Health Special: मोबाईलवर येणारे फॉरवर्डस् जीवावर किती बेतू शकतात याचा तरुण पिढीला बिलकूल अंदाज नसतो. ते फक्त ट्रेण्ड्स फॉलो करायला जातात आणि आरोग्याची अडचण करून ठेवतात, त्याविषयी…

“ ममा, आमच्या ग्रुप मध्ये मिरची खाण्याची स्पर्धा लागली होती . अमिषा रॉक्ड इट!” श्रियाने आनंदाने सांगितलं.
“ मिरची खाण्याची स्पर्धा म्हणजे ?” शलाका ओरडलीच. त्यावर अमिषा म्हणाली “स्पायसियर द बेटर! म्हणजे आपली हिरवी मिरची खायची . जी मुलगी जास्त मिरच्या खाऊ शकते तिला सगळे आठवडाभर ट्रीट देणार. मी आज ११ खाल्ल्यात, रेकॉर्ड !” आमिषाने हातातलं कोक पीत पीत उत्तर दिलं!

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?

तिचे गाल आणि कान लाल झाले होते आणि बाकी सगळ्या मुली तिच्याकडे साधारण भक्तिभावाने पाहत होत्या. “आणि का खाल्ल्यास तू मिरच्या?”, शलाका अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. ती तशीच किचन मध्ये गेली.

हेही वाचा…Health Special: प्रदूषणामुळे होणारे पोटाचे विकार कोणते?

“ट्रेंडिंग आहे ते काकू ,म्हणून” श्रियाची मैत्रीण उत्तरली. सगळ्यांनी मोर्चा आम्हा मैत्रिणींकडे वळवला आणि त्या सांगू लागल्या , “लास्ट मंथ आम्ही मॅक्सिमम तिखट पाणीपुरी केलं होतं. रिचा जिंकली होती. तिने ४० खाल्या माहितेय. आणि मग दुसऱ्या दिवशी झोपून .” यावर एकाच हशा पिकला.

“नेक्स्ट मंथ आपण कॅण्डी ठेवूयात” कोणीतरी म्हणालं, यावर सगळ्या मुलींमध्ये पुन्हा उत्साहाने हशा पिकला.
“एक मिनिट” शलाकाने शक्य तितक्या शांत आणि खंबीर आवाजात सगळ्यांना थांबवलं. “तू अमिषा, तू ते कोक बाजूला ठेव आणि हे सरबत पी. आणि पुन्हा असले जीवघेणे खेळ खेळायचे नाहीत.” यावर मात्र घरात एकच शांतता पसरली.

“पल्लवी मावशी – डू यू थिंक इट्स बॅड? एवढं काही नाही ना होत एखादा दिवस खाऊन ?”

शलाकाकडून या सगळ्या गर्ल गँग चा मोर्चा माझ्याकडे वळला. वय वर्ष १० ते १२ असणाऱ्या त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक बेफिकिरी , सावधपणा आणि किशोरवयीन कुतूहल दाटलं होतं. मला दूध खरंच फुटतं का म्हणून कुतूहलाने दुधात गूळ एकत्र करून पिऊ पाहणारी शाळकरी मीच दिसले.

हेही वाचा…Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?

“खरं तर एखाद दिवशी असं म्हणण्यापेक्षा एखादी मिरची चुकून खाणं वेगळं आणि इतक्या मिरच्या खाणं वेगळं इनफॅक्ट खूप वाईट” यावर त्यातल्या काहींनी माझ्याकडे अत्यंत त्रासिक नजरेने पाहिलं.
“ पण मिरची खाल्ल्याने वेस्ट वाढत नाही, मुली बारीक राहू शकतात. आम्ही तर प्रॅक्टिस करतो रोज किमान पाच मिरच्या खाण्याची” रिचा म्हणाली.
“काय? हे पूर्णपणे चुकीचं आहे. उलट जर सतत इतकं तिखट खाल्लं तर तुमच्या गर्भाशयावर आणि आतड्याच्या भिंतींवर जे आवरण असत ते निघून जातं. आणि भविष्यातसुद्धा त्रास होतात.”
“नाही अगं पल्लवी मावशी, रिसर्च आहे असा. रोज मिरची खाल्ल्याने वेट वाढत नाही.”- सगळ्या आपापसात बोलत माझ्याकडे पाहू लागल्या. यावर मात्र मला गर्लगॅन्ग सोबत संवाद साधावासा वाटला.

“मला सांगा तुम्ही का वजनावर काम करताय ? तुम्ही आधी वाढीवर काम केलं पाहिजे.”- मी
“पण पीरिअड्स सुरु झाले म्हणजे वाढ झाली ना ?” -त्या
“असं नसतं. या दरम्यान तुमची छाती,नितम्ब ,हात ,पाय, हाडे, स्नायू , चरबी यांचप्रमाण देखील वाढत असतं. त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित खाणं खाऊन बॅलन्स साधलात तर आपोआप वजन नियंत्रणात राहील.”- मी

“ बरोबर.” रिचा आणि शरयूने होकार भरला .

