– पल्लवी सावंत पटवर्धन

तुम्ही डिंक नावाचा पदार्थ ऐकलाय ना? पण तो हिवाळ्यात खायचा पदार्थ आहे. शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाटी बदाम डिंक वापरतात. हा डिंक पाण्यात विरघळून किंवा गरम करून नव्हे तर पाण्यात भिजवून खाल्ला जातो. उन्हाळ्यात शीतपेये पिण्याकडे अनेकांचा कला असतो मध्य पूर्व भागात गोंड कतिरा म्हणून ओळखला जाणारा स्फटिकमय पदार्थ उन्हाळ्यात अत्यंत गुणकारी मानला जातो. त्रागासांथ गम म्हणून ओळखला जाणारा हा औषधी डिंक गोड बदामाच्या सालापासून मिळवला जातो.

Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

तुर्कस्तान, इराण या भागात प्रामुख्याने बदाम डिंक सापडतो. प्रकृतीने थंड असणारा हा पदार्थ पाण्याला उत्तम पोत देऊ शकतो त्यामुळे विविध पेयांमध्ये याचा वापर केला जातो.

हेही वाचा – झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…

बदाम डिंकाचे औषधी उपयोग खालीलप्रमाणे आहेत

– पाण्याची घनता वाढवणे

– पदार्थाची घनता वाढवणे

– पदार्थाचा पोत सुधारणे

– पदार्थाचे स्थैर्य वाढवणे

आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तंतुमय पदार्थानी भरपूर तसेच विविध खनिजांनी युक्त असा बदाम डिंक पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम यांनी भरपूर आहे. त्यामुळे विविध आजारांवर उपायकारक आहे.

– उष्माघाताचा प्रभाव कमी करणे

– मलावरोध दूर करणे

– आतड्याचे आरोग्य सुधारणे

– चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रमाण कमी करणे

– दुग्धजन्य पदार्थांची घनता वाढविणे

– शरीरातील उष्णता कमी करणे

– दमा, अस्थमामुळे होणारे श्वसनाचे त्रास कमी करणे

– ट्रायग्लिसेराईड्सचे वाढीव प्रमाण कमी करणे

– कर्बोदकांचे भरपूर प्रमाण असणारा हा पदार्थ अगदी २-३ ग्राम इतका जरी दिवसभरात वापरला तरी

– शरीरातील उष्णता कमी करणे

– शरीराचे तापमान कमी करणे

– वजन नियंत्रणात ठेवणे

– शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करणे

काही संशोधनानुसार बदाम डिंकामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि फिनॉलिक द्रव्यांमुळे चयापचय क्रिया पूर्ववत होण्यास मदत होते.

हेही वाचा – Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….

बदाम डिंकाचे सेवन कसे करावे?

– २ -३ ग्राम डिंक २००-३०० मिली पाण्यात भिजवून ठेवावा. त्या पाण्याचा वापर दुधासोबत किंवा इतर द्रव पदार्थासोबत करावा.

– उन्हाळ्यात सरबताबरोबर देखील बदाम डिंक प्यायला जाऊ शकतो.

– फळांच्या रसापासून घरगुती आईस्क्रीम तयार करण्यासाठी बदाम डिंक उपयुक्त आहे.

– जेवणानंतर ताक किंवा जिरेपाणी पिताना त्यातदेखील बदाम डिंक टाकून हे द्रव पदार्थ प्यायले जाऊ शकतात .

– व्यायाम करणाऱ्यांमध्ये व्यायामाआधी २ तास बदाम डिंकाचे पाणी प्यायले जाऊ शकते.

– भाज्यांच्या रसांना जेलीसदृश घनता यावी म्हणून बदाम डिंक वापरला जाऊ शकतो. या उन्हाळ्यात थंडगार बदाम डिंक नक्की प्या आणि स्वास्थ्य सांभाळा.