डॉ वैभवी वाळिम्बे

आज आपण वेदनेबद्दलच्या काही मूलभूत संकल्पना अतिशय सोप्या आणि परिणामकारक उदाहरणांसह समजावून घेणार आहोत.
१) वेदना सामान्य, वैयक्तिक आणि नेहमीच वास्तव असते: तुम्हाला येणारा लहानात लहान आणि मोठ्यात मोठा वेदनेचा अनुभव वास्तव असतो. हा अनुभव तुमच्या मेंदूने तुमच्या संरक्षणासाठी दिलेला उत्कृष्ट (अप्रिय असला तरीही) प्रतिसाद आहे. हे आता आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेवूया.

Stop Throwing Out Banana Strings
Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Are monk fruit sweeteners safe for you
Monk Fruit : साखरेपेक्षाही गोड असतं ‘हे’ फळ! अतिसेवनानं वाढतील हृदयाच्या समस्या; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
World Hand Wash Day, wash hands,
हात धुता धुता…
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
BRI method for measuring obesity
What is BRI: निरोगी शरीर ओळखण्याची नवी पद्धत, जाणून घ्या BRI म्हणजे काय? BMI पेक्षा ते वेगळं कसं?
anger
जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
anger affect, mental health
Health Special: रागामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते का?

आणखी वाचा : Health Special: कॅल्शियम, लोह व अन्य पोषकसत्वांचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी कोणते पदार्थ आहारात जोडावे? सेवनाचे नियम काय?

तुमचा पाय मुरगळला आहे आणि त्यामुळे वेदना होते आहे, चालायला त्रास होतो आहे, याठिकाणी जर तुम्हाला वेदनेचा अनुभव आलाच नाही तर आपण मुरगळल्यामुळे इजा झालेल्या स्नायूवर किवा लिगामेंट्स वर भार देतच राहू ज्यामुळे त्यांना झीज भरून काढण्यासाठी लागणारा वेळ (रिपेअरिंग किंवा हिलिंग टाइम) मिळणार नाही, परिणामी त्यांना झालेली इजा वाढत जाईल. म्हणजेच वेदना ही संरक्षणासाठी आहे.

आणखी वाचा : Health Special: कुठेतरी दूर पळून जावेसे वाटते आहे? मला काय झालंय?

त्या वेदनेची तीव्रता ही तुमच्याशी निगडीत गोष्टींवर जसे की पाय मुरगळण्याची तीव्रता, तुमचं वय, वजन, तुमची त्यावेळची मानसिक आणि भावनिक परिस्थिती, तुमच्या स्नायूचं किवा लिगामेंट्सच आरोग्य (मसल हेल्थ), तुमची शारीरिक चपळता (अॅजिलिटी) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालेल्या दुखापतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन इतक्या घटकांवर अवलंबून आहे, म्हणजेच साहजिकच वेदना ही वैयक्तिक आहे आणि वास्तवदेखील.

आणखी वाचा : Health Special: स्निग्ध पदार्थांचे शरीरातील कार्य काय?

२) वेदनेची तीव्रता आणि शारीरिक बिघाड यांतील संबंध: शरीर रचनेत किवा कार्यात होणारा बिघाड हे बहुतांशी वेदनेचं मूळ आहे हे खरं, पण वेदनेची तीव्रता ही नेहमीच बिघडलेल्या बाबींशी अनुसरून असेलच असं नाही. उदहारणार्थ सीमेवर लढणारे जवान हे भयंकर प्रमाणात जखमी होऊनही लढतात, त्याक्षणी भयंकर शारीरिक इजा होवूनही त्यांना ती वेदना जाणवत नाही कारण त्यावेळची त्यांची मानसिक आणि भावनिक स्थिती ही देशासाठी लढण्याची असते. (वैद्यकीय भाषेत याचं कारण हे एडरेनेलीन या संप्रेरकाचा वाढलेला स्त्राव, हे आहे ज्याला ‘एडरेनेलीन रश’ असंही म्हणतात). आणखी एक अतिशय बोलक उदाहरणं म्हणजे घरात खेळणार लहान मूल पडलं की सगळ्यांनी त्याच्याकडे पहिलं तरच ते रडत, त्याचं पडण हे कुणीही ‘नोटिस’ केलं नाही तर ते उठून पुन्हा खेळू लागतं.

या दोन्ही उदहरणांमध्ये झालेल्या शारीरिक इजेपेक्षा, त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती ही वेदनेची तीव्रता ठरवते आहे, यालाच कॉन्टेक्स्ट (Context) असं म्हणतात. यातूनच आपण आपल्या तिसर्‍या संकल्पनेकडे वळतोय. जी आहे पेन रिलाईज ऑन कॉन्टेक्स्ट.

३) वेदना संदर्भावर अवलंबून असते :
कॉन्टेक्स्ट या शब्दाचा अर्थ संदर्भ. जेव्हा हा शब्द आपण वेदनेच्या संबंधी वापरतो तेव्हा याचे अनेक कंगोरे असतात. तुमचा सभोवताल, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी, तुम्हाला ऐकू येणार्‍या गोष्टी, येणारे विविध वास, तुम्ही स्पर्श करता अशा गोष्टी इतकंच नाही तर तुमचे विचार, तुमच्या स्वतःबद्दल असणार्‍या समजुती, आयुष्यातील लोकांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, तुम्हाला असलेल्या वेदनेबद्दल किवा आजारबद्दल तुम्हाला असलेली समज या सगळ्या गोष्टी तुमच्या नकळतपणे तुम्हाला होणार्‍या वेदनेची तीव्रता ठरवतात, तुमच्या वेदनेला प्रभावित करतात.

आता साहजिकच प्रश्न असा उरतो की दरवेळी आपण तर आपल्या आजूबाजूला असलेली परिस्थिती बदलू शकत नाही किंवा ती नेहमीच आपल्याला हवी तशी असेलच असंही नाही, मग काय कारायच? उत्तर अगदी सोपं आहे आजपर्यंत आपल्याला हेच माहिती नव्हतं की या गोष्टीदेखील आपल्या वेदनेच्या तीव्रतेशी निगडीत आहेत. आता आपल्याला हे माहीत झाल्यामुळे अर्धी लढाई आपण इथेच जिंकली आहे. असं म्हणतात, ‘व्हेन यू नो व्हाय यू हर्ट, यू हर्ट लेस’! नाऊ वी नो व्हाय वी हर्ट, आता आपल्याला एवढच करायचं आहे की या संदर्भाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे, आपल्याला आपले सिम्स म्हणजेच (सेफ्टी इन मी) आणि डिम्स म्हणजेच (डेंजर्स इन मी) ओळखायचे आहेत, ते कसं करायचं हे बघूया पुढच्या लेखात.