग्री आणि तत्सम तापमानात साठवून ठेवला जातो मात्र योग्य परिणाम मिळवत यासाठी कोणत्याही हरितकांचा अर्क ताजा पिणे आवश्यक आहे.

६. गव्हाच्या गवताचा अर्क
गव्हाच्या गवताची पावडर बाजारात मिळते. जर तुम्ही पाण्यामधूनही पावडर घेऊ शकला तरी देखील तुमच्या आतड्याचे आरोग्य उत्तम राहू शकते. रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. ज्यांना पालेभाज्या खाण्याचा कंटाळा आहे त्यांच्यासाठी उत्तम परिणाम मिळावेत म्हणून ही गवती पावडर औषधी आहे. ही पावडर मधासोबत चाटण म्हणून देखील खाता येऊ शकते.

७ फळांचे अर्क- रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाचे पोषणसत्व म्हणजे क जीवनसत्त्व. संत्रं आणि लिंबू यांचे मिश्रण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे. याबरोबरच डाळिंब एकत्र केल्यास कफ कमी होतो. शिवाय सर्दी पडसे देखील कमी होऊ शकते.

८. शेवगा
आपण सूप तयार करताना केवळ भाज्यांचाच विचार करतो मात्र सध्याच्या सध्याच्या वातावरणामध्ये बाजारात उपलब्ध असणारे शेवग्याच्या शेंगांचे सूप हे कॅल्शियम तसेच अनेक उपयुक्त पोषण घटकांमध्ये उत्तम असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे सूप लहान मुलांसाठी विशेषतः वरदान ठरू शकते.

अनेकदा आपण प्रोबायोटिक ड्रिंक्स पितो. रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आणि पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी नियमित आहारात खालील प्रोबायोटिक द्रव्ये आणि लोणची वापरली जाऊ शकतात.

९. काकडी कोबी मुळा आणि कांदा याचे मिश्रण मिठामध्ये चुरून थोडा वेळ बाजूला ठेवावे. त्यातील पाणी काढून टाकावे. आपल्याला उत्तम प्रकारचे सॅलड दररोज आहारात समाविष्ट करावे. ज्यांना थंड सॅलड खायला आवडते त्यासाठी हे प्रोबायोटिक सॅलड अत्यंत उपयुक्त आहे.

१०. हळदीचे लोणचे: ओली हळद आणि एप्पल सीडर विनेगर यांचे मिश्रण करून केलेले हे लोणचे अत्यंत आरोग्यदायी असते हळदीचे हळदीचे उभे तुकडे करावे त्यामध्ये ॲपल सीडसिडर विनेगर टाकून ते एकत्र करावेत बरणीचे झाकण घट्ट करून हे मिश्रण उन्हात ठेवावे आणि त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून द्यावे हे लोणचे अत्यंत आरोग्यदायी असे आहे त्यांना सर्दी सारखे विकार आहेत त्यांच्यासाठी हळदीचे लोणचे अत्यंत उपकारक आहे.

११ गाजराची कंजी: गाजर पाण्यामध्ये उकळून त्यानंतर त्याच्यामध्ये हलकी मिरची पूड आणि मिरपूड टाकावी याबरोबर दोन चमचे तिळाची पावडर टाकावी हे सगळे पदार्थ हे सगळे पदार्थ एका बरणीमध्ये घट्ट झाकणामध्ये थोडं किमान एक दिवस उन्हात ठेवावे. २४ तासानंतर पुन्हा हे मिश्रण एकत्र करावे . झाकण घट्ट करून पुन्हा उन्हात ठेवावे. जेव्हा या द्रव्याचा आंबटपणा वाढेल तेव्हा कांजी तयार आहे असे समजावे. ही गाजराची कंजी तुम्ही फ्रीजमध्ये देखील साठवून ठेवू शकता.

वरील नवीन अर्क तुमच्या स्वयंपाक घरात लवकरात लवकर दिसावेत आणि सगळ्यांचेच आरोग्य उत्तम राहावे ही सदिच्छा

Story img Loader