Health Special: खाद्यपदार्थांमध्ये खाण्याचा सोडा असणं आणि त्यामुळे गॅसेस होणं, ही तशी नेहमीचीच तक्रार झाली. पण बेकिंग सोडा आपल्या आयुष्यात कसा काय आला ? आहारात तो कोणत्या कारणांसाठी वापरला जातो? त्याचे फायदे तोटे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा लेखप्रपंच!

निमिषाचा सक्काळ सकाळी कॉल आला, “मला काल रात्रीपासून सारखं अपचन झाल्यासारख वाटतंय. मी ओवा वगैरे खाऊन पाहिलं पण तितकासा फरक जाणवत नाहीये.”
“ एक ग्लास पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पी. तुला थोड्या वेळात बरं वाटेल.” मी उत्तरले
“बेकिंग सोडा? तो दातासाठी वापरतोय तो का ?”
“हो, तोच.”
“पण त्याने जास्त झालं तर?” निमिषाचा पुन्हा प्रश्न
“नाही होणार जास्त. ट्रस्ट मी!

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO

इट्स मिरॅकल!

पुढच्या १५ मिनिटात तिचा पुन्हा फोन आला. आवाजात उत्साह, आनंद दोन्ही होते. “पल्लवीSSSS, काही ढेकर आले आणि मला खूप बरं वाटतंय आता. थँक यू! थँक यू !”
“बेस्ट !”
“काल काय खाल्लंस ?”
“रात्री जास्त पिकलेल्या सफरचंदाचं पुडिंग! मला खाताना वाटलं होतं, पण टाकून देणं नको वाटलं. पण खायचा सोडा असा कामी येईल मला वाटलं नव्हतं . इट्स मिरॅकल !”
निमिषाचं ‘इट्स मिरॅकल’ माझ्या मनात बराच वेळ रुंजी घालत राहिलं आणि त्या निमित्ताने सोडिअम बायकार्बोनेट अर्थात खायच्या सोड्याबद्दल थोडंसं लेखन व्हायलाच हवं या विचारानं मूळ धरलं!

हेही वाचा…कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या? फक्त ‘हे’ दोन योगा करा; नेहमीच दिसाल तरुण

सोडियम बायकार्बोनेट

खायचा सोडा अर्थात सोडियम बायकार्बोनेट नेहमीच्या खाद्यपदार्थांमध्ये सर्रास वापरलं जाणारं रसायन आहे. ब्रेड, बिस्कीट, केक्स, शीतपेये , अनेक औषधे, पोटाच्या विकारावरील पेये, विविध प्रकारचे साठवणीचे पदार्थ, हॉटेलमध्ये तयार केल्या जाणाऱ्या उसळी, भात आणि भाताचे पदार्थ यात चव वाढविण्यासाठी आणि मऊसुतपणा येण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. खरंतर आहारशास्त्रात याला विशेष महत्व आहे.

विशेषतः पोटात किंवा छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी सोडिअम बायकार्बोनेट औषधी आहे. सोडिअम बायकार्बोनेट हे अल्कलीयुक्त पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध असते. सोडिअम बायकार्बोनेटचे नेमके फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊया.

खायच्या सोड्याचे फायदे

१.सोडिअम बायकार्बोनेटच्या पाण्याने चूळ भरल्याने हिरड्या आणि दातांचे आरोग्य उत्तम राहते .
२. लाळेचा pH वाढतो. ज्यामुळे पचन देखील उत्तम होते
३. दात पांढरे आणि स्वच्छ होतात.
४. अॅसिड रिफ्लेक्स कमी करणे. पोटात होणारी जळजळ कमी करणे, बेकिंग सोडा पोटातील आम्लांचे प्रमाण कमी करून आतड्यातील आम्लांचे प्रमाण स्थिर करणे
५. तोंडातील उष्णतेमुळे होणारे अल्सर कमी करणे
६. सायकलपटू आणि धावपटू खेळण्याआधी बेकिंग सोडा पिणे पसंत करतात. व्यायाम करताना किंवा स्पर्धेदरम्यान स्नायूंमध्ये होणारे लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यात सोडिअम बायकार्बोनेट मदत करते. यामुळे खेळाडूंना येणार थकवा कमी होतो.
७. किडनी विकारांमध्ये सोडिअम कार्बोनेटचे सेवन अत्यंत गुणकारी ठरते.
८. घामाची दुर्गंधी दूर करणे.
९. रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण कमी करते.
१०. भाताचे पदार्थ तयार करताना भात फळफळीत होण्यास मदत करते
११. कडधान्ये लवकर शिजण्यास मदत करते

हेही वाचा…दही खरोखरच थंड आहे की ते शरीरामध्ये उष्णता वाढवते? दह्याचा शरीरावर कसा होता परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांकडून….

पचनासाठी उपयुक्त

१ चमचा बेकिंग पावडर मध्ये मानवी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण कॅल्शिअमपैकी ३३% इतके कॅल्शिअम आणि ६०% इतके फॉस्फरसचे प्रमाण असते. इतर पोषणमूल्ये अजिबातच नसलेला बेकिंग सोडा पचनाचे विकार कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे .

अतिरेकी सेवनाचा मात्र त्रास

सोडिअम बायकार्बोनेटचे अतिरेकी सेवन मात्र पोट बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. घरी साठवून ठेवताना सोडा हवाबंद बरणीतच ठेवावा लागतो. शक्यतो कीटकनाशक गंध असणारा खायचा सोडा पाणी किंवा हवेशी संपर्कात येत नाही तोपर्यंत उत्तमरीत्या साठवता येऊ शकतो.
तुमच्या घरात तुम्ही खायचा सोडा वापरता का?