हेही वाचा…Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

“मला सांगा, तुमच्यापैकी काहींचे पीरिअड्स सुरु झाले असतील ना?”
“आमचा ग्रुपच नेक्स्ट जेन आहे. आमचे पीरिअड्स झालेत सुरु .” श्रिया म्हणाली
“ वा, तुमच्यात हा कॉन्फिडन्स उत्तम आहे . पण हे जे ट्रेंडिंग चॅलेंजेस तुम्ही करताय ना- तिखट खाणे , अतिगोड खाणे त्यात मात्र गडबड आहे. त्याने आता नव्याने आयुष्यात आलेले पीरिअड्स तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात.”
“ पिरियड्स त्रासदायकच असतात.” अमिषा सरबत पिता पिता म्हणाली.
“ तुमच्यापैकी कितीजणींनीचे पीरिअड्स पेनफुल आहेत ? म्हणजे खुप पोटात दुखणं वगैरे.?” मी कुतूहलाने विचारलं
यावर श्रियाच्या सगळ्याच मैत्रिणींनी होकारात्मक मान हलवली.”

याचा अर्थ असा की तुम्ही आवश्यकतेपेक्षा कमी कॅलरीज खाताय आणि तुमच्या आहारात प्रथिने म्हणजेच प्रोटिन्स पण कमी आहेत, मी सांगितलं.
“पण एक्स्ट्रा कॅलरीज विल इन्क्रिज वेट” शरयू म्हणाली
“ एक्स्ट्रा – मी आवश्यक म्हटलं -रिक्वायर्ड कॅलरीज. तुमच्या वयातील मुलींना आहारातून जास्तीच्या कॅलरीज खाणं आवश्यक असत. या कॅलरीज कडध्यान्य, फळे यातून यायला हव्यात.”
“म्हणजे रोज फ्रुटस खायचे ? आठवड्यातून तीनदा खाल्ले तर नाही पुरत ?” रिचाने आश्चर्याने विचारलं.
“ अर्थात रोज खायचे. जर नाही खाल्ले तर तुम्ही बर्गर खायला जाणार” मी म्हटलं यावर मात्र सगळ्यांनी हो भरला

हेही वाचा…Health Special : मुलांचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी आईवडिलांनी काय करावं?

आणि कमिंग बॅक टू मिरची – एवढ्या प्रमाणात मिरची खाल्ली तर पचनसंस्था बिघडते. म्हणजे काहीच पचणार नाही हळूहळू.”
“ पण मिरचीत व्हिटॅमिन सी असत ना?” शरयू म्हणाली
“ हो पण मिरची मसाले म्हणून वापरतो ना आपण – त्यात असणारे एन्झाइम्स जेवणाची टेस्ट वाढवतात . ते असेच खाऊन उपयोग नाही. १० ग्रॅम पेक्षा जास्त मिरची शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. तुमच्या वयात तर जास्तीत जास्त पाच ग्रॅम इतकंच प्रमाण असायला हवं तेही दिवसभरात; तेही बाकीच्या जेवणासोबत.”
एव्हाना अमिषासह सगळेच चिंतातूर झाले होते. “पण मग मी आता काय करू ?” रडवेल्या आवाजात आमिषाने विचारलं.
“आता तरी गुलकंद दूध पी आणि पुढचे २-३ दिवस मिरची किंवा काहीच तिखट खाऊ नको.भरपूर पाणी पीत रहा.”

आणि वेस्ट कमी करायचीच असेल तर खेळायला आणि व्यायामाला सुरुवात करा आणि नीट वेळेवर जेवा.”
“पण आठवड्यातून एकदा पिझ्झा , डोनट ,केक्स खाल्ले तर चालेल ना ?” सायली ने विचारलं
“खरं सांगायचं तर तुम्हाला या वयात सगळं पचू शकत पण त्यासाठी इतर दिवस वेळेवर उठणं, व्यायाम करणं, वेळेत जेवण ही शिस्त पाळायला हवीत. आहारात कडधान्ये, अंडी, पालेभाज्या असायलाच हव्यात.”

हेही वाचा…Health Special: उन्हाळ्याची झळ – काय काळजी घ्याल ?

“मला कळतंय माझ्या आईला तू का आवडतेस पल्लवी मावशी – तुझ्याइतकी पालेभाज्यांबद्दल प्रेमाने सांगणारी तूच”
त्यावर सगळ्यांनाच हसू आलं.
“आणि सोबत तुमच्या आहारातून व्हिटॅमिन सी, लोह म्हणजे आयर्न , कॅल्शिअम पोटात जायला हवं म्हणजे पीरिअड्स त्रासदायक होणार नाहीत. वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे, सांबर, आमटी यांचं प्रमाण उत्तम असायला हवं.”
“मग आम्ही नेक्स्ट चॅलेंज मॅक्सिमम पालेभाज्या खाणं असं ठेवतो. म्हणजे या मन्थमध्ये सगळ्या दिवशी पालेभाज्या खाणार त्याला फळांची ट्रीट” शरयू म्हणाली, त्यावर सगळ्यांनी एकच कल्ला केला.
“साउंड्स लाईक प्लॅन – शलाका म्हणाली आणि आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून समाधानाने हसलो.

हेही वाचा…हृदयविकाराच्या झटक्याचा धोका ऍस्पिरिनची गोळी कमी करते का? तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर, “उच्च रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल..”

किशोरवयातून तारुण्यात पदार्पण करताना समाजात आहारविषयक असणारी माहिती, तरुणींना स्वतःच्या आरोग्याबद्दल असणारं भान यांची योग्य घडी बसणं आवश्यक असतं . सकस आहाराचं भान राखताना येत्या पिढीला गैरसमजातून बाहेर काढून योग्य दिशा दाखवण्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी!

Story img Loader