आजकाल मध्यमवयातील स्त्रिया (व काही पुरुषही) जीन्स व टी शर्ट घालण्याऐवजी ढगळ कपडे घालताना दिसतात. डॉक्टरकडे आल्यावर बराच वेळा सुटलेले पोट किंवा स्थूलपणा याविषयी चिंता व्यक्त करतात. काही वर्षांपूर्वीं एखाद्या स्थूल व्यक्तीला त्याच्या मापाचे कपडे शिवून घ्यावे लागत असत. परंतु आज oversize / प्लस साईझ अशी दुकाने प्रत्येक मॉल किंवा रस्त्यावर असतात व तिथे गर्दीही असते. केवळ मध्यमवयीन स्त्रियाच नव्हे तर लहान मुले, १३-१४ वर्षांतील मुलीही स्थूल दिसतात व त्याची चिंताही करतात.

अन्न समृद्धी, विविध प्रकारचे खाणे सहज घरच्या घरी उपलब्ध होणे, मैदानी खेळांचा अभाव, व्यायामाचा कंटाळा आणि स्वस्त झालेला इंटरनेटचा डेटा यामुळे बऱ्याच व्यक्तींचे वजन वाढलेले असते. परंतु स्थूलत्व तपासण्याचे वेगवेगळे दंडक आहेत. लहानपणी तुमच्या इंचातील उंचीच्या दुप्पट वजन पौंडात असेल तर योग्य असे मानले जाई. आजकाल बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), वेस्ट टू हीप रेशो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण हे दंडक वापरले जातात. जाहिरातीतील मॉडेल्स, अभिनेत्री यांनी मेंटेन केलेली फिगर पहिली की अनेक तरुण मुली व त्यांच्या आया चिंता करू लागतात. आईला वाढत्या वजनाची चर्चा करताना पाहिले की आपोआपच वयात येणाऱ्या मुलीही आपल्या वजनाची चिंता करू लागतात. याचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. किशोरावस्थेत होणारे बदल वयात येणाऱ्या मुलीला आपल्या शरीराची नव्याने जाणीव करून देतात, त्याच वेळेस आपल्या वजनाविषयीची तिची जाणीव बदलू लागते.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा – क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?

कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली त्या जाड-बारीक असणे याकडे जास्त जागरूकपणे बघतात एकदा जर असे वाटले की वजन वाढत आहे की त्यावर विविध चर्चा व उपाय सुरु होतात. डाएट, जीम असे सगळे प्रकार सुरू होतात. दीक्षित कि दिवेकर असा संभ्रम मनात येतो. मुली आणि स्त्रिया पुन:पुन्हा आपण स्थूल आहोत हे मनाला सांगू लागतात आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. विशेषत: तरुण मुलींमध्ये स्थूलपणाच्या भावनेमुळे आत्मविश्वास कमी होतो, स्वत:विषयी प्रेम/ आत्मसन्मान वाटत नाही. कपडे निवडताना, चालताना, कोणतेही शारीरिक काम करताना आपण कसे स्थूल दिसतो याचाच सतत मनात विचार सुरू होतो. कधी कधी यातून एकटेपण/ नैराश्य येते, इतरांमध्ये मिसळणे किंवा पार्टीजमध्ये जाणे कमी होते. पुढे तर त्यासाठी उपास करणे व जेवण कमी करणे, कधी जास्त खाल्ले तर अत्यंत अपराधी वाटणे आणि मुद्दाम उलट्या करून खाल्लेले सर्व बाहेर टाकून देणे असा अ‍ॅनोरेक्सिआ नव्हरेसा (Anorexia nervosa) नावाचा मानसिक विकार आढळतो. या उलट काही मुलींमध्ये वेगळाच आजार उद्भवतो. यात एखाद्या वेळेस अति खाणे, मग त्याविषयी अपराधीपणाची भावना निर्माण होणे, मग रेचके वापरणे असे दिसून येते. ह्याला बुलिमिआ नव्हरेसा (Bulimia nervosa) असे म्हणतात.

वाढत्या वजनाविषयीच्या चिंतेमुळे डाएट सुरू होते. खाण्यावर निर्बंध येतात. आपले मन मारून डाएटप्रमाणे खाऊन किंवा न खाऊन वजन कमी करण्यासाठी आटापिटा केला जातो. वजन थोडेसे जरी वाढले तरी अस्वस्थ होतात. सातत्याने डाएट करण्यातून किंवा स्थूलपणामुळे शरीरातील अंत:स्रावांवर परिणाम होतो. त्यामुळे स्त्रियांच्या पाळीवर परिणाम होऊ शकतो. हल्ली तरुण मुलींमध्ये PCOD चे प्रमाण वाढले आहे. हृदयावर परिणाम होऊ शकतो, हाडे ठिसूळ होतात. अ‍ॅनिमिया किंवा रक्तक्षय होतो. वजन कमी होऊ लागले की अर्थातच आनंद होतो. आपल्यालाही हलके आणि चपळ वाटते. लोकही कौतुक करू लागतात, मित्र-मैत्रिणींमध्ये आपले स्थान उंचावते. आपला आत्मविश्वास वाढतो. वजन आटोक्यात आले की मग बरेचजण डाएट थांबवतात. काही काळातच मग दुप्पट खाल्ले जाते. कधी कधी रात्री-अपरात्रीसुद्धा! अनेक गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मग वजन पुन्हा वाढू लागते. पुन्हा मनात निराशा निर्माण होते आणि पुन्हा नवीन डाएट करण्याच्या आपण मागे लागतो. अशा पद्धतीने डाएट व खाणे यांचा एक लपंडावच सुरु होतो.

हेही वाचा – Fatty Liver: रोजच्या वापरातील ‘या’ ३ ड्रिंक्स करतील फॅटी लिव्हरचा त्रास कमी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अनेकांच्या बाबतीत दिसून येणारी गोष्ट म्हणजे ताणतणाव वाढला की काही लोकांचे खाण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: सततचा ताण असेल, कामाचा, घरातल्या आजारपणाचा इ. तर त्याचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे अक्षरश: खात सुटणे. एखाद्या कुटुंबात सगळेच स्थूल असतात. तो आनुवंशिक गुणधर्मच असतो. इतरवेळी कामाच्या पद्धतीमुळे, अतिखाण्यामुळे किंवा ताणतणावामुळे वजन वाढते. त्याची अति चिंता करून शरीराला त्रास देण्यापेक्षा आपली जीवनशैली लक्षात घेऊन नियमित आहार व व्यायाम करून यावर नियंत्रण मिळवावे हेच योग्य. यासाठी काय उपाय योजना कराव्यात हे आपण पुढील भागात पाहूया.

Story img Loader