वैभवी वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंबरेतल्या डिस्कचं आरोग्य बिघडतं म्हणजे नक्की काय होतं? या प्रश्नाचं उत्तर ही एक अतिशय अर्थपूर्ण आणि महत्वाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया रुग्णाला समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे. (किंबहुना तो रुग्णाचा अधिकार आहे). आजही ‘डिस्कोजेनीक पेन’ च्या रुग्णाशी बोलताना ही प्रक्रिया फक्त ‘स्लिप डिस्क’ या एकाच घाबरवून टाकणाऱ्या शब्दात बसवली जाते आणि त्यामुळे रुग्णाच्या मनात कंबरेच्या हालचाली आणि डिस्क याबद्दल अवास्तव भीती निर्माण होते. शिवाय या परिस्थित औषधी घेणं आणि कंबरेच्या हालचाली बंद करण एवढाच उपाय आहे अशी चुकीची धारणा होऊ शकते.

याआधी आपण इंटेरवेरटेबरल डिस्क (Intervertebral Disc) म्हणजेच दोन मणक्यांमधील गादी काय काम करते, तिची रचना कशी आहे? याबद्दल जाणून घेतलं. आजच्या लेखात आपण या डिस्कचं कार्य का बिघडतं, त्यामुळे काय होतं आणि यावरचे फिजिओथेरपी उपचार बघणार आहोत.

‘डिस्क’चं आरोग्य बिघडतं म्हणजे काय?

अगदी सुरुवातीच्या टप्प्यात, वय, अनुवांशिकता, कामाचं स्वरूप, जीवनशैली, वजन, आहार, झोप, मानसिक स्थिती, इतर आजार यापैकी एक किंवा अनेक गोष्टींमुळे डिस्कमधील पाणी, प्रोटीओग्लायकेनस आणि कोलॅजन यांचं प्रमाण बिघडतं. डिस्कमध्ये असलेला नैसर्गिक ओलावा कमी होतो. हा ओलावा डिस्कला वेगवेगळा भार पेलण्यासाठी आणि शॉक अबसओरपशन साठी मदत करत असतो. तो ओलावा कमी झाल्यामुळे, डिस्कचा केंद्रबिंदू असलेला न्यूक्लियस पलपोसस हा भाग कोरडा होऊ लागतो (अशा व्यक्तीचा MRI केला तर त्यामध्ये desiccated disc असा शब्द दिसण्याची शक्यता असते).

आणखी वाचा-Health Special: केस चांगले राहण्यासाठी काय खावं?

या टप्प्यात खोकताना, शिंकताना, खोल श्वास घेताना कंबरेत वेदना होते, ही कळ उठण्यासारखी वेदना असते आणि तेवढ्यापुरती राहते. डेससीकेटेड डिस्क असणाऱ्या प्रत्येकालाच लक्षण असतीलच असंही नाही. यानंतरच्या टप्प्यांमध्ये न्यूक्लियस पलपोसस अधिक अधिक कोरडा होत जातो, मात्र दैनंदिन आयुष्यातील क्रियांमध्ये डिस्क वर ताण येतच जातो. यामुळे कोरडा झालेला न्यूक्लियस पलपोससचा काही भाग त्याच्या बाहेरच्या आवरणात म्हणजेच अॅनयूलुस फायब्रोसिस मध्ये शिरकाव करतो, त्यामुळे अॅनयूलुस फायब्रोसिसचा काही भाग दुभंगतो असं अनेकवेळा झालं की अॅनयूलुस फायब्रोसिसची दुभंगलेला भाग भरून काढण्याची क्षमता संपते. मग डिस्कचा केंद्रबिंदू अॅनयूलुस फायब्रोसिसमध्ये शिरकाव करत जातो आणि काही वेळा त्याच्या कडा ओलांडून बाहेरही येतो. ही प्रक्रिया होत असताना कंबरदुखीची तीव्रता वाढत जाते. याला सर्वसामान्यपणे ‘स्लिप डिस्क’ असं म्हटलं जातं. पण शब्दश: डिस्क कधीही ‘स्लिप’ होत नाही.

सर्वसामान्यपणे ही प्रक्रिया काही वर्षांमध्ये होते, काही अपवादात्मक परिस्थित जस की अपघात, इजा किंवा अतिशय जड वजन एक झटक्यात उचलणं यामुळे डिस्कवर अचानक खूप प्रमाणात भार आल्यामुळे वर सांगितलेली प्रक्रिया काही मिनिटातही होऊ शकते. अॅनयूलुस फायब्रोसिसच्या कडा ओलांडून बाहेर आलेला न्यूक्लियस पुलपोसूस चा भाग काहीवेळा तिथून पायाकडे जाणाऱ्या नसांवर दबाव टाकतो त्यामुळे व्यक्तीला कंबरदुखी सोबतच एका किंवा दोन्ही पायाला मुंग्या येणे, पाय जड पडणे अशी लक्षण जाणवू शकतात. यासोबतीने रजोनिवृत्ती, कॅल्शियम -vit डी कमतरता, बी -12 कमतरता, गरोदर पण, अतीव मानसिक दुःख, नैराश्य अशा काही गोष्टी ‘डिस्कोजेनीक’ वेदनेची तीव्रता अधिक उग्र करतात.

आणखी वाचा-Health Special : खारट रस अनुलोमक असण्याचा काय फायदा?

फिजिओथेरपी उपचार

पेशंट एड्युकेशन : रुग्णाला डिस्कची कार्ये आणि एकंदरीत आजाराची प्रक्रिया समजावून सांगणं. कोणत्या हालचाली केल्या जाऊ शकतात, कोणत्या हालचाली सुधारित पद्धतीने केल्या जाऊ शकतात आणि कोणत्या हालचाली पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे हे स्पष्टपणे रुग्णाच्या भाषेत समजावून सांगितल्या जातात.

एक्झरसाइज थेरपी : प्रत्येक रुग्णाला अनुसरून पाठीच्या, पोटाच्या आणि पायांच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम, चपळता वाढवणारे व्यायाम, तोल आणि सुसूत्रता वाढवणारे व्यायाम. पोटाचे स्नायू जास्तीत जास्त कार्यान्वित होतील असे ‘फनकशनल कोर’ (functional core) व्यायाम. ही व्यायाम किती तीव्रतेने, कितीदा आणि कसे करावे हे रुग्णाला शिकवलं जातं.

लाइफस्टाईल मोडीफिकेशन: दैनंदिन आयुष्यात करावयाचे बदल, झोप, आहार, मानसिक ताण, स्थूलता यांचं व्यवस्थापन.

एरगोनॉमिक मोडीफिकेशन: कामाच्या ठिकाणी करायचे बदल, किती वेळाने ब्रेक्स घ्यायला हवे, त्याठिकाणी करता येतील असे सोपे व्यायाम, स्ट्रेचेस, याबद्दलचं प्रशिक्षण

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special do waist discs really slip hldc mrj
Show comments