“पल्लवी पावसाळा सुरु होईल आणि माझं सगळं डाएट बिघडणार आहे . एकतर पालेभाज्या बंद होणार आहेत आणि मला इतकी भूक लागते आहे गेले काही दिवस ”- रीमा सांगत होती .
“ माझं दार पावसाळ्यात असंच होतं . सगळं जैसे थे वर येत ”
“कालपासून पोट बिघडलंय”
“ काय खाल्लं होतं ?”
“ सगळं नॉर्मल डोसा, पोळी भाजी ,पेर , दाणे संध्याकाळी सँडविच एवढंच खाल्लाय.”
“ चटणी खाल्लीय का ?”
“ हो , पुदिना आणि खोबऱ्याची चटणी – ती एकाच बाहेरून खाल्लीये”

मला रीमाच्या पोटाच्या तक्रारींचे आणि खाण्याचे धागे हाती लागू लागले. आणि दाणे पुदिना रोस्टेड होते. (अलीकडे रोस्टेड आणि बेक्ड या नावाने एक मीठ आणि मसाल्याची जोरदार धूळफेक बाजारपेठेत सुरु आहे. त्यावर एक सविस्तर लेख लवकरच लिहीन, म्हणतेय) मला नेमका संदर्भ लागला आणि मी रीमाला आहारविषयक बदल ठरवून दिले . तिचं आहार नियमन करता करता पावसाळा आणि त्यासोबत आहारात करता येण्याजोगे लहानसहान बदल याबद्दल मनात विचारचक्र सुरू झालं.

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
nutrition , students, twelve recipes , recipes ,
विद्यार्थ्यांसाठीच्या पोषण आहारात बदल; आता बारा पाककृती निश्चित
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Should You Cook Everything In Ghee? Pros And Cons You Need To Know
जेवणात तेल वापरावे की तूप? हा प्रश्न पडलाय; महिलांनो जाणून घ्या उत्तर

हेही वाचा… किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखर परफेक्ट प्रमाणात राहते? तज्ज्ञांचं उत्तर वाचा

ऋतुमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे हे अनादी अनंत काळापासून सत्य आहे. उन्हाळा सरत पावसाळ्याची चाहूल सगळीकडेच लागली आहे. अनेक ठिकाणी मान्सून ट्रेक्स आणि पर्यटनाचे प्लानिंगसुद्धा सुरु झाले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यात नेमके डाएट कसं सांभाळावं हा प्रश्न सर्रास विचारला जातो. पावसाळ्यात महत्वाचं असतं ते पाण्यामुळे होणारे आजार न होऊ देणं. उन्हाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती थोडी संथ होते आणि त्यामुळेदेखील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

हेही वाचा… Health Special: विद्यार्थी आत्महत्या का करतात?

पावसाळ्यात प्रथिनांचं प्रमाण मोजकं ठेवावं. पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा, भेंडी, तोंडली, गाजर, बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. पालेभाज्या चोखंदळ निवडाव्यात. शक्यतो कांद्याची पात, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कमी खाव्यात. यातील पाण्याचे प्रमाण संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सोबत घेऊन येतं. त्यामुळे या भाज्या न खाणे उत्तम.

पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे.

  • हळद: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे उत्तम. शक्यतो रात्री झोपताना हळदीचं -दूध प्यायल्यास उत्तम झोप लागू शकते.
  • लोणचं: आपल्याकडे उन्हाळ्यात विविध प्रकारची लोणची तयार करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या आहेच. पावसाळ्यात आतड्याच्या स्वास्थ्यासाठी १ चमचा लोणचं रोजच्या आहारात समाविष्ट करायला हरकत नाही.
  • मसाला चहा: भारतीय मसाल्यांचे योग्य मिश्रण चहासोबत एकत्र करून आपला नेहमीच चहा आणखी आरोग्यदायी ठरू शकतो. विशेषतः त्यात साखरेचे प्रमाण शून्य ठेवणे केव्हाही उत्तम.
  • लसूण: लसूण पराठा, मिरची-लसूण ठेचा, लसूण चटणी यांना भारतीय आहारात महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळ्यात विशेषतः तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास आहारात लसूण जरूर समाविष्ट करावी.
  • कारलं: कारल्याची कडू चव अनेकदा स्वयंपाक घरातून कारल्याला हद्दपार करते, मात्र क जीवनसत्त्वाचे प्रमाण उत्तम ठेवणे तसेच पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी कारलं आहारात जरूर समाविष्ट करावं.

पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे का टाळावे?

तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे जिभेवर मौज वाटणारे पदार्थ आतड्याला सुस्त करतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. पावसाळ्यात माशांसाठी प्रजनन काळ असतो त्यामुळे शक्यतो मासे कमी खावेत त्यापेक्षा चिकन किंवा मटण खाणे उत्तम.

Story img Loader