वैभवी वाळिंबे

मागच्या दोन लेखांमध्ये आपण मणक्यंमधील गादीची रचना, तिची कार्ये आणि तिच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यावर काय होतं हे सविस्तरपणे पहिलं आहे. पाठीच्या कण्याचं आरोग्य हे जसं मणके आणि दोन मणक्यंमधील गादी यावर अवलंबून आहे तसंच किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने ते आजूबाजूंच्या स्नायूंवर अवलंबून आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे मणका आणि त्यातील गादी यात होणारे बदल हे बर्‍याच प्रमाणात अपरिवर्तनीय म्हणजेच इरिवरसीबल असतात, त्याउलट स्नायूमध्ये होणारे बहुतेक बदल हे परिवर्तनीय म्हणजेच रिवरसीबल असतात. याचाच अर्थ योग्य प्रकारे व्यायाम आणि जीवनशैलीत बदल केले तर कुठल्याही वयात स्नायूंचं आरोग्य परत मिळवता येतं. ते कसं करायचं हे बघण्याआधी आपण पाठीचे स्नायू काय आणि कसं काम करतात हे बघूया.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
Yes Madam Fires Over 100 Employees for Feeling Stressed at Work Viral Email Claims
“ही तर चिटींग आहे!” आधी ऑफिसमध्ये कामाचा ताण येतो का विचारले अन् ज्यांनी होकार दिला त्यांनाच कामावरून काढून टाकले

पाठीच्या स्नायूंची कार्ये

पाठीचे स्नायू आपल्या कवटीच्या खालपासून सुरू होतात, ते खांद्यापासून खाली कंबरेपर्यंत पार आपल्या खुब्याच्या सांध्यापर्यंत पसरलेले असतात. हे स्नायू आपल्या फासळ्या, मणके, स्कपुला नावाची दोन हाडं इतक्या हाडांना जोडलेले असतात. साहजिकच इतक्या हाडांना जोडलेले असल्याने तिथे होणार्‍या हालचाली निर्माण करण्याचं आणि सुसूत्रीत करण्याचं काम करतात. पाठीतले स्नायू हे साधारणपणे तीन वर्गात विभागलेले असतात.

हेही वाचा… Health Special : हिवाळ्यातली दोष स्थिती

वरचा थर (सुपरफीशिएल) स्नायू: हे स्नायू प्रामुख्याने कणा ताठ ठेवण्याचं काम करतात, दोन्ही खांद्यांना मागच्या बाजूला धरून ठेवण्याचं आणि त्यामुळे मणका ताठ ठेवण्याचं काम हे करतात. यापैकी काही स्नायू हे स्कपुला नावाचं हाड आणि मणक्याचा कंबरेकडचा भाग असे जोडलेले असतात, दोन्ही बाजूने असे जोडलेले असल्याने इंग्रजी ‘V’ अक्षरासारखे दिसतात.

मधला थर (इंटरमीजीएट) थर: हे स्नायू फासळ्यांना जोडलेले असतात आणि त्यामुळे श्वासोछस्वासला मदत करतात, फासळ्यांचं आकुंचन आणि प्रसारण हे घडवून आणतात.

हेही वाचा… Health Special: नागीण हा संसर्गजन्य आजार आहे का?

इनट्रनसिक स्नायू: हे सगळ्यात खोलवरचे आणि महत्वाचे स्नायू असतात. यापैकी मलटीफिडस नावाचा स्नायू हा संपूर्ण पाठीचा कणा व्यापून असतो, दोन मणक्यांमधील स्थिरता वाढवणे, एका मणक्याची दुसर्‍या मणक्यावर होणारी हालचाल नियंत्रित करणे, ही अत्यंत महत्वाची आणि क्लिष्ट कामं हा स्नायू करत असतो. या वर्गातील बाकीचे स्नायू कंबरेतून खाली वाकणे, मागे वाकणे, वळणे, वजन उचलताना, चालताना, धावताना कंबरेच्या मणक्यांना स्थिर ठेवणं आणि त्यांच्यावरचा भर कमी करण ही अत्यंत महत्वाची कामं अव्याहतपणे करतात.

पाठीचे स्नायू इतकी महत्वाची आणि क्लिष्ट काम आयुष्यभर करतात, तरी देखील बहुतांश वेळा व्यायामाच्या रुटीन मध्ये यांच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं, किंवा हे व्यायाम फक्त मुलं आणि माणसांनी करण्याचे व्यायाम आहेत (जे पुन्हा ही अशास्त्रीय पद्धतीने फक्त पाठ ‘आकर्षक दिसावी’ या उद्देशाने केले जातात). या स्नायूंचे योग्य व्यायाम, योग्य पद्धतीने कसे करायचे, कुणी करायचे, कुणी नाही करायचे, कुणी कमी प्रमाणात करायचे हे सविस्तरपणे पुढच्या लेखात पाहूया.

Story img Loader