Health Special: ‘गेली तीन वर्षे मी दारूला स्पर्श केलेला नाही….’ २६ जूनच्या जागतिक व्यसनमुक्ती दिवसाच्या कार्यक्रमांत अरविंद बोलत होता. आपल्या व्यसनाधीनतेची आणि व्यसनमुक्तीची कहाणी सांगत होता. आज अरविंदचे वय ३५ वर्षे. वयाच्या १६व्या वर्षी मित्रांनी न्यू इयरच्या पार्टीत आग्रह केला म्हणून त्याने पहिल्यांदा दारूचा घोट घेतला. हळुहळू मित्र, पार्टी, बीअर कधी कधी व्हिस्की असे सगळेच त्याला आवडू लागले. वडीलही रोज दारू पिऊन घरी यायचे. आई रोज त्यांच्याशी भांडायची. तीच नोकरी करायची, घर चालवायची. मग अरविंदला कोण विचारणार?

दारुड्या ते अरविंद… एक प्रवास

तो कॉलेजमध्ये परीक्षेत नापास झाला तेव्हा आईला समजले. पण तोपर्यंत तो रोज प्यायला लागला होता. धड शिक्षण झाले नाही, त्यामुळे धड नोकरी नाही, त्यामुळे मनात निराशा आणि चिडचिड. दारूचे प्रमाण वाढतच होते. तो सुधारावा म्हणून लग्न करून दिले. पितो म्हणून भांडणे आणि भांडणे म्हणून पुन्हा पिणे अशा दुष्टचक्रात तो अडकला. जवळपास १५ वर्षे पीत राहिल्यावर बायकोने प्रयत्न करून इलाज करण्यासाठी आणले. ‘दारुड्या अरविंद’पासून ‘अरविंद’पर्यंतचा प्रवास त्याने सांगितला.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
cocaine smuggling in india
कोकेनसह अवैध वस्तूंच्या तस्करीसाठी केसांचे विग अन् पुस्तकांचा वापर; भारतात तस्करीत वाढ होण्यामागील कारणे काय?
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

व्यसन का लागते?

एखाद्याला दारुड्या, गर्दुल्ला, व्यसनी अशी लेबले सहज चिकटवली जातात. प्रसंगांना दारू पिणारे कित्येक असतात, पण सगळेच व्यसनी होत नाहीत. असे का? व्यसन असणे हा एक मानसिक, शारीरिक आजार आहे, हे त्यासाठी जाणून घेतले पाहिजे. मादक पदार्थाची नशा चढते. मेंदूत घडणाऱ्या रासायनिक बदलांमुळे आणि आपल्या मेंदूतील आनंद (reward centre) देणाऱ्या केंद्रामुळे ती नशा पुन्हा करून बघावी असे वाटते आणि हळुहळू मादक पदार्थ घेण्याची सवय लागते. पुरेशी नशा मिळवण्यासाठी आता पूर्वीचे प्रमाण पुरत नाही. मादक पदार्थाचे प्रमाण यातून वाढत जाते.

व्यसनाचे दुष्परिणाम

आता अशी स्थिती निर्माण होते की, मादक पदार्थ घेतला नाही, तर अनेक शारीरिक आणि मानसिक लक्षणे (withdrawal symptoms) निर्माण होतात. ही लक्षणे टाळण्यासाठी पुन्हा नशेकडे पाय वळतात. दिवसभर मनात नशेसाठी पैसे मिळवणे, नशिला पदार्थ काहीही करून मिळवणे हाच ध्यास राहतो. अशी स्थिती आली की समजावे ‘व्यसन’ जडले. आपल्याला व्यसनाचे दुष्परिणाम केवळ शरीरावर नाहीत तर संपूर्ण आयुष्यावर होताहेत हे समजूनही नशेपासून दूर राहण्याची इच्छा संपते. अशा अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.

नाविन्याचे आकर्षण आणि व्यसन

ज्याच्या घराण्यात व्यसनाधीनता आहे, अशी व्यक्ती अनुवांशिकतेमुळे सहजी व्यसनाला बळी पडते. त्याबरोबरच वातावरणातील अनेक घटक एखाद्या व्यक्तीला व्यसनाच्या अधीन जायला प्रवृत्त करतात. माणसाचा स्वभाव काही प्रमाणात त्याला व्यसनाकडे खेचून नेतो. नाविन्याचे आकर्षण असणारा, पटकन धोका पत्करणारा माणूस नवीन नवीन नशेचे पदार्थ चाखून पाहायला केव्हाही तयार असतो. लहानपणापासून नियमांचे उल्लंघन करणे, शाळा बुडवून इतरत्र भटकणे, प्राणीमात्रांना त्रास देणे अशा वर्तणुकीच्या समस्या असलेल्या मुलांना व्यसन पटकन लागते. घरात वातावरण चांगले नसले की, माणूस व्यसनाकडे वळतो. आज समाजात सिगरेट पिणे, दारू पिणे याला प्रतिष्ठा आहे, त्यामुळे तरुण मुले आणि मुलीसुद्धा सहजपणे दारूचा ग्लास हातात घेताना आणि सिगरेट ओढताना दिसतात. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमुळेही तरुणांना आपल्या समवयस्कांमध्ये सामावून जायचे, आपलेसे व्हायचे तर हे सगळे करणे गरजेचे आहे असे वाटते.

गंभीर मानसिक आजार आणि व्यसन

हाती खेळणारा पैसा, विशेष कौटुंबिक जबाबदाऱ्या नसणे आणि हाताशी रिकामा वेळ असणे यातून तरुण तरुणी व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. आयुष्यातल्या दैनंदिन संघर्षाला सामोरे जाताना, ताण तणावाचा सामना करण्याचा, मनातल्या निराशेचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे नशा अशी पळवाट शोधली जाते. परंतु कधीकधी उदासीनता (depression), अतिचिंता आणि स्किझोफ्रेनिआसारखा गंभीर मानसिक आजार असलेले रुग्ण आपल्या लक्षणांपासून सुटका म्हणून व्यसनांचा आधार घेतात.

१८ वर्षांचा मनोज समोर बसला होता. एक संपूर्ण दिवस ‘गर्द’ म्हणजे ब्राऊन शुगर म्हणजे ओपीऑइड न घेतल्यामुळे हैराण झाला होता. नाका- डोळ्यांतून पाणी वाहत होते, हातपाय प्रचंड दुखत होते, पोटात कळा येत होत्या, सकाळपासून जुलाब सुरू झाले होते. त्याला हुडहुडी भरली होती. Withdrawal ची सारी लक्षणे होती. मनोज १५ वर्षांचा असताना पहिल्यांदा सिगरेट प्यायला. मग होस्टेलवर दोस्तांच्या आग्रहाखातर चरस घेऊ लागला. हळू हळू त्यात मजा येईनाशी झाली आणि त्याची ओळख गर्दशी झाली. अनेक किशोरवयीन मुले असाच प्रवास करतात.

गेटवे ड्रग्ज

सिगरेट, हुंगून नशा करण्याचे व्हाईटनर, भांग, चरस, गांजा यांना गेटवे ड्रग्ज म्हणतात. हे मादक पदार्थ व्यसनाचे महाद्वारच उघडतात. ब्राऊन शुगर, श्रीमंतांचे समजले जाणारे कोकेनचे, LSD चे व्यसन इ. यातून सुरू होते. हल्ली मोठ्या प्रमाणात मेथ आणि मेफेड्रोन यांच्या वाढत्या व्यसनाची चर्चा सुरू आहे. हे पदार्थ सहजपणे उपलब्ध आहेत आणि १५-१६ वर्षांच्या मुलांपासून कुणीही याचे व्यसन सुरू करते. मनात आनंद आणि उत्साह निर्माण करणे, झोप न येणे, भूक न लागणे अशी लक्षणे यात दिसून येतात.

व्यसनांचा उपचार

व्यसनाचा उपचार करताना सर्वात प्रथम नशेचा पदार्थ न घेतल्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांवर (withdrawal features) परिणामकारक उपाय केले जातात. त्याबरोबर मानसोपचाराचा उपयोग रुग्णाची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी, त्याचे नातेसंबंध सुधारण्यासाठी केला जातो. त्या त्या रुग्णाच्या आवश्यकतेनुसार पुनर्वसनाची योजना तयार केली जाते. कुटुंबातील सदस्यांचेही समुपदेशन करणे आवश्यक असते. त्यांच्या भावनिक आधाराची रुग्णाला गरज असते. रुग्णाची पत्नी किंवा पती, मुले यांच्यावरही व्यसनाचा दुष्परिणाम होतो. कधी कधी निराशा, अतिचिंता निर्माण होते. त्यांवरही उपाय केले तर कुटुंबातील वातावरण सुधारते. व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा स्वीकार करायला कुटुंब तयार होते.

हेही वाचा – Health Special: वर्षा ऋतूमध्ये आरोग्य कसे सांभाळाल?

व्यसनमुक्तीकडे…

व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनमुक्तीकडे नेणे हे जितके महत्त्वाचे, तितकेच व्यसनाधीनता निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करणेही महत्त्वाचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श मुला- मुलींसमोर ठेवणे, घरातील वातावरण निरोगी राखणे, नातेसंबंध दृढ करणे, फावल्या वेळेचा उपयोग विविध छंद जोपासणे, सामूहिक कार्य, सामाजिक कामे, खेळ, व्यायाम यात व्यतीत करणे या सगळ्यातून व्यसनांचा प्रतिबंध होऊ शकतो.

अध्यात्मिक शिकवण, धार्मिक प्रवचने यांचाही उपयोग होतो. दारूच्या अतिसेवनाने कुणाच्या हातून अपघात घडला किंवा मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले अशा बातम्या वाचल्या की, व्यसनमुक्तीसाठी अधिकाधिक जागृती आणि प्रयत्न केले पाहिजेत असे प्रकर्षाने जाणवते.

Story img Loader