नूडल्सचा आपल्या आयुष्यातील प्रवास काही दशकांपूर्वी सुरू झालेला असला तरी नूडल्सना त्यांचा अनेक शतकांपूर्वी पासूनचा इतिहास आहे. नूडल्स म्हटलं की आपल्यासमोर इटालियन पाक संस्कृतीचा खजिना दिसू लागतो. आणि मिलेनिअल पिढीसाठी “टू मिनिट नूडल्स” हा जीवनाचा अविभाज्य भागच आहे. खर तर नूडल्स पहिल्यांदा जपानला पोहोचल्या आणि हे साधारण आठव्या शतकात घडलं आणि १८०० सालापर्यंत त्या आहाराचा विशेष भाग नव्हत्या. मात्र १९१० च्या सुमारास चीनमध्ये नूडल्स घराघरात पोहोचल्या आणि त्याची विविध रूपं कधी सूप, भाज्यांच्या सोबत असं करत थेट टोक्योपर्यंत जाऊन पोहोचल्या. शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारच्या आहार पद्धतीमध्ये सामावणारा नेहमीच्या धान्यांहून वेगळा असा हा पदार्थ जगाने उचलून धरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Health Special: डाएट कसं सुरू करायचं?

थाई, जपान, मेक्सिकन, आशियाई सगळ्या पाककृतींमध्ये नूडल्स एकजीव होऊन गेल्या. आहारतज्ज्ञ मात्र नूडल्सच्या घटकपदार्थांमध्ये असणारा मैदा, त्यामुळे होणारे पोषण -कुपोषण याबद्दल सजगता बाळगून असतात.

पोषणमूल्यांचा तक्ता :

नूडल्स खाताना सोबत सोया सॉस, दाण्याचं कूट, वेगेवेगळ्या फळभाज्यांचा अर्क अशा प्रकारचे अन्नघटक वापरले जातात. व्हिएतनाम सारख्या देशात भाज्यांचे अर्क, चिकन आणि मासे यांच्या हाडांच्या अर्कासोबत नूडल्स नेहमीच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत. नूडल्सचे विविध प्रकार जाणून घेताना विविध द्रव्यांचा अर्क असलेल्या विविध नूडल्स चीन आणि व्हिएतनाम मध्ये सापडतात. ज्यात द्राक्षांचा अर्क असणारे नूडल्स, मदिरेच्चा अर्क असणारे नूडल्स, मिरचीचा अर्क असणारे नूडल्स तसेच तेलबियांच्या स्निग्धांशाचे अर्क असणारे नूडल्स बाजारात आहेत.

भारतीय आहारात भात, तृणधान्ये याला पर्याय म्हणून नूडल्स समाविष्ट केले जातात, त्यासोबत वर लिहिलेल्या पोषणतत्वांचा विचार होणे अत्यावश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special diet noodles nutritious meal vp
Show comments