Health Special डोहाळे म्हणजे शरीरातील योग्य पोषणघटकांची कमतरता! अलीकडे अनेक गर्भवती स्त्रियांना संतुलित आहाराचे महत्व कळल्यामुळे खारट, आंबट, गोड पदार्थांपेक्षा सुकामेवा, फळे, पालेभाज्या यांचे आहारातील योग्य प्रमाण डोहाळ्यांचा क्षणिक मोह टाळण्यास मदत करू शकते. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यावर कॅलरीजचे प्रमाण १६००-२००० इतके वाढू शकते. अशावेळी नेहमीपेक्षा योग्य आणि जास्तीचे अन्न खाणे आवश्यक ठरते. वजनवाढीला घाबरून कमी अन्न खाण्यापेक्षा आहारविषयक सल्ला घेऊन त्याप्रमाणे आहारनियमन करणे गरोदर स्त्रियांना उपयुक्त ठरते.

गरोदरपणात महिलांनी आहाराची पथ्यं काटेकोरपणे पाळणं आवश्यक असतं. पण हा तोच कालखंड असतो की, जेव्हा अनेक जण भरपूर खाण्याचा सल्ला देतात. शिवाय डोहाळे नावाची एक संकल्पनाही गरोदरपणातील खाण्यापिण्यासाठी अनेकदा वापरली जाते. डोहाळे सुरू झाले म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तिखट, आबंट, तूरट आणि प्रसंगी गोडदेखील खावेसे वाटते आणि ते गरोदर महिलेला द्यावे, असा एक समज आपल्याकडे रूढ आहे. पण या काळात खरंच काय करायचं असतं. काय खावं, किती खावं आणि काय टाळावं या विषयी फारसं कुणी मार्गदर्शन करताना दिसत नाही. त्याचविषयी आज आपण समजून घेऊ.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

हेही वाचा – मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?

गरोदरपणा आणि डोहाळे

गर्भधारणेच्या आधीपासून आहाराची व्यवस्थित काळजी घेतल्यास ‘विशिष्ट डोहाळे’ आढळून येत नाहीत. संतुलित आहाराची आखणी आणि नियमित व्यायाम हा गर्भधारणा झालेली महिला आणि बाळ म्हणजे बाळ व बाळंतीण दोघांसाठीही उत्तमच.

आहारतज्ज्ञ म्हणून डोहाळ्यांची वैज्ञानिक आणि शरीरशास्त्राच्या चष्म्यातून पाहणी करताना डोहाळे अन्नातील कॅलरीज आणि पोषणाची कमतरता दर्शवितात, हे ठळकपणे सिद्ध होते.

गोड पदार्थ – योग्य कर्बोदके आणि प्रथिनांची कमतरता

आंबट पदार्थ – क जीवनसत्त्व आणि लोह यांचे कमी प्रमाण

बर्फ/ थंड पदार्थ – लोह आणि अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेची कमतरता

मेण – आवश्यक स्निग्धांशाची कमतरता

माती/ टूथपेस्ट / खडू – कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक यांची कमतरता

याच कमतरतेची तिसऱ्या महिन्यापासूनच वाढीव औषधे घेणे आवश्यक ठरते; ज्यात लोह, प्रथिने ,कॅल्शिअम यासाठी औषध स्वरूपात पोषणतत्त्वे मिळतील याची काळजी घेतली जाते.

उलट्या आणि जळजळ

शरीरातील संप्रेरकांचे बदलते प्रमाण अस्वस्थपणा, उलट्या आणि जळजळ यासाठी कारणीभूत ठरू शकते. यावर आहारातील उपचार म्हणजे योग्य प्रमाणात पाणी हळूहळू आणि शक्यतो बसूनच पिणे. आलं- लिंबू यांचे पाणी किंवा पुदिन्याचे पाणी पिणे. प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये प्रथिनांचा समावेश असण्याबाबत सजग राहणे. रोज किमान ४ फळे आवर्जून खाणे (विविध फळे) तीव्र गंध (उग्र वास) असणाऱ्या पदार्थापासून दूर राहणे. जळजळ कमी करण्यासाठी ताजे दही खाणे. योग्य प्रकारे बसून जेवणे. खाताना बसून खाणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते.

गरोदरपणात पूर्णपणे वर्ज्य करावेत, असे अन्नपदार्थ.

१) कच्ची कडधान्ये

२) कोणत्याही धान्यांचे कच्चे पीठ

३) कच्चे दूध

४) उघड्यावरील ज्यूस

५) पपईच्या बिया

६) उघड्यावर ठेवलेला अननस किंवा उघड्यावरील कोणतेही फळ

७) अर्धवट उकडलेले / अर्धवट शिजलेले अंड

८) अर्धवट शिजलेला पास्ता किंवा चिकन

ई- कोली (E -Coli) किंवा सालमोनेला (Salmonella) सारखे संसर्ग टाळण्यासाठी तसेच बाळाच्या आरोग्यासाठी वरील पदार्थ हानिकारक आहेत. अनेकदा कच्चे मांसाहारी पदार्थ बाळामध्ये बहिरेपणा, अंधत्व, मेंदूचे विकार आणि कमी वाढीसाठी कारणीभूत ठरतात.

दारू पिणे सगळ्यांसाठीच हानिकारक आहे, स्त्रियादेखील त्याला अपवाद नाहीत. गरोदरपणात दारूचे सेवन बाळाच्या कमी वजनासाठी आणि आयुष्यभराच्या विविध विकारांसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ते कटाक्षाने टाळावे.

हेही वाचा – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे

गरोदरपणातील वजनवाढ :

गरोदरपणात वाढणारे वजन गर्भवाढीसाठी देखील आवश्यक असते. अनेक स्त्रिया पहिल्या महिन्यापासूनच प्रयत्नपूर्वक सुकामेवा, तूप यांचे प्रमाण वाढवितात. परिणामी वजन अवाजवी वाढते आणि तिसऱ्या महिन्यातच डॉक्टर वजनावर अंकुश ठेवण्याचा सल्ला देतात. गर्भवाढीसाठी वजनवाढ करताना नेमकं किती वजन वाढायला हवं, यावर लक्ष देणं आवश्यक आहे. साधारणपणे ८-१२ किलो वजनवाढ अपेक्षित असते. खालील तक्त्यावरून ही संकल्पना आंणखी स्पष्ट होईल.

Health Special, Pregnancy ,

गरोदरपणात व्यायाम करावा की, करू नये ?

गरोदरपणात व्यायाम करताना विशेष निगराणीखाली व्यायाम करणे अत्यंत फायदेशीर ठरते. व्यायामामुळे स्नायूंना बळकटी मिळते, हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आरोग्यदायी प्रसुतीसाठी शरीर तयार होऊ शकते. नवमातेचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. शरीरातील अतिरिक्त चरबी वाढण्याचे प्रमाण कमी होते. गर्भधारणेला नियमित जीवनशैलीचा भाग करत आहार- विहारात जाणीवपूर्वक बदल केल्यास गर्भाची वाढ आणि नवमातेचे आरोग्य उत्तम राहू शकते.

पुढच्या लेखात नवमातांच्या शरीरातील बदल आणि आहारातील पथ्यांबद्दल जाणून घेऊया